माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची पिळवणूक खपवून घेणार नाही-आ. शामसुंदर शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती

माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची पिळवणूक खपवून घेणार नाही-

आ. शामसुंदर शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती


लोहा; विनोद महाबळे


लोहा, कंधार तालुक्यातील शेतकरी मागील काही दिवसापासून युरिया खताची मोठ्या प्रमाणात मागणी करीत असून काही खत विक्रेते शेतकऱ्यांना युरिया खत चढ्या भावाने विक्री करत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवर पत्रकार परिषदेत बोलताना लोहा ,कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे म्हणाले की माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची अडवणूक पिळवणूक मी कदापि खपवून घेणार नसून जादा दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारावर धाडी टाकून कठोर कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार ,तालुका कृषी अधिकारी ,जिल्हा कृषी अधीक्षक, यांना यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी निर्देश दिले. काल शनिवारी लोहा तहसील कार्यालयात आमदार शामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या आढावा बैठकीला उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या अडीअडचणी आमदार शामसुंदर शिंदे यांना सांगितल्या ,कृषी विभागाच्या आढावा बैठक की नंतर आमदार शामसुंदर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी लोहा उपजिल्हा रुग्णालयाला 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असल्याचेही यावेळी आमदार शिंदे यांनी सांगितले. सध्या पीक कर्ज मागणीसाठी शेतकरी बँकांकडे मोठ्या प्रमाणात चकरा मारत असून बँक अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांचे सर्व निर्देश पाळून नियमानुसार शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करावे असेही आमदार शामसुंदर शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी कृषी विभागाच्या विविध समस्या वर आमदार शामसुंदर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. या आढावा बैठकीला तहसीलदार विठ्ठल परळीकर, जिल्हा कृषी अधिक्षक सुखदेव चलवदे, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये ,पं. स. कृषी अधिकारी व्हावळे, कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार चे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील, श्याम आण्णा पवार, प्रवक्ता योगेश पाटील नंदनवन कर ,सुधाकर सातपुते ,सिद्धेश्वर वडजे, सचिन शिरसागर, सतीश कराळे ,युवानेते रोहित पाटील शिंदे ,अशोक सोनकांबळे ,प्रसाद जाधव ,प्रणव वाले, नागेश खांबे गावकर, सचिन कल्याणकर सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *