आधार अपडेटसाठी गूगल मिटवर कंधार तालुक्यातील मुख्याध्यापकांची मिटींग संपन्न
कंधार ; प्रतिनिधी
आधार आपडेटसाठी शंभर टक्के शाळांनी गुगल फार्मवर माहिती भरावी. कारण येणाऱ्या काळामध्ये शाळेंनी भरलेल्या आधार माहितीच्या आधारेच सर्व सुविधा मिळणार असून संचमान्यताही विद्यार्थ्यांच्या आधारवर होणार असल्याने तात्काळ मुख्याध्यापकांनी सरल पोर्टलवर विद्यार्थ्याचे आधार अपडेट करावेत असे आवाहन दि.६ नोव्हेबर रोजी गुगल मिटद्वारे आयोजित बैठकीत मुख्याध्यापकांना केले.
तसेच दिवाळी सुट्टी काळामध्ये ही व्हर्च्युअल शिक्षण चालू ठेवून विद्यार्थी हितासाठी कार्य करावे. शिक्षक, मुख्याध्यापकांनी शिक्षण विभाग व आपल्या केंद्राच्या अधिकृत व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात रहावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी कंधार तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांना केले.
तंत्रस्नेही केंद्र प्रमुख गणेश थोटे ,शिक्षण विस्तार अधिकारी कैलास होनधरणे यांनी आधार अपडेट करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कंधार तालुक्यातील मुख्याध्यापकांनी तात्काळ आधार सरल पोर्टलवर अपडेट करून 100% काम करावे, असे आवाहन करण्यात आले. तंत्रस्नेही शिक्षक कंधार तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सदैव उपलब्ध असल्याचे यावेळी सांगितले .
या बैठकीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी कैलास होनधरणे, सतीश व्यवहारे ,अंजली कापसे ,राजेश्वर पांडे ,धोंडीबा गुंटुरे आदींसह कंधार तालुक्यातील सुमारे 100 मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदवला होता.