आम्हाला बोलने, चालने, लिहणे, वाचने ज्यांनी शिकवले. त्या आमच्या माते समान असलेल्या थोरल्या वहिनी कै. सौ. निलावतीबाई देशमुख (एन जी देशमुख यांच्या पत्नी) यांची आज २४ वी पुण्यतिथी आहे.
पुण्यतिथी म्हटल की गाव जेवन देणे ही आमच्या तरोडा बुद्रुक गावची परंपरा आहे. परंतू आम्ही या गोष्टी पासून परंपरेनेच दुर आहोत. अर्थात आता पर्यंत आम्ही आमच्या कुटुंबातील पुर्वजांचे स्मरण आगळ्या वेगळ्या समाज उपयोगी उपक्रमातून करत आलो आहोत.
यावर्षी आम्ही वहिनींच्या स्मरणार्थ, आमच्या परिसरात नावलौकिक असलेल्या , ” राष्ट्रमाता इंदिरा गांधी हायस्कूल, संभाजी नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड या शाळेच्या ग्रंथालयास मौलिक अशी ३७१ पुस्तके भेट म्हणून दिली आहेत.
या पुस्तकांमध्ये मुलांना उपयुक्त ठरतील अशी राष्ट्रीय पुरूषांची चरित्र, आत्मचरित्र, ऐतिहासिक कादबंरी, सामान्य ज्ञान, कविता संग्रह, कथा संग्रह, वैचारीक ग्रंथ, तत्वज्ञानाची पुस्तक, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले पुस्तक, पाककला कृती ग्रंथ, भारतीय संविधान(मराठी), ग्राम पंचायत कायदा, हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौध्द, जैन धर्म तत्वज्ञान, तसेच शिख, महानुभाव, बिस्नोई पंथ अशा विविधतेचा खजिनाच भेट म्हणून दिला आहे. ही पुस्तक जे विद्यार्थी वाचतील त्यांच्या जीवनास निश्चितच मार्गदर्शक ठरतील. एवढ्या विश्वासाने हा उपक्रम राबविला आहे.
– पत्रकार आनंद कल्याणकर, तरोडा बुद्रुक, नांदेड