डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश

काल ७ नोव्हेंबर. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला गेला. हा दिवस मुख्यत्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक वाटचाल खूपच रोमहर्षक आहे. हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता यांसारख्या अनेक पैलूंमधून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन करतो. आंबेडकरांना स्वत: देखील आजन्म विद्यार्थी मानले. म्हणूनच शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. मात्र, आपल्यापैकी ब-याच जणांना ही गोष्ट माहित नसेल की, शासनाने हाच दिवस विद्यार्थी दिवस म्हणून का निवडला? तर त्याला ही तसे विशेष कारण आहे.

७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. त्यानंतर २००३ पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आले आहेत. त्यांनी या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करावा, अशी शासनाकडे अनेकदा मागणी केली. त्यानंतर शेवटी २७ आॅक्टोबर २०१७ साली महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने
हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला. 

अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे म्हणून, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी, यासाठी शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे म्हणून, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी, यासाठी शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

७ नोव्हेंबर’ हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या दिवशी १९०० साली बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये (तेव्हा ‘गव्हर्नमेंट हायस्कूल’) पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. त्या वेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात शिक्षणामुळे क्रांती घडली. त्यांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली. जगात गौरव होत असलेल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ते ठरले. ते आजन्म विद्यार्थी होते. म्हणूनच हा दिवस राज्यात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी खास परिपत्रक जारी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे हा एक क्रांतिकारी निर्णय असून याचे अत्यंत दूरगामी परिणाम संपूर्ण भारताच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर होणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे १८९४ मध्ये सैन्याच्या नोकरीतून निवृत्त झाले. त्यावेळी ते “कॅम्प दापोली” येथे राहत होते. त्यांनी १८९६ मध्ये दापोली सोडले आणि सातारा येथे गेले. भीमराव त्यावेळी लहान असल्याने त्यांना शाळेत प्रवेश मिळू शकला नव्हता. त्यामुळे त्यांचे मूलभूत शिक्षण वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घरीच झाले. शेवटी ७ नोव्हेंबर १९०७ मध्ये त्यांचे नाव साताऱ्याच्या जुना राजवाडा येथील सातारा हायस्कूलमध्ये (अर्थात आजच्या प्रतापसिंग हायस्कूल मध्ये) टाकण्यात आले. त्यांना इयत्ता पहिलीच्या इंग्रजी वर्गात प्रवेश देण्यात आला. इसवी सन १९०० ते १९०४ ही बाबासाहेबांच्या बालपणीची चार वर्षे या शाळेत गेली.

छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे नातू छत्रपती प्रतापसिंग भोसले महाराज यांनी सातारा भागात १८०८ ते १८३९ पर्यंत राजे म्हणून काम पाहिले. साताऱ्यात शिक्षण, वाचन संस्कृती चळवळ सुरु करण्याचं काम छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी केलं होतं. त्या काळात त्यांनी पुणे-सातारा मार्ग, सातारा महाबळेश्वर मार्ग बांधले, तसेच नगर वाचनालय व ही शाळा सुरु केली होती. ही शाळा सुरुवातीला रंगमहाल येथे होती. १८७१ मध्ये या शाळेचे रुपांतर माध्यमिक शाळेत झाले. आधी ते गव्हर्नमेंट व्हर्न्याकुलर स्कूल व सातारा हायस्कूल म्हणून ओळखले जाई. १८७४ मध्ये ते सध्याच्या जुना राजवाडा या भागात भरू लागले. ते आता प्रतापसिंग हायस्कूल म्हणून ओळखण्यात येते. या शाळेतून अनेक मोठमोठी व्यक्तिमत्वे आकाराला आलीत. त्यात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणतज्ञ कुलगुरू डॉ. देवदत्त दाभोळकर, सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्रगडकर, इंग्लंड मधील भारताचे राजदूत आप्पासाहेब पंत, कुलगुरू शिवाजीराव भोसले, रंग्लर परांजपे अशी काही नावे सांगता येतील.

७ नोव्हेंबर हा दिवस बाबासाहेबांच्या आयुष्यात अत्यंत मोलाचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात शिक्षणामुळे क्रांती घडली. त्यांनी ज्ञान, कौशल्य व कृती यांच्या जोरावर भारतीय समाजात क्रांती घडविली. जगातील अत्युत्तम संविधान भारताला देणाऱ्या संविधानाच्या शिल्पकाराची पायाभरणी या शाळेत झाली होती. वंचित, श्रमिक, महिला, शेतकरी इत्यादींसाठी अनेकाविध क्षेत्रात झटणारा भीमराव या शाळेत घडला. या शाळेने कायदेपंडित, धर्मसुधारक, धम्मप्रवर्तक, पत्रकार, स्वराज्य-सेनानी इत्यादी चौफेर व्यक्तिमत्वाच्या भिमारावांच्या शिक्षणाची सुरुवात या शाळेत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश युगांतराची चाहूल देणारी व इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारक घटना होती. बाबासाहेबांचे शिक्षण या शाळेत सुरू झाले नसते तर… हा खरोखरच विचार आणि चिंता करायला लावणारा गूढ प्रश्न आहे.

बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव सुद्धा याच शाळेत मिळाले. त्या काळी लोकांना त्यांच्या गावाच्या नावाने ओळखण्यात येई. त्यामुळे ‘आंबडवे’ या गावाचे ते आंबडवेकर असे आडनाव तयार होत होते. तथापि, प्रेमाने स्वतःच्या शिदोरीतील घास देणारे कृष्णाजी केशव आंबेडकर सारखे शिक्षकही येथेच त्यांना भेटले. त्यांचे आडनावही त्यांच्या आंबेड या गावावरून तयार झाले होते. ते आडनाव सुटसुटीत वाटल्याने त्यांनी बाबासाहेबांनापण सुचवले. तो पर्याय योग्य वाटल्याने शाळेतील दाखल खारीज रजिस्टर मध्ये १९१४ क्रमांकावर तसे नोंदवण्यात आले. शाळेत येण्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी त्यांचे काही शिक्षण घरीच घेतले होते. त्यामुळे बाबासाहेब शाळेच्या त्या रजिस्टरमध्ये मोडी लिपीमधील स्वाक्षरी करू शकले.

लहानपणी त्यांचे नाव भीमा/भिवा असे होते. “भिवा रामजी आंबेडकर” अशी स्वाक्षरी असलेले ते रजिस्टर शाळेने प्राणपणाने जपून व लॅमिनेशन करुन ठेवले आहे. अभ्यागतांसाठी झेरॉक्स केलेल्या स्वरूपातील प्रत तयार केलेली आहे. आंबेडकर गुरुजी मंगळवार पेठेतील व्यंकटपुरात राहत. बाबासाहेब १९४८ मध्ये मजूर मंत्री झाले, तेव्हा गुरुजींना भेटण्यासाठी साताऱ्याला व्यंकटपुरातील घरी गेले होते…
हा दिवस “विद्यार्थी दिवस” म्हणून जाहीर झाल्यामुळे या दिवसाला अधिकच उजाळी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जन्मभर विद्यार्थी होते. जन्मभर त्यांचा प्रचंड अभ्यास सुरु होता. त्यांच्याइतका पुस्तकांचा व्यासंग जगत क्वचितच कोणाचा असू शकेल. उपाशी राहून, पदरमोड करून, काटकसर करून त्यांनी एकेक पै जमा करून त्यातून अनेक पुस्तके विकत घेतली.

त्यांनी १९३० मध्ये वैयक्तिक पुस्तकांसाठी राजगृहासारखी इमारत बांधली होती, त्यात सुमारे ५० हजार ग्रंथांची संपदा होती. असे ग्रंथप्रेमाचे उदाहरण जगातही सापडत नाही…
अभ्यासू बाबासाहेब हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम आदर्श आहेत. प्रज्ञा, शील, करूणा यांचा त्यांच्यात झालेला संगम विद्यार्थ्यांना नक्कीच अनुकरणीय आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर जोपासलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, वैज्ञानिक दृष्टीकोण इत्यादी गुण विद्यार्थ्यांमध्ये लहानपणीच रुजणे आवश्यक आहे. सध्याचे शिक्षण हे विद्यार्थीकेन्द्री आहे. त्यामुळे या दिनाच्या निमित्ताने त्याविषयीसुद्धा उहापोह केला जाईल. या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांद्वारे बाबासाहेबंसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जास्त ओळख होत राहील.

येथे २००० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या शाळा प्रवेश दिनाचे महत्व येथील तरुण पत्रकार अरुण विश्वंभर जावळे यांनी जाणले. ते येथील प्रवर्तन चळवळीच्या माध्यमातून गेली १५ वर्षे ते या दिवसांचे महत्व स्थानिक तसेच राज्य व देश पातळीवर लोकांना पटवून देत आहेत. त्यासाठी भ्रमंती करीत आहेत. यासोबतच १५ वर्षांपासून दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी या शाळेत व साताऱ्यात हा शाळा प्रवेश दिन ते साजरा करीत असतात. त्यांच्या त्या कार्यक्रमाला भारतभाऱ्यातून मोठमोठ्या व अनेक व्यक्ती हजेरी लावत असतात व येथील भूमीला आणि वास्तूला वंदन करीत असतात. त्यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रभर इतर अनेक ठिकाणी काही वर्षांपासून बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिवस साजरा केला जात आहे.

यासोबतच शासकीय पातळीवरून या दिवसाला मान्यता मिळावी यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न चालवले होते. निरनिराळे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री व इतर लोकप्रतिनिधी यांच्या सतत भेटी घेणे, या दिवसाचे महत्व समजावून सांगणे, त्याविषयी निवेदने देणे असे त्यांचे प्रयत्न सुरु होते. २०१४ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने हा दिवस सातारा जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये साजरा करावा असा ठराव संमत केला होता. तसेच याविषयी राज्य शासनास प्रस्ताव पाठवण्याचे सुद्धा ठरवण्यात आले होत. गेल्या वर्षी बाबासाहेबांच्या १२५ व्या जन्मदिनानिमित्त या प्रयत्नांना अधिकच वेग आणि धार आली होती. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी गेल्या वर्षी या शाळेस भेट देऊन हा दिवस “बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन” म्हणून जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर यावर्षी बाबासाहेबांच्या १२५ व्या जन्मवर्धापन महोत्सवाचे निमित्त साधून या दिनाच्या विविध नावांवर विचार होऊन “विद्यार्थी दिन” जाहीर केला गेला.

या दिवशी शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात शासनादेशात सांगण्यात आले आहे. हा दिवस अधिकाधिक शाळांमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेणे, त्या दिवसाच्या आधीच शाळांच्या मुख्याध्यापकांना भेटून त्यांना शासकीय परिपत्रकाची व या दिवसाच्या महत्त्वाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटत आहेत. अनेक राज्यांमध्ये सुद्धा हा दिवस “विद्यार्थी दिन” म्हणून राबवण्याची चर्चा आणि तयारी सुरु झाली आहे. हा उत्स्फूर्त पुढाकार पहाता लवकरच इतर राज्यांमध्ये सुद्धा व केंद्रीय स्तरावरून हा दिवस साजरा करण्याचे आदेश लवकरच निघू शकतील, असे दिसते.
(मुक्तीदाता विशेषांक)

राज्य सरकरने तीन वर्षांपूर्वी सात नोव्हेंबर हा दिवस डॉ. आंबेडकर विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला. आता देशभरात दिवस साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा करावी, या मागणीसाठी राज्यभरातून एक लाख वीस हजार पत्रे पाठविणार असल्याचे विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा साताऱ्यातून शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ झाला. सात नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन “विद्यार्थी दिवस’ म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून शासन स्तरावर साजरा करण्यासाठी १५ वर्षे राज्य सरकारकडे आग्रह धरला. या आग्रहाला दाद देत सरकारने तीन वर्षांपूर्वी विद्यार्थी दिवस घोषित केला. 

आता विद्यार्थी दिवस देशभरात साजरा करण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी अधिकृत घोषणा करण्याची आवश्‍यकता आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि चालना देण्याच्या दृष्टीने “विद्यार्थी दिवस’ साजरा होणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे जावळे यांनी सांगितले. 

जावळे म्हणतात, सात नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन महाराष्ट्रभर साजरा व्हावा यासाठी मी १६ वर्षे धडपडलो. डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने राज्यभर १२५ व्याख्याने देऊन त्याद्वारे डॉ. आंबेडकर शाळा प्रवेशाचे महत्व अधोरेखित करत राहिलो. मुंबंई चैत्यभूमी येथे १२५ विद्यार्थ्यांसमवेत जलसमर्पण करण्याचा इशारा देत राहिलो. तेव्हा कुठे महाराष्ट्र शासन हडबडले आणि २७ अॉक्टोबर २०१७ ला सात नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे घोषित केला. विशेष म्हणजे मी जो ड्राप्ट महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द केला होता त्यातील शब्दना शब्द घेऊन शासनाने अध्यादेश काढला. खरंतर हा दिवस माझ्या उभ्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा दिवस ठरला !

शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्षात राबवलेल्या १२५ व्याख्यान अभियानाची सुरुवात जेष्ठ विचारवंत तथा साहित्यिक, प्राच्यविद्यापंडित, संस्कृतचे गाढे अभ्यासक, इतिहास संशोधक अशी कितीतरी विशेषणे लावता येतील असे डॉ. आ.ह. साळुंखे अर्थात तात्या यांच्या उपस्थितीमध्ये झाली. महत्वाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आईच्या नावाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या भीमाबाई आंबेडकर या ऐतिहासिक हायस्कूलमध्ये माझा हा कार्यक्रम झाला. संबोधी प्रतिष्ठानचे प्रमुख प्राचार्य अण्णासाहेब होवाळे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

हे सारं सविस्तर सांगण्याचे कारण असे, सात नोव्हेंबर हा दिवस भारत सरकारने देशभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा असा आग्रह दिल्ली दरबारी डिसेंबर २०१७ पासून मी धरलेला आहे. परंतु या तीन वर्षात भारत सरकारकडून हवा तसा फिडबॕक अद्याप मिळालेला नाही. म्हणून १ लाख २५ हजार पत्रे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना पाठविण्याची भूमिका मी घेतली आहे. या मोहिमेला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून प्रतिसादही मिळतो आहे, याचा मनस्वी आनंद आहेच परंतु हा आनंद व्यक्त करताना मला हे इथे नमूद करायचे आहे की, माझ्या १२५ व्याख्यांनाची सुरूवात ज्यांच्या उपस्थितीत झाली ते डॉ. आ. ह. तात्या यांच्याच पत्रांनी – सह्यांनी माझ्या या देशव्यापी पत्र मोहिमेचा आरंभ आणि प्रारंभ होतोय. खरंतर वयोमानानुसार तात्यांना प्रकृती साथ देत नाही. वैद्यकिय सल्यानुसार त्यांना घराबाहेर पडता येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडी जास्तच काळजी घ्यावयाच्या सूचना आहेत. अशी ‘संवेदनशील’ परिस्थिती असतानाही कमालीच्या स्वयंविश्वासाने तात्यांचा दिनक्रम उगवतोय आणि मावळतोय. कधी खुर्ची तर कधी बेड यावर बसून नव्या क्रांतीचे स्वप्नभान नव्या पिढीला ते देत आहेत. तात्यांचे हे योगदान, प्रोत्साहान माझ्या काळजात चिरंतन राहील. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत !

जावळे पुढे म्हणतात, हा दिवस तब्बल १५ वर्षे अत्यंत उत्साहात साजरा करत आलो. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयात तो शासनाच्या माध्यमातून साजरा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनापासून ते मंत्रालय स्तरापर्यंत सर्व पातळ्यावर लढलो. अखेर २०१७ ला माझ्या लढ्याला यश आले. ७ नोव्हेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस महाराष्ट्र सरकारने विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला. त्यासंबधीचा जीआर काढला. विशेष म्हणजे मी जे ड्राफ्टिंग केले त्यातला एकही शब्द न वगळता आहे त्या शब्दानिशी शासनाने जीआर काढला. असो !

तीन वर्षापासून हा दिवस महाराष्ट्रभर उत्साहात साजरा होतोय. याही वर्षी होतोय. सूट्ट्या असल्यातरी या दिवसाचे महत्व ओळखून कार्यक्रम होत आहेत. खूप छान वाटते आहे. खूप समाधान आणि आनंद होतोय. एक अत्यंत मौलिक कार्य आपल्या हातून घडले याचा अभिमान डोळ्यातून ओघळणा-या पाण्यातून निश्चितच पाझरतोय. आपल्या सदिच्छा असुद्यात पाठीशी. अजून खूप लढायचंय आणि जगायचंय !

हा दिवस महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी अनेक वर्षे महाराष्ट्र सरकारकडे आपण आग्रह धरला होता. सुशीलकुमार शिंदे पासून ते देवेंद्र फडणवीस यापर्यतच्या मुख्मंत्र्यांना भेटून वेळोवेळी आपण आपली भूमिका स्पृष्ट केली होती.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आपण आपला आग्रह अधिक प्रखर केला. मुंबई चैत्यभूमी येथे १२५ विद्यार्थ्यांसोबत जलसमर्पण करण्याचा इशारा महाराष्ट्र शासनाला दिला. त्यानंतर मंत्रालय प्रशासन हडबडले आणि महाराष्ट्र शासनाने अखेरीस २०१७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला. विशेष म्हणजे मी जो ड्राफ्ट शासनाकडे सुपूर्द केला तो जसाची तसा शब्दशःमान्य करत त्याच श्ब्दांंचा ‘विद्यार्थी दिवसाचा’ अध्यादेश शासनाने काढला.

आता हा विद्यार्थी दिवस भारतभर व्हावा यासाठी दिल्ली दरबारी आपण शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवलेत. केंद्र शासनाजवळ आपली भूमिका आग्रहाने मांडत आहोत. केंद्राच्या शासन यंत्रेणीशी चर्चा करतोय. दिल्लीत जाऊन विचारना केली की ‘निर्णय होईल’ असे वेळोवेळी संबधित यंत्रणेकडून आपणास सांगितले जात आहे. परंतु निर्णय अद्याप काही होत नाही, झालेला नाही. या एकूण पार्श्वभूमीवर केंद्रसरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी १ लाख २५ हजार पत्रे दिल्ली सरकारला राज्यभरातून आपण पाठवतो आहोत. यातील काही पत्रे ही रक्ताने लिहितो आहोत. तेव्हा आपणाला जर वाटत असेल की ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस भारतभर व्हावा तर आपणही एक पोस्ट कार्ड घ्या आणि त्यावर “सात नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा सपूर्ण भारतात ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा व्हावा, ही नम्र विनंती ” असा मजकूर साध्या पेनने लिहा व त्याखाली तुमची सही करा. हा मजकूर हिंदीतही लिहा आणि सदरचे पोस्टकार्ड राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्र्यांच्या नावे दिल्लीला पाठवून द्या. आपल्या या एका कृतीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन अर्थात ‘विद्यार्थी दिवस’ भारतभर होण्यास मदत होणार आहे.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
८.११.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *