जानापुरीचे वीर भुमीपुत्र शहीद संभाजी कदम यांच्या पुतळ्याचेही लोकार्पण
लोहा / प्रतिनिधी
लोकप्रतिनिधीने आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडला पाहिजे जानापुरीचे राहिलेले दहा टक्के रस्त्याचे काम पूर्ण करणार असे प्रतिपादन नांदेड लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जानापुरी येथे विविध कामाचे लोकार्पण सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी केले.
लोहा तालुक्यातील मौजे जानापुरी ५ नोव्हेंबर रोजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यात जानापूरीचे वीर भूमीपुत्र आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी शहीद झालेले शहीद संभाजी कदम यांच्या पुतळ्याचे उद्घाटन, सिमेंट रस्त्याचे व फेवर ब्लॉकचे , सभागृहाचे लोकार्पण खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक खा. प्रतापराव पाटील चिखलीकर होते तर प्रमुख पाहुणे लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, उपसभापती नरेंद्र गायकवाड, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, लोहा नगरपालिकेचे उपाध्यक्ष शरद पाटील पवार, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माणिकराव मुकदम, माजी सभापती शंकर पाटील ढगे, माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके, पं.स. सदस्या सौ.सुकेशनी कांबळे, भाजपाचे नांदेड तालुकाध्यक्ष सुनील मोरे, बाजार समितीचे संचालक दता पाटील टरके, दापशेडचे सरपंच विरभद्र राजूरे,डेरलाचे उपसरपंच नारायण कळकेकर, पंजाबराव देशमुख,किवळाचे सरपंच साईनाथ टरके, उपसरपंच प्रताप टरके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, जानापुरी येथे सरपंच लोंखडेबाई,व सरपंच बळीराम पाटील सरपंच झाल्यावर काय काय विकास कामे झालीत याचा लेखाजोखा दिला. लोकप्रतिनिधीने खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य यांनी पाच वर्षात काय काम केलेत याचा लेखाजोखा दिला पाहिजे काय काम राहिले ते सांगितले पाहिजे तर जनतेने निवडणूकीत पाहिले पाहिजे ही लोकशाहीची पध्दत आहे.
जानापुरी वासियांशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांनी आमदार ,खासदार जिल्हा परिषद सदस्य केले मी ज्या मतदार संघामध्ये होतो तो मतदारसंघ लातूर मध्ये आहे. लोक म्हणत होते की लोकसभा निवडणुक लढवू नका पण पक्षाने तिकीट दिले २२ हजार कोटीच्या माणसाला पाडल ही लोकशाही आहे महाराष्ट्रात जे श्रीमंत आहेत त्यात हा वाघ आहे.मी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत निवडणूक लढवली पण पळसाला तीनच पान आहेत आमच्या नसीबात नेहमी कटकट आहे लोक म्हणतात पण जाऊद्या लोकसभेची निवडणूक ही सर्वोच्च सभागृहाची निवडणूक आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये नांदेड चा खासदार ने किती प्रश्न विचारले महाराष्ट्रासाठी काय केले काही नाही ५ वर्षात एकदाही तोंड उघडले नाही श्रीमंत आहे म्हणून त्याला निवडून दिले परंतु मी प्रत्येकी चार चार असे आठ प्रश्न सभागृहात मांडलो रेकॉर्ड तोडलो उच्चांक मी मांडलो. नांदेडच्या व बारामती च्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आपल्याला वाटते आपला माणूस मोठा व्हावा विधान परिषदेचे आचारसंहिता संपल्यानंतर जानापुरी येथील सर्व विकासकामे करूत आचारसंहिति असल्यामुळे आता नारळ फोडता आले नाही. आता तुम्ही शाळेला कॅम्प्युटर मागितले ती घोषणा आता करता येत नाही कॅम्पुटर ची किंमत काही जास्त नाही एक काय जास्त देता येतील. जनापुरी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा माझ्या हस्ते सत्कार केला विद्यार्थी शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे त्याने स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतला पाहिजे यश मिळविले पाहिजे एमपीएससी, यूपीएससी स्पर्धेत भाग घेतला पाहिजे माझ्याकडेजे गोर गरीब विद्यार्थी विद्यार्थिनी यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी मदत करा म्हणून आले त्यांच्यासाठी मी दिल्लीला माझ्यातर्फे राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली मला जे राहायला घर मिळाले माझे अर्धे घर त्यांना राहायला दिले. आपण सर्व समाजाने महापुरुषांच्या जयंत्या एकत्र साजरी कराव्यात महापुरुषाला कोणा एका जातीच्या बंधनात बांधू नये त्यांचे कार्य एका समाजासाठी नव्हते देशासाठी होते ते संपूर्ण देशाचे होते छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की,मराठा समाज , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणले की बौद्ध समाज असे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले ते रयतेचे राजे होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देश वाशियांसाठी संविधान दिले. या सर्व महापुरुषाच्या जयंत्या एकत्रित सर्व समाज बांधवांनी एकत्र साजरी कराव्यात असे आव्हानही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
तसेच पुढे म्हणाले की मी काम करणारा कार्यकर्ता आहे चिखलीकर व जानापूरीकर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आता विधानपरिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर जानापुरी येथील सर्व विकास कामे करूत.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक तथा लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बळीराम पाटील कदम जानापुरीकर, सरपंच कमलबाई रघुनाथराव लोंखडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष माधवराव पाटील कदम , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास पाटील कदम ,दशरथ कदम यांच्यासह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले व आभार प्रदर्शन श्यामसुंदर शिंदे यांनी मानले.