लव्ह जिहाद : भाग २

‘मुसलमान युवकाने मुलगी पळवून नेली, तर तिला सोडवून आणण्याची धमक हिंदू समाज दाखवत नाही. हरणांच्या कळपावर आक्रमण करून त्यातील उमदे हरीण त्या कळपासमोरच वाघ हिंस्रतेने फाडतो आणि फस्त करतो; परंतु अगतिकतेने ते पहात बसण्यापलीकडे त्या कळपास काहीच करता येत नाही. अगदी तशीच अवस्था हिंदू समाजाची झाली आहे. ‘पोरगी माझ्यासाठी मेली’, असे म्हणून हात झटकून आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त रहाणे, यात कोणताही पुरुषार्थ नाही.

`लव्ह जिहाद’च्या कथा ऐकून हिंदू समाजातील बहुतांशांच्या मुठी आवळतात; पण त्याविरुद्ध संघटितपणे लढा देण्याची मानसिकता कोणीही दाखवत नाही.’ ‘मुसलमानांची मते गमावण्याचे भय असल्याने ‘लव्ह जिहाद’चे आक्रमण मोडण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षात नाही’

‘गेली तेराशे वर्षे धार्मिक उद्देशाने प्रेरित झालेल्या मुसलमानांनी हिंदू मुलींशी प्रेमाने किंवा बलप्रयोगाद्वारे ‘निकाह’ (विवाह) केलेले आहेत. इस्लामी आक्रमकांनी हिंदू स्त्रियांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांना बुरखा परिधान करणार्‍या ‘बेगमा’ (पत्नी) बनवले किंवा अंतःपुरात (जनानखान्यात) डांबले, हा इतिहास आहे.’

‘वर्ष ७१२ मध्ये आलेला महमंद बिन कासिम हा मुसलमान लुटारू हिंदुस्थानातील लाखापेक्षा अधिक हिंदू तरुणी ‘लूट’ म्हणून अफगाणिस्तानात घेऊन गेला. याने काबूल आणि कंदाहार येथील पेठांत (बाजारांत) अक्षरशः वस्तूंंचा लिलाव करावा, तसा लिलाव करून त्या हिंदू तरुणी विकल्या.’

गझनीचा महंमद ‘याने मथुरा लुटल्यानंतर त्या लुटीसह ७० सहस्र तरुण हिंदू स्त्रिया इस्लामी राष्ट्रांत पाठवल्या. वर्ष १०१४ मध्ये त्याने ठाणेश्वर लुटले, तेव्हा त्या लुटीसह दोन लाख तरुण हिंदू स्त्रिया नेल्या. गझनी येथे प्रत्येक लुटीसह नेण्यात आलेल्या हिंदू स्त्रियांची एकूण संख्या ४ लाखांपेक्षा अधिक आहे. उझबेकिस्तानमधीrल मुसलमान हे याच हिंदू स्त्रियांच्या पोटी जन्मलेली संतती आहेत, असे म्हणतात. महंमदाने गझनी येथील बाजारपेठेत एका मोठ्या स्तंभावर ‘दुख्तरे हिंदोस्तान, नीलामे दो दिनार ।’ या ओळी लिहिल्या होत्या. ‘हिंदुस्थानातील स्त्रियांचा येथे दोन दिनारांत लिलाव (विक्री) होईल’, असा त्याचा अर्थ आहे.’

अल्लाउद्दीन खिलजीने राजा रामदेव राय याला पराभूत करून त्याची आठ वर्षांची कन्या, तसेच शेकडो हिंदू स्त्रिया यांच्यावर अत्याचार केले. वर्ष १२९९ मध्ये गुजरातवरील स्वारीत अल्लाउद्दीनने तेथील राजा करण वाघेला याची राणी कमलादेवी हिला स्वतःची ‘बेगम’ बनवले. चितोडची राणी पद्मिनी हिच्या सौंदर्याविषयी कळल्यावर याने चितोडवर स्वारी केली. त्या वेळी शीलहरण होऊ नये; म्हणून राणी पद्मिनीसह ८,००० स्त्रियांनी जोहार (अग्नीत समर्पित होऊन प्राणत्याग) केला.

हुमायून हा बाबराचा कुपुत्र हिंदूंच्या लग्नाच्या वरातीतूनच नववधूला पळवून नेत असे.’

अकबराने रजपूत जोधाबाईचे केलेले अपहरण, ही एक प्रकारची ‘लव्ह जिहाद’ची ऐतिहासिक लहान आवृत्तीच होती’, असे प्रसिद्ध इतिहासकार बिपीन चंद्रा यांचे मत आहे. मोगल साम्राज्याला सर्वाधिक धोका शूर रजपुतांपासूनच होता. हा धोका नष्ट व्हावा, यासाठी मनात कपट ठेवून अकबराने जोधाबाईचे अपहरण केले.’

