लोहा;प्रतिनिधी
लोहा-कंधार तालुक्यातील जानापुरी येथील शहीद संभाजी कदम हे दि.२९/११/२०१६ रोजी जम्मु कश्मिर नगरोठा येथे आंतकवादी हल्यात शहीद झाले आहेत.या शहीद जवानाने देशासाठी दिलेले बलिदान स्मरणीय राहावे यासाठी लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयास शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यासाठी माजी सैनिक मागील सहा महीन्या पासून मागणी व संघर्ष करत आहोत.परंतु आज पर्यंत यांच्या मागणीला प्रशासनाच्या वतीने कसल्याच प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्याने २७ नोव्हबर रोजी महाराष्ट्रातील माजी सैनिक लोहा येथे उपजिल्हा ग्रामिण रुग्णालया समोर धरणे अंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
लोहा येथिल उपजिल्हा रुग्णालयास शहीद जवान संभाजी कदम यांचे नाव देण्यासाठी माजी सैनिक गेल्या सहा महिन्यापासुन अनेक अमदार खासदार,मंत्री यांची भेट घेऊन मागणी करत आहेत.परंतु यांच्या या मागणीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने माजी सैनिकांने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ नोंव्हबर २०२० रोजी शहीद दिवस आहे.त्यामुळे शहीद संभाजी कदम यांनी देशासाठी दिलेल बलिदान व माजी सैनिकांच्या भावना लक्षात घेऊन दि.२५ तारखेपर्यंत लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयास शहीद जवान संभाजी कदम यांचे नाव देवून माजी सैनिकांच्या मागणीला न्याय द्यावा अन्यथा दि.२७ नोंव्हेबर रोजी महाराष्ट्रातील माजी सैनिकांच्या वतीने लोहा येथील उपजिल्हा ग्रामिण रुग्णालया समोर दि.२७ नोंव्हेबर दुपारी ठिक १२ वाजवल्या पासून धरणे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा जिल्हा चे आधक्षे श्री बालाजी चुकलवाड यांनी आपल्या निवेदना द्वारे दिला आहे.