पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, यांचे आवाहन- कोणीही धार्मिक भावना दुखावतील असे आक्षेपार्ह पोस्ट शेअर करु नका ..
नांदेड ; नागोराव कुडके
सोशल मेडियावरून करू नयेनांदेड जिल्हयातील सर्व नागरिकांना विनंती आहे की,दिनांक०५/०८/२०२० रोजी आयोध्या येथे राम मंदीर भूमीपुजन आहे. आपल्या भारत देशाचीसर्वोच्च न्यायव्यवस्था मा. सर्वोच्च न्यायालय यांच्या निकालाचा आदर करावा आणिकोणीही सोशल मिडियावर एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट शेअर करूनये. जे कोणी समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट शेअर करतील त्यांच्यावर नांदेड सायबर सेलहे करडी नजर ठेवून आहेत. अशा व्यक्तींवर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणारआहे. तरी व्हॉटसअप ग्रुप अॅडमीन यांना विनंती आहे की, काही लोक धार्मिक भावनादुखावण्याच्या उददेशाने किंवा नकळत पोस्ट शेअर करीत असतात, त्यामुळे ग्रुप अॅडमीनयांनी आज व उदया व्हाटसअप च्या सेटिंग्ज मध्ये जावून मॅसेज सेन्ट सेटींग ओन्लीअॅडमीन करावे.असे आवाहन पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
राज्य शासनाने यापुर्वीच कोव्हीड-१९ या रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने अनेकसुचना व आदेश दिलेले आहेत, त्यामुळे सर्व नागरिकांनी आदेशाचे पालन करावे.