अकबराने बळाने पळवून आणलेली जोधाबाई ही हिंदु धर्माचे पालन करत असल्याचे सांगितले जाणे, ही शुद्ध थाप ! : ‘अकबराची राणी जोधाबाई अखेरपर्यंत हिंदु धर्माचे पालन करत होती. जोधाबाई नित्य पूजा-अर्चा करी आणि तिला प्रसन्न ठेवण्यासाठी अकबर त्या पूजा-अर्चेत कपाळाला गंध लावून सहभागी होई’, अशा कथा नेहमी सांगितल्या जातात. या कथा सांंगणारे ‘मुगले आझम’, ‘अनारकली’ आणि ‘जोधा-अकबर’ असे चित्रपटही निघाले. या कथा म्हणजे शुद्ध इस्लामी थापा आहेत. तबकात अकबरी’ या अकबरकालीन ग्रंथाप्रमाणे अकबराने जोधाबाईशी इस्लामी पद्धतीने निकाह केला होता. निकाहाच्या वेळी ती मुसलमान झाली आणि तिचे नाव मरीयम जमानी ठेवण्यात आले होते. फत्तेपूर सिक्री येथील तिच्या महालाचे नावमरीयमका महल’ असे होते. मृत्यूनंतर तिचे इस्लामी पद्धतीप्रमाणे आग्र्याजवळील ख्वाजाकी सरई येथे दफन केले गेले.’

लव्ह जिहाद’ची प्रेरणा देणार्‍या चित्रपटांच्या निर्मितीमागे पाकची गुप्तचर संस्था आहे हे सिद्ध झाले आहे. ‘भारतीय समाजावर चित्रपटांचा असलेला प्रभाव हेरून पाकची गुप्तचर संस्था ‘आयएस्आय’ने ‘लव्ह जिहाद’ला अनुकूल वातावरणनिर्मिती करण्यासाठी १९९० पासून गुन्हेजगताचा माफिया दाऊद इब्राहीमच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत पैसा गुंतवण्यास आरंभ केला.’

या मंडळींनी चित्रपट निर्मात्यांना ‘मुसलमान नायक आणि हिंदू नायिका’ अशी जोडी असलेले चित्रपट निर्माण करण्यास भाग पाडले. अशा चित्रपटांत मुसलमान नायकांसमवेत (उदा. इमरान हाश्मी, सैफ अली खान, फरदीन खान, सलमान खान यांच्या समवेत) हिंदू नायिकांची प्रणयदृश्ये जाणीवपूर्वक दाखवून हिंदू तरुणींच्या मनात अनैतिक प्रेमभावना जागवल्या जातात. त्यामुळे मोठ्या पडद्यावर दिसणारा मुसलमान नायक आपल्याच परिसरातील मुसलमान युवकात शोधण्याचा प्रयत्न हिंदू तरुणी करतात. त्याचा परिणाम म्हणजे आता हिंदू तरुणींना मुसलमानांशी प्रेमाचे चाळे करण्यात किंवा त्यांच्याशी विवाह करण्यात काहीच अनुचित (गैर) वाटत नाही. याउलट चित्रपटात ‘हिंदू नायक आणि मुसलमान नायिका यांचे प्रेम’, असा विषय असल्यास ते मुसलमानांना खटकते आणि ते त्या चित्रपटाला संघटितपणे विरोध करतात. ‘बाँबे’ चित्रपटाच्या वेळी असे घडले होते.

चित्रपटसृष्टीतील हिंदू कलाकार लव्ह जिहाद’ला बळी पडलेले आहेत. ते कसे ते पाहूया शर्मिला टागोर या बंगाली चित्रपट अभिनेत्रीने टायगर अली खान पतौडी या क्रिकेटपटूशी विवाह केला. विवाहाच्या वेळी शर्मिला टागोर यांचे धर्मांतर करून त्यांचे ‘बेगम आयेशा सुल्ताना’ असे नामकरण करण्यात आले. अभिनेता ‘सैफ’ आणि अभिनेत्री ‘सोहा’ ही त्यांची मुले धर्माने मुसलमान आहेत.

सुशीला चरक चित्रपट-कथाकार सलीम खान यांच्याशी विवाह केल्यानंतर त्या ‘सुशीला’ न रहाता ‘सलमा’ झाल्या. आज अभिनेता असलेली त्यांची सलमान, अरबाज आणि सोहेल ही तीन मुले धर्माने मुसलमान आहेत.

गौरी छिब्बर कर्नल रमेशचंद्र छिब्बर यांची कन्या असलेल्या या चित्रपट निर्मातीने घरचा विरोध असतांना शाहरूख खानशी विवाह केला.

आमीर खान या अभिनेत्याने प्रथम रीना दत्त या चित्रपट निर्मातीशी विवाह केला. दोन मुले झाल्यानंतर त्याने रीना दत्तशी असलेला १९ वर्षांचा संसार मोडीत काढत तिला घटस्फोट दिला आणि किरण राव या चित्रपट दिग्दर्शिकेशी विवाह केला. दूरचित्रवाहिनीवरील एका भेटवार्तेत बोलतांना आमीर खान याने ‘माझी पत्नी जरी हिंदू राहिली, तरी माझी मुले मुसलमान म्हणून ओळखली जातील’, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्याचा मुलगा आणि मुलगी यांची नावे मुस्लीम पद्धतीची आहेत.

१९९१ मध्ये सैफ अली खान याने अमृता सिंग या अभिनेत्रीशी विवाह केला. इब्राहिम आणि सारा ही मुले झाल्यानंतर १३ वर्षांनी त्याने अमृता सिंगला तलाक दिला. त्यानंतर २००९ मध्ये त्याने करीना कपूरशी प्रेमसंबंध असल्याचे उघडपणे सांगून २०१२ मध्ये तिच्याशी विवाह केला.

सोहेल खान-सीमा सचदेव, अरबाज खान-मलाईका अरोरा, फरदीन खाननताशा मधवानी, इम्रान हाश्मी-परवीन शाहनी, इमरान खान-अवंतिका मलिक, झायेद खान-मल्लिका पारेख, ही याच मालिकेतील काही उदाहरणे आहेत. या इतिहासाचा निष्कर्ष म्हणजे हिंदू तरुणीने मुसलमान पुरुषाशी विवाह केला, तर तिला इस्लाम धर्माचेच पालन करावे लागते आणि तिच्या पोटची मुले पुढे ‘इस्लामचेच बंदे’ होतात.

सध्याच्या चित्रपटसृष्टीत एकही मुसलमान अभिनेत्री नाही.
‘पूर्वी चित्रपटसृष्टीत मुमताज, सायरा बानो, वहीदा रेहमान, नर्गिस, झीनत अमान, परवीन बाबी आदी अनेक मुसलमान अभिनेत्री होत्या. सध्या चित्रपटसृष्टीत असलेली सोहा अली खान ही अभिनेत्री हिंदू-मुसलमान मिश्र वंशाची आहे. गुन्हे जगतातील कुख्यात माफिया असलेल्या दाऊदच्या कंपनीने भारतीय चित्रपट उद्योगात मुसलमान मुलींच्या प्रवेशास प्रतिबंध केला आहे. मुसलमान निर्माते अन् दिग्दर्शक यांना मात्र त्यांच्या चित्रपटात हिंदू अभिनेत्रींना घेण्यास अनुमती दिली आहे.’

आता जरा क्रिकेट जगतावर नजर टाकू या. १९९६ मध्ये क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याने ९ वर्षांच्या संसारानंतर पत्नी नुरीनला तलाक देऊन संगीता बिजलानी या अभिनेत्रीशी विवाह केला. २०१० मध्ये त्याने संगीतालाही तलाक दिला.

राजकीय क्षेत्रात पायल नाथ हिच्याशी १७ वर्षे संसार केल्यानंतर जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी २०११ मध्ये तिला तलाक दिला. डॉ. रुमी नाथ (आसाममधील काँग्रेसच्या आमदार) : ‘दोन वर्षांच्या मुलीची माता असलेल्या डॉ. रुमी यांनी शासकीय नोकरीत असलेल्या जैकी जाकीर या मुसलमानाशी पळून जाऊन निकाह केला. या निकाहासाठी आसामचे एक मंत्री शामिल सिद्दीकी अहमद यांनी साहाय्य केले.’

‘लव्ह जिहाद’, हेच ज्येष्ठ इंग्रजी लेखिका कमला दास यांनी इस्लाम पंथ स्वीकारण्यामागील कारण मानले जाते.‌
‘कमला दास यांनी १९९९ मध्ये वयाच्या ६५ व्या वर्षी इस्लामचा स्वीकार केला आणि ‘कमला सुरय्या’ असे मुस्लीम नाव धारण केले. त्यांचा सहलेखक म्हणून काम करणार्‍या एका ३० वर्षीय प्राध्यापक असलेल्या मुसलमानाने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मोठा गाजावाजा करत त्यांनी इस्लाम पंथ स्वीकारला. इस्लाम स्वीकारताच त्यांनी घरातील सर्व हिंदु देवतांची चित्रे काढून टाकलीr. २००६ मध्ये ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला दिलेल्या एका भेटवार्तेमध्ये कमला दास यांनी आपण धर्मपरिवर्तन करून पुष्कळ काही गमावल्याची स्वीकृती दिली होती.’

‘कमला दास यांना पुन्हा हिंदु धर्मात परत येण्याची इच्छा होती; पण असे केल्याने त्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या मोठ्या मुलाने त्यांना तसे न करण्यास सांगितले. कमला दास यांना त्यांच्या सहलेखक मुसलमानाने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आखाती राष्ट्रातून आलेले १ कोटी रुपये दिले होते. याविषयी कागदी पुरावा उपलब्ध नसला, तरी ही गोष्ट त्यांनी स्वतः जन्मभूमी या मल्याळम दैनिकाच्या संपादिका सौ. लीला मेनन यांना सांगितली होती. कमला दास या सुप्रसिद्ध लेखिका असल्याने केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’ला अनुकूल वातावरण होण्यासाठी तसे केले असावे. निकाह केल्यानंतर ते दोघे एकत्र राहिले नाहीत.’

लव्ह जिहाद’मागे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र असून त्याचे उद्देश काय आहेत, हे हिंदू जनजागृती समितीने सांगितले आहेत.

अ) जगाचे इस्लामीकरण करणे –

१. हिंदू तरुणींचे इस्लामीकरण करून हिंदू वंशवृद्धीचा एक स्रोत नष्ट करणे

२. हिंदू तरुणींशी विवाह केल्यानंतर अनेक अपत्ये जन्माला घालून इस्लामी वंशवृद्धी करणे

३. विवाहानंतर हिंदू तरुणींचा जिहादी कारवाया आणि शस्त्रास्त्र-तस्करी यांसाठी वापर करणे

४. अनेक अपत्ये जन्माला घालून त्यांचा आत्मघातकी पथकांसाठी वापर करणे

वरील उद्देशांमागील अंतिम उद्देश ‘जगाचे इस्लामीकरण करणे’, हाच आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल.

आ. आर्थिक लाभ मिळवणे

१. प्रेमात (‘लव्ह जिहाद’मध्ये) फसलेल्या तरुणींची अश्लील छायाचित्रे प्रसारित करून त्याद्वारे पैसा मिळवणे

२. प्रेमात फसलेल्या तरुणींची अश्लील छायाचित्रे काढून त्यांना प्रतिमाहनन (ब्लॅकमेल) करण्याची धमकी देऊन पैसा उकळणे

३. वेश्यालयात त्यांची विक्री करून त्याद्वारे पैसा कमावणे

४. आखाती (अरब) आणि इस्लामी राष्ट्रांत धर्मांतरित हिंदू तरुणींची विक्री करून भरपूर पैसा कमावणे

इ. वासनातृप्ती – प्रेमाचे नाटक करून हिंदू तरुणींशी शारीरिक संबंध ठेवून स्वतःची वासनातृप्ती करणे

. मुसलमानांनी हिंदू स्त्रियांना पळवण्यामागील स्वा. सावरकरांनी सांगितलेले एक कारण लक्षात घेण्यासारखे आहे.
‘हिंदूंच्या लक्षावधी स्त्रियांचे मुसलमानांनी अपहरण करण्याचा जो त्या कालखंडातील शतकोशतके धुमाकूळ घातलेला होता, त्याला नुसते धर्मवेड म्हणून हेटाळण्याइतकी किंवा त्यास अनुल्लेखाने दुर्लक्षण्याइतकी ती गोष्ट तुच्छ नव्हती. वस्तूतः मुसलमानांचे ते ‘धर्मवेड’ एक वेड नव्हते, तर एक अटळ सृष्टीक्रमाला अनुसरून (महिलांमधील जननक्षमता जाणून) अंगीकारलेली त्यांची संख्या वाढवण्याची परिणामकारक पद्धत होती.

‘लव्ह जिहाद’चे मुख्य लक्ष्य हिंदू तरुणी हेच आहे. हिंदू तरुणींना आमिषे दाखवून आणि गोड बोलून प्रेमसंंबंध निर्माण केले जातात. मुसलमान मौलवींकडून ‘लव्ह जिहाद’साठी ‘प्रतिदिन २०० रुपये घ्या आणि हिंदू मुलींना बाटवा’, असा ‘फतवा’ काढण्यात आला आहे. त्यानुसार हिंदू मुलींना पटवण्यासाठी मुसलमान मुलांना प्रतिदिन २०० रुपये देण्यात येतात. हिंदू मुलीला पटवल्यावर त्यांना एक दुचाकी वाहन आणि तिच्याशी निकाह (लग्न) केल्यावर एक-दोन लाख रुपये दिले जातात.’

‘गाव सोडून नगरात आलेल्या मुलींवर मुसलमानांचे
प्राधान्यक्रमाने लक्ष असते. नगरातील राहणीमानाला जुळवून घेण्यासाठी त्यांना उंची कपडे आणि वस्तू यांची आवश्यकता असली, तरी त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा मुलींचा शोध घेऊन त्यांना पैसे दिले जातात, तसेच धुम्रपान, मद्य आदींचे व्यसन लावले जाते. ‘लव्ह जिहाद’ला फसलेल्या अशा मुली मग अन्य हिंदू मुलींना फसवण्यासाठी साहाय्य करतात.’

अलीकडे हिंदू तरुणींसह विवाहित महिलांनाही प्रेमात फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विवाहित असलेल्या हिंदू स्त्रीचा मुसलमान महिलेच्या माध्यमातून बुद्धीभेद करणे आणि नंतर तिला मुसलमान मुलाने पळवून नेणे : ‘पल्लकड, केरळ येथील प्रेमविवाह केलेल्या एका हिंदू दांपत्याला एक लहान मूल होते. पतीपत्नीचे एकमेकांवर ते महाविद्यालयात असल्यापासून प्रेम होते. विवाहानंतर नोकरीच्या निमित्ताने पत्नीला तिच्या लहान मुलासह दुसर्‍या नगरात स्थलांतरित व्हावे लागले. नव्या ठिकाणी तिच्या शेजारी रहाणार्‍या मुसलमान महिलेने तिला इस्लामची उपासना शिकवली. एक दिवस तिचा पती तिला भेटण्यासाठी तेथे आला, तेव्हा त्याला पत्नी इस्लामप्रमाणे आचरण करत असल्याचे आढळले. तिचे इस्लाम धर्मीय महिलेत रूपांतर झाले होते. हे पाहून त्याला धक्काच बसला. त्याने पत्नीला पुन्हा घरी नेले आणि महिनाभर तेथेच ठेवले. काही दिवसांत त्यांचा संसार नेहमीप्रमाणे चालू झाला. काही दिवसांनी ती त्या कामावर पुन्हा रुजू झाली, तेव्हा एका मुसलमान तरुणाच्या प्रेमात पडली आणि पती अन् मूल यांना मागे ठेवून त्यासह पळून गेली.’

