ऋतु हा गुलाबी…!

शरद ऋतुत बोच-या थंडीची चाहूल,तनाममाला प्रफुल्लीत करते…पावसाळा,हिवाळा आणि उन्हाळ्याचा त्रिवेणीसंगम म्हणजे शरद ऋतु…पावसाळ्यातील सत्तावीस नक्षत्रांपैकी तीन नक्षत्र शरद ऋतुत येतात.या वेळी सूर्याची किरण अगदि सोनेरी वाटू लागतात रुपेरी ऊन्हं अंगभर पांघरुन सर्वत्र थंडीचा गुलाबी माहोल मदहोश करतो…तेव्हा वा-याची प्रत्येक झुळूक शराबी वाटू लागते.

हिरवेगार डोंगर,धुक्यात हरवलेल्या तरु लतिका.गंधफूले माळून सजलेल्या रानवाटा,तो मंत्रमुग्ध करणारा नजारा,पाहातांना श्वास ऋतुगंधीत होतात…हळव्या मनातील संवेदना जागवतात.गुलाबी गारव्यात सख्या साजनाचा ऊबदार स्पर्श तनामनाला वेडावतो…रानावनात पानापानावर गारठलेले दवबिंदू…शुभ्रफुलांचा चांदणवेल घरट्यातील पाखराची कुजबूज…चोचीतले आर्त स्वर…प्रणयगंधीत मलमली पहाट…धुक पांघरुन सजलेले डोंगर…पानांना छेडणारा खट्याळ रान वारा…सोन रंगाचाचा शेला पांघरुन तटस्थ ऊभा चाफा…यौवनाने मूसमूसलेला प्राजक्त…जाई जुईचा,चमेली,शेवंतीचा मन भुलवणारा दरवळ…अनुभवतांना हाच अलौकीक सौद्यर्यांचा ऋतु आहे की काय असा क्षणभर भास होतो.


खरचं या मंतरलेल्या,प्रेमरसाने ओतपोत भारलेल्या गुलाबी गारव्यात सार काही गुलाबी गुलाबीच दिसतच.मन सुध्दा गुलाबी गारवा माळून सजत.पाहाट गुलाबी,कीलबील गुलाबी,मंजूळनाद,प्रसन्नता गुलाबी,भांबावलेले सूर अन क्षण सारे गुलाबी.ताल गुलाबी,लय ही गुलाबी,शायरी गुलाबी,कविता गुलाबी,लज्जा ओठावर अन् लाली ही गुलाबी,ते अधिर स्पंदने…पाणावलेले नयन…नकळत झालेली ती भेट गुलाबी..तूझे हसणे गुलाबी,रुसणे ही गुलाबी…प्रेमात तुझ्या माझे गीत गुलाबी,या कातरवेळी ओढ गुलाबी,विरह गुलाबी,का कळेना तुला माझी आर्तसाद गुलाबी?हा ऋतुंचा झुला…अलबेला मौसम गुलाबी,मी ही गुलाबी…आता होशील जरा तू ही गुलाबी?


झाकोळून आलेल्या क्षितीजाला आपल्या कवेत घेत उत्कट गुलाबी गारवा अलगद कूस बदलतो.नवंचैतन्य चराचरात विसावत.सौदर्यं झाडाफूलात यौवनात बहरत…ही गुलाबी थंडी घेऊन येते दिवाळीची चाहूल…सासुरवाशिणीला माहेरची ओढ लागते…गुलाबी गारव्यात मनाला नव्यास्वप्नांचे वेध लागतात स्वप्नांना डोळ्यात सजवतांना ही गुलाबी थंडी खुप आवडायला लागते.

rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *