कोविड रुग्णालयात कोरोनाग्रस्त अपुऱ्या सुविधा पाहून आमदार हंबर्डे संतापले…!
लोहा ; विनोद महाबळे
लोह्यातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय कोव्हिड सेंटर येथे नांदेड दक्षीणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी पीपीई किट परिधान करूण स्वतः कोरोना रुग्णांची भेट घेतली , येथील रुग्णांनी मिळत असलेल्या सुविधा विषयी आपली कैफियत मांडली असता आमदार कमालीचे संतापले रुग्णांना योग्य ते सुविधा तात्काळ पूर्वा अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा सज्जड इशारा डॉक्टरांना दिला.
लोहा येथील कोव्हीड सेंटर मध्ये कोरोना बाधित रुग्ण व क्वारंटाईन रुग्णांच्या सुविधा विषयी असंख्य तक्रारी येत होत्या याची दखल घेत दि ३ ऑगस्ट आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी येथे ते सायंकाळी भेट दिली व रुग्णालयातील सर्व बाधितांची विचारपूस करून मिळत असलेल्या सुविधांची माहिती घेतली रुग्णालयातील कैफियत आमदार हंबर्डे यांच्यासमोर मांडली असता आमदार हंबर्डे कमालीचे संतापले कोरोना बाधितांना रुग्णालयात वेळेवर पाणी जेवण चादरी फॅन व स्वच्छ याची सुविधा वेळेवर उपलब्ध नाही सर्व बाधितांना हॉलमध्ये बंदिस्त केले जात असल्याचे रुग्णांनी सांगितले. त्यामुळे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी येथील वैद्यकीय अधीक्षक व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावत रुग्णांशी कोणताही भेदभाव न करता त्यांच्याशी मनमोकळेपणाने वागा व मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात , याठिकाणी पाच कोरूना ग्रस्त व काही स्वाब घेतलेले मोजकेच रुग्ण आहेत पण त्यांना कोणत्याही सुविधा वेळेवर मिळत नाहीत असे रुग्णांनी आमदार हंबर्डे यांना सांगितले.
सर्वत्र रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त केल्या मुळे भविष्यात तशी गरज भासल्यास क्वारंटाईन रुग्णाचे बेडची व्यवस्था कशी व कोठे करणार या बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर अधिक्षक डॉ. प्रशांत जाधव, मुख्याधिकारी अशोक मोकले, डॉ. सूर्यवंशी नगर परिषद अधिक्षक उल्हास राठोड, गजानन कळसकर,भूषण दमकोंडवार आदी उपस्थित होते.Attachments area