हिंदू तरुणींपेक्षा विवाहित स्त्रियांकडून आर्थिक लाभ अधिक होत असल्याने त्यांना लक्ष्य केले जाते. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका विवाहित स्त्रीचा एक मुसलमान तरुण काही दिवसांपासून प्रतिदिन पाठलाग करत होता. एके दिवशी त्या तरुणाने धीटपणे तिचा हात पकडून बलपूर्वक तिला दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्या स्त्रीने त्याच्या थोबाडीत मारून स्वतःची सुटका करवून घेतली. त्या स्त्रीने कुटुंबियांना घडलेला प्रसंग सांगितल्यावर त्यांनी त्या मुलाला शोधून काढले. या वेळी त्याने सांगितले, ‘‘ विवाहित स्त्रियांना प्रेमात ओढणे, हा आमचा नवीन व्यवसाय आहे. आजकाल आम्ही लहान, शालेय अथवा महाविद्यालयीन मुलींना लक्ष्य करणे न्यून (कमी) केले आहे; कारण त्यांच्या पालकांना आमच्याविषयी समजल्यावर एकतर त्यांचे शिक्षण बंद करतात अथवा त्यांचे लग्न लावून देतात. अशा मुलींकडून आमची केवळ शारीरिक भूक भागते; परंतु आर्थिक लाभ होत नाही.

एखाद्या विवाहित स्त्रीला आम्ही पटवू शकलो; तर ती आमच्यासाठी ‘२४ घंटे पैसे पुरवणारे यंत्र’ (ए.टी.एम्. मशीन) किंवा ती आमची स्थायी ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) असते. तिच्याकडून आम्हाला हवे तेव्हा रोख पैसे मिळवता येतात. अशा स्त्रीचा आम्ही ४-५ जण मिळून उपभोग घेतो. आम्ही तिची बहीण, नणंद, मैत्रिणी आदींचीही तिला ओळख करून द्यायला सांगतो. जर तिने आम्हाला विरोध केला, तर आम्ही तिला – तिची अश्लील छायाचित्रे तिच्या नवर्‍याला दाखवण्याची धमकी देतो. तिला तिचा संसार वाचवायचा असल्याने आम्ही जे सांगू किंवा मागू, ते ती द्यायला सिद्ध होते.’’

‘मुसलमान तरुणीही हिंदू तरुणांना धर्मांतरित करण्यासाठी त्यांच्याशी फसवे प्रेम रचत आहेत. प्रेमात अडकलेल्या तरुणाला विवाहानंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी या तरुणी आग्रह धरतात. ख्रिस्ती तरुणींनाही ‘लव्ह जिहाद’साठी लक्ष्य केले जाते. ‘केरळ आर्चबिशप कौन्सील’ने हा प्रकार गंभीरतेने घेऊन ‘तरुणींनी जिहादींच्या प्रेमजाळात न फसण्यासाठी काय करावे’, याविषयी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या.

‘लव्ह जिहाद’मागील कारस्थान मूलतः धार्मिकच आहे. जिहादचा संघर्ष कोणत्याही प्रकारचा अगदी लेखणीचा, वाणीचा, प्रेमाचा किंवा आतंकवादी आक्रमणांचा असू शकतो. जोपर्यंत आपण मुसलमानांच्या धार्मिक शिकवणीचे मूळ लक्षात घेत नाही, तोपर्यंत १,३०० वर्षांपासून तलवार, बंदूक, प्रेम आदी माध्यमांतून चालू असलेली हिंदूंची धर्मांतरे थांबणार नाहीत.

काफिरांना मुसलमान बनवणे आणि संपूर्ण जग इस्लाममय करणे’, या ध्येयपूर्तीच्या मार्गांमध्ये पवित्र किंवा अपवित्र, असा भेद मुसलमानांसाठी नसतो; कारण इस्लाममध्ये कार्यपद्धत महत्त्वाची नाही, तर अंतिम परिणाम महत्त्वाचा मानतात. सामर्थ्य अल्प असतांना पळून जाणे, समसमान सामथ्र्य असतांना ‘करार’ म्हणजे गोड बोलून रहाणे आणि सत्तासामथ्र्य प्राप्त झाल्यावर बलप्रयोग करणे, अशा इस्लाम विस्ताराच्या तीन अवस्था आहेत. म्हणजेच, ‘लव्ह जिहाद’ हा काही आधुनिक काळातला नवा प्रवाह नाही, तर तो परंपरागत चालत आलेला ‘धर्मांतरा’चा जिहादच आहे. हिंदुस्थानात मुसलमान अल्पसंख्य असल्याने त्यांच्यात सत्तासामथ्र्य नाही; म्हणून येथे प्रेमाचा मार्ग निवडण्यात आला आहे.’

‘काही मौलवी जिहादी तरुणांना ‘‘हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यापासून मुलांना जन्म दिल्यास तुम्हाला स्वर्ग मिळेल. त्यामुळे इस्लामचा विस्तार होणार असल्याने अल्लाची कृपादृष्टी तुमच्यावर राहील’’, असे सांगून त्यांचा बुद्धीभेद करतात, असे निरीक्षण उत्तरप्रदेशमधील गुप्तचर अधिकार्‍यांनी नोंदवले आहे.’ लव्ह जिहाद’ हा हिंदुस्थानातील हिंदू तरुणींना धर्मांतरित करण्याचा शत्रूराष्ट्रांनी रचलेला आंतरराष्ट्रीय कट आहे.

‘केरळमधील वृत्तपत्रांच्या मते ‘लव्ह जिहाद’साठी अरब राष्ट्रांतून पैसा पाठवला जातो. दमाम (सौदी अरेबिया) येथे असलेली ‘इंडियन फ्रॅटर्निटी फोरम’ ही संस्था याच कारणासाठी पैसा गोळा करते.’

‘लव्ह जिहाद’साठी सौदी अरेबिया येथून ‘वेस्टर्न युनिअन मनी ट्रान्सफर’च्या माध्यमातून हवालाद्वारे पैसा येतो. भारतातील काही दागिन्यांच्या व्यावसायिकांच्या आखाती राष्ट्रांमध्ये शाखा आहेत. त्यांच्याद्वारेही पैशांचे स्थलांतर केले जाते. हज यात्रेसाठी जाणार्‍या यात्रेकरूंच्या माध्यमातूनही पैशांचे स्थलांतर होते; कारण हज येथून येणार्‍या विमानांतील प्रवाशांची कडक पडताळणी होत नाही.’

: ‘पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेने १९९६ पासून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदुस्थानात कार्य करण्यास प्रारंभ केला. ‘लष्कर-ए-तोयबा’कडून ‘लव्ह जिहाद’साठी मुसलमान तरुणांना मोठ्या प्रमाणावर पैसा, अत्याधुनिक साधनसुविधा आणि नियोजनबद्ध आराखडे पुरवले जातात.’

२०१० मध्ये केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट नेते अच्युतानंदन ह्यांनीही कडव्या इस्लामी संघटना ‘मॅरेज एन्ड मनी’ म्हणजे ‘लग्न आणि पैसा’ ही दोन शस्त्रे वापरून केरळचे इस्लामीकरण करत आहेत असा गंभीर आरोप केला होता. केरळची चर्च आणि हिंदू संघटना ह्यांनीही ह्या आरोपाला पुष्टी दिली होती. काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय न्यूज चॅनेलवरती देखील ‘लव्ह जिहाद’ होतो आहे आणि त्यासाठी काही कडव्या मुस्लिम संघटनांनी रेट कार्डही काढले आहेत असा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. तथाकथित ‘प्रागतिक’ विचारसरणीच्या लोकांचा ह्यावरच युक्तिवाद म्हणजे, प्रेम हे धर्मातीत असतं त्यामुळे कुठल्याही हिंदू मुलीला मुसलमान मुलावर प्रेम करायचा आणि त्याचा धर्म स्वीकारायचा हक्क आहे. कायदेशीरदृष्ट्या हे बरोबरच आहे, पण असे विवाह करणाऱ्या मुली कुठल्या कुटूंबातून येतात, विवाह करताना त्यांची मानसिक स्थिती काय असते, त्या मुसलमान होणार म्हणजे नक्की काय करणार, त्या एका निर्णयामुळे त्यांच्या कायदेशीर हक्कांमध्ये काय फरक पडू शकतो ह्याची पूर्ण जाणीव त्यांना असते का हे सगळं विचारात घेणं महत्वाचं आहे. मुद्दा दोन भिन्नधर्मीय लोकांनी प्रेमात पडण्याचा नाही किंवा लग्न करण्याचाही नाही. मुद्दा आहे तो लग्नाआधी धर्मांतर करण्याचा.

लव्ह जिहाद’बाबत प्रक्षोभक वक्तव्य करून विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. इतकेच नव्हे तर हिंदू महिलांना चार मुले असावी, या आपल्या वक्तव्याचेही त्यांनी जोरदार समर्थन केले आहे.
‘लव्ह जिहाद’द्वारे आपल्या मुलींना जाळ्यात ओढले जात असून, ३०-४० मुलांना जन्म दिला जात आहे आणि ‘लव्ह जिहाद’ पसरविला जात आहे. हिंदुस्थानला दारूल इस्लाम बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असेही साध्वी म्हणाल्या.
आपण हे वक्तव्य केले तेव्हा देशात भूंकप झाल्यासारखी स्थिती झाली. चार मुलांबाबतचे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले, असे आपल्याला माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. मात्र केवळ चार मुले असावी, असे भाष्य केले ४० नव्हे, असेही त्या म्हणाल्या. ज्या हिंदूूंना चारपेक्षा अधिक मुले आहेत त्यांचा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला तेव्हा त्या बोलत होत्या.भाजपने या वक्तव्याशी असहमती दर्शविली आहे. या भूमिकेशी पक्ष सहमत नाही आणि त्यावर चर्चा करण्यातही भाजपला रस नाही, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्याच्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात मुस्लीम युवकांना प्रवेश देऊ नका, असे वक्तव्य भाजपच्या इंदूर (तीन) येथील आमदार उषा ठाकूर यांनी केले आहे. हिंदू मुलींना प्रेमात फसवून त्यांचे धर्मातर करण्याचे कारस्थान असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर या मध्य प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षही आहेत. या संदर्भात माझ्या मतदारसंघातील सर्व गरबा आयोजकांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी एक्स्प्रेसशी बोलताना स्पष्ट केले. गरब्याच्या ठिकाणी केवळ हिंदूंना प्रवेश द्यावा यासाठी ओळखपत्र अनिवार्य करावे, अशी सूचनाही ठाकूर यांनी केली आहे. जर मुस्लिमांना यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करावा, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले

अनेकदा ते (मुस्लिम) कपाळाला टीळा लावून येतात त्यामुळे ते हिंदू असल्याचा गैरसमज निर्माण होतो आणि मुस्लिम युवक तरुणींशी मैत्री करतात. मात्र, ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक केल्यास प्रत्येकाची खरी ओळख पटण्यास मदत होईल असे ठाकूर यांनी सांगितले. हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत’, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. तसेच महिलांच्या सक्षमीकरणावरही भर देण्याची गरज असल्याचे गाझियाबादमधील एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले.
लव्ह जिहादमागे सिमी आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्य आणि ऑर्गनायझरमधून मांडण्यात आला आहे. रांचीमधील राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवचं प्रकरण उजेडात आल्यानंतर आता विविध संघटना सक्रिय झाल्या आहेत. हिंदू मुलींना प्रेमात फसवून त्यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांचे धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याविषयी बोलताना भागवत यांनी हे मत व्यक्त केले.

उशिरा होणाऱ्या विवाहांमुळेच लव्ह जिहादला बळ मिळत असल्याचा अजब दावा भाजपच्या आमदारानं केला आहे. इतकंच नव्हे, तर बालविवाहांमुळे लव्ह जिहादला आळा बसेल, असंही या आमदारानं म्हटलंय. पूर्वी बालविवाहाची प्रथा होती. वर आणि वधू यांनी एकमेकांना पाहिलेलं नसतानाही ज्येष्ठ मंडळींकडून त्यांचं लग्न करुन दिलं जायचं. या प्रथेचं आपण समर्थन करत असल्याचं मध्य प्रदेशचे भाजप आमदार गोपाल परमार यांनी म्हटलं.

‘पूर्वी मुलींचं वय १८ वर्षे होण्याआधीच त्यांचं लग्न करुन दिलं जायचं. मुलांचा विवाहदेखील २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच केला जायचा. पूर्वी कमी वयातच मुलामुलांची लग्न ठरवली जायची. लवकर लग्न ठरवल्यामुळे मुलं चुकीच्या मार्गावर जाण्याचं प्रमाण कमी होतं. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याआधीच मुलांचं लग्न ठरवलं जायचं. मात्र आता मुलं कोचिंग क्लासला जातात. तिकडे ते लव्ह जिहादसारख्या सापळ्यांमध्ये अडकतात,’ असं गोपाल परमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं. परमार मध्यप्रदेशमधील अगर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.

उशिरा होणारे विवाह लव्ह जिहादला जबाबदार असल्याचं अजब तर्कट परमार यांनी मांडलं. ‘मुली अतिशय संवेदनशील असतात. त्यांना कोणी मदत करत असेल, तर त्या सहज फसतात. मग त्या त्यांचं नाव आणि त्यांची ओळख बदलण्यासाठी तयार होतात,’ असं परमार म्हणाले. आपण स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींचे विवाह बालपणीच ठरवले असल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘माझा बालविवाह झालाय आणि माझ्या मुलांची लग्नदेखील मी त्यांच्या लहानपणीच ठरवली आहेत. मी माझ्या दोन मुली आणि एका मुलाचं लग्न सज्ञान होण्याआधीच ठरवलंय,’ असं परमार म्हणाले. यामुळे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आनंदात असल्याचंही त्यांना सांगितलं.

लव्ह जिहाद देशाच्या सुरक्षेपुढचे सर्वात मोठे संकट आहे असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केले आहे. पश्चिमेकडच्या देशात ‘लव्ह जिहाद’ला ‘रोमिओ जिहाद’ असे संबोधले जाते. आपल्या देशात या हा प्रकार वाढीला लागला आहे. लव्ह जिहाद ची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अनेक मुलींनी माध्यमांसमोर येऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली आहे असेही जैन यांनी स्पष्ट केले. लव्ह जिहाद हे एक षडयंत्र आहे, वाममार्गाला गेलेल्या लोकांना यातून पैसा मिळतो असाही आरोप त्यांनी केला. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात स्वतःला सेक्युलर मानणारा समाज लव्ह जिहादवर मूग गिळून गप्प आहे. जयपूरमध्ये झालेल्या एका अध्यात्मिक परिषदेत लव्ह जिहादशी संबंधित काही पत्रके वाटली गेली. हिंदू मुलींनी लव्ह जिहादच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य पणाला लावू नये अशा आशायचा मजकूर या पत्रकांमध्ये होता. जे लोक शांतता प्रिय आहेत आणि गुण्या गोविंदाने राहतात त्यांच्यासाठी लव्ह जिहाद हे संकट आहेच मात्र यामुळे देशासमोरही मोठे संकट निर्माण झाले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

जोपर्यंत धर्मांतर करत नाहीस, तोपर्यंत तुझ्याशी लग्न करणार नाही अशी अट 20 वर्षीय हिंदू तरुणीने आपल्या मुस्लिम प्रियकरासमोर ठेवली आहे. पूजा जोशी असं या तरुणीचं नाव असून, आपल्या मुस्लिम प्रियकर मोहसीन खानसोबत ती पळून गेली होती. मोहसीन खान एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. तरुणी पळून गेल्यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिकानेरमधून एका दांपत्याला ताब्यात घेतलं, आणि जोधपूरला आणलं. जोपर्यंत संपुर्ण शहरभर हिंदू तरुणी मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्याची वार्ता शहरभर पसरली होती. दोघांना पोलीस ठाण्यात आणलं तेव्हा अनेक हिंदू संघटनांचे कार्यकर्ते तसंच नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

गर्दीतील लोकांनी पोलीस ठाण्याबाहेरच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप करत मोहसिन खानला मारहाणही करण्यात आली. ‘पूजा जोशीचा जबाब नोंदवण्यासाठी तिला दंडाधिका-यांसमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी आपल्या जबाबात जर मोहसिनने हिंदू धर्म स्विकारला तर त्याचीशी लग्न करणार असल्याचं पूजा जोशीने सांगितलं आहे’, अशी माहिती एसीपी पूजा यादव यांनी दिली आहे.

पूजा जोशीने आपल्या घरी जाण्यास नकार दिला असून, मोहसिन खान धर्मांतर करेपर्यंत आपण वाट पाहू असं सांगितलं आहे. आपल्या चुलत भावांच्या घरी राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे. ‘तरुणी अल्पवयीन नाहीये. त्यामुळे कुठे राहायचं हा निर्णय ती घेऊ शकते. संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तिला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल’, असं एसीपी पूजा यादव बोलल्या आहेत.

कुटुंबियांनी पूजाला घरी येण्यासाठी विनवण्या केल्या. पण काही केल्या पूजाने आपण घरी येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तिने प्रसारमाध्यमांशी बोलण्यासही नकार दिला होता.

लव्ह जिहाद का आणि कसा घडून येतो त्याचे सखोल विवेचन या दुसऱ्या भागात केलेले आहे. हिंदू धर्मातील अनेक त्रुटींमुळे हा लव्ह जिहाद घडून येतो. हिंदूंचे संस्कार त्यांच्या मुलींना अथवा स्त्रियांना ह्या प्रकारापासून का रोखू शकत नाहीत? मग खोट कुठे आहे? भारतावरच्या मुसलमानी आक्रमणापासूनचा हा इतिहास आहे. हिंदू तरुण हा असला प्रकार करीत नाही. मुसलमान स्रियांना हिंदू बनवून घरात आणीत नाही. ते धर्मविरोधी असते. हा पुरुषार्थ त्याच्यात नसतो? पुजा जोशीने जो नकार दिला तो इतरांना का देता येत नाही. काय असते मुसलमान तरुणांकडे जे हिंदूंकडे नसते? धर्मांतर तर ख्रिश्चनही करुन घेतात. तो कोणता जिहाद असतो? भारतीय संविधानाने कुणाशीही लग्न‌ करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. इथे कुणी कुणाला रोखू शकत नाही. जसा मुसलमानांवर धर्माचा पगडा असतो तसा हिंदूंवर असत नाही. ज्यामुळे जिहादच्या घटना घडतात, त्या का घडतात त्याची कारणे शोधली पाहिजेत. प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवले जात असेल तर ते रोखले पाहिजे. जनजागृती समिती‌ केवळ स्थापन करण्यासाठी नसते. तिने सतत प्रबोधन‌ केले पाहिजे. उगाचच मुसलमानांना किंवा बाहेरच्या षडयंत्रकारी संघटनाना दोष देण्यात अर्थ नाही. आजचा काळ मुसलमानी आक्रमणांचा किंवा मारुन मुसलमान करण्याचा हा काळ नाही, हे लक्षात घेतले पाहिजे!

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
६.११.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *