०७ नोव्हेंबर रोजी भारत स्काऊट गाईड राष्ट्रीय चळवळीचा स्थापना दिवस आहे. कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन शक्य असल्यास शालेय स्तरावर भारत स्काऊट्स आणि गाईड्स राष्ट्रीय वर्धापनदिन साजरा करण्यात यावा. स्वातंत्र पूर्व काळात देशात स्काऊट गाईड चे कार्य करणाऱ्या विविध संघटनांचे विलीनीकरण करून देशात एकमेव भारत स्काऊट्स आणि गाईड्स राष्ट्रीय चळवळीची स्थापना ७ नोव्हेंबर १९५० मध्ये झाली.
म्हणून हा स्थापना दिवस साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने स्काऊट गाईड गणवेशात भारत स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण स्काऊट गाईड पध्दतीने (ज्या शाळांमध्ये स्काऊट गाईड ध्वज उपलब्ध आहे अशा शाळा) करावयाचे आहे.तसेच या दिनाचे औचित्य साधून वचनाचा पुनरुच्चार, स्काऊट गाईड प्रार्थना,स्काऊट गाईड विषयास अनुसरुन निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा इ .चे आयोजन करून त्या उपक्रमांची सोशल मीडिया वर प्रसिद्ध करावे. जिल्हा संघटक स्काऊट व गाईड, नांदेड असे आवाहन दिगांबर करंडे यांनी केले आहे.