शिक्षकांचा नाद करायचा नाय!

मास्तरड्यांनो जरा जास्त काम कराल तर मराल काय?

सहा नोव्हेंबरला भूमिपूत्रांचा मित्र लोकपत्र या मराठी दैनिकात उपरोक्त शिर्षकाचा अग्रलेख छापून आला. अत्यंत असभ्य भाषेत हा लेख असून तो इतक्या त्वरेने व्हायरल झाला की, महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. सात तारखेला सर्वत्र सोशल मीडियात ही एकच पोस्ट फिरत राहिली. केवळ शिक्षकांप्रती असलेल्या आकसापोटी हा लेख लिहिला आहे. पिसाळलेल्या कोरोना काळात कुणालाही काय करावे आणि काय करु नये याचे साधे भान‌ उरले नाही, मृत्यू कोणत्याही क्षणी दार ठोठावेल अशा भयावह काळातही शाळा बंद असतांना विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते. परंतु या वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादकाने जाणिवपूर्वक जे लिहिले ते माफीलायकीचे नाही. त्याच्या कुटुंबातही शिक्षकांचा द्वेषच केला जातो. इतके हे तहकीक कुटुंब शिक्षकद्वेष्टे आहे. मागे या महाशयांनी जगद्गुरु तुकोबांराय यांच्याबाबतीतही आक्षेपार्ह लिखाण केले होते. शिक्षकांविषयी घाणेरड्या भाषेत हा अग्रलेख असून ही कृती केवळ वृत्तपत्राची होळी, तोंडाला काळे फासून, गुन्हा नोंदवण्याचे निवेदन देऊन किंवा कोणतेही आंदोलन करुन निषेध नोंदवण्यापुरती नाही तर अशा वृद्ध असला तरी तुकोबांच्याच भाषेत अशा नराधमाला शाळेत नेऊन नागडे करुन मोजता येणार नाहीत इतक्या पैजरा मारल्या पाहिजेत, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

सोशल मिडियात आणि शिक्षक संघटनांत मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. प्रतिवाद करतांना संबंधित दैनिकाने lockdown काळात सर्व वर्तमानपत्र सुरू होते आह्मी खरे काम केले आणि आई ची शप्पथ घेऊन सांगा किती शिक्षकांनी covid सर्व्हिस नीट केली असे म्हटले.

अनेक ठिकाणी विविध संघटनांनी निवेदने देऊन निषेध नोंदविला. तर सोशल मीडियावर निषेध प्रतिक्रियांचा पाऊसच पडला. इथे काही प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत, त्या अशा…

🏴

🟣 शाळा बंद असताना शिक्षकांनी ही कामे शाळास्तरावरून व घरातून केली. उघडा डोळे बघा नीट. माहितीस्तव

१) कोरोना चेक पोष्ट नाक्यावर ड्युटी
२) ऑक्सिजन पुरवठा ड्युटी
३) कुटूंब सर्वेक्षण
४) वार्षिक निकाल
५) पटनोंदणी, विद्यार्थी प्रवेश, प्रमोशन
६) शाळा सोडल्याचे दाखले
७) बदली बाबत माहिती
८) यु- डायस सर्टीफाय करणे
९) दिव्यांग प्रोत्साहन , मदतनीस भत्ता
१०) योगदिन साजरा करणे
११) जनगणना शिक्षक माहिती
१२) दरमहा शिक्षण परिषद
१३) शा. पो. आहार वाटप, अहवाल
१४) शा. व्य. समिती दरमहा मिटींग
१५) गुगलमीट ऑनलाईन तास
१६) ऑनलाईन पालक सभा
१७) ऑनलाईन उपक्रम व स्पर्धा
१८) व्हीडीओ, PDF, तयार करणे
१९) ऑनलाईन टेस्ट तयार करणे
२०) रोटरी क्लब मार्फत प्रशिक्षण
२१) शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण
२२) विज्ञान जाणीवजागृती प्रशिक्षण
२३) मैत्री गणित विज्ञानाशी
२४) गोष्टीचा शनिवार
२५) अध्ययन अध्यापन अहवाल
२६) बालरक्षक माहिती
२७) बालकाचे हक्क व सुरक्षितता
ऑनलाईन प्रशिक्षण
२८) इन्स्पायर अॅवार्ड माहिती
२९) कोविड जनजागृती
३०) कुटूंब फॉर्म भरणे
३१) बेसलाईन टेस्ट सोडवणे
३२) ४% सादील ऑडीट
३३) समग्र शिक्षा अभियान ऑडीट
३४) मोफत पाठ्यपुस्तके वाटप
३५) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
३६) हात धुवा दिन
३७) वाचन प्रेरणा दिन
३८) बारदान विक्री भरणा
३९) फेसबुक लाईव्ह मिटींग
४०) ऑनलाईन विज्ञान प्रशिक्षण
४१) शैक्षणिक प्रक्रिया माहिती
४२) स्थलांतर विद्यार्थी माहिती
४३) Thank a teacher अभियान
४४) रा. शै. धोरण स्पर्धा
४५) विज्ञान कीट वापर प्रशिक्षण
४६) मुख्या. झुम मिटींग
४७) नवोपक्रम अहवाल लेखन
४८) एक तास कोरोनासाठी जागृती
४९) माझे कुटूंब माझी जबाबदारी
५०) ५०% शाळेवर उपस्थिती
५१) स्वाध्याय उपक्रम माहिती
५२) कृतीपत्रिका माहिती
५३) अॅनिमिया मुक्त भारत
५४) फटाका मुक्त दिवाळी
५५) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
५६) नवोदय फॉर्म भरणे
५७) शिष्यवृत्ती फॉर्म भरणे
इत्यादी……………………

🏴 या वर्तमानपत्रात श्री. रविंन्द्र तहकिक यांनी संपादकीय लेखात शिक्षकांविषयी खूपच वाईट शब्द वापरलेत….मास्तरड्यांनो….आणि खूप काही मी रविन्द्र तहकिक यांना काही प्रश्न विचारते…..
१) सर आपण शाळेत कधीच शिकले नाही का??
२) आपल्या घरातून आपल्यावर संस्कार झाले नाहीत ही खूपच खेदजनक बाब….जर संस्कार झाले असते तर आज आपल्या हातातील पवित्र लेखणीतून गुरुंबद्दल अनुउद्गार आले नसते??
३) आपल्या कुंटुंबातील कुणीही शिक्षक या पवित्र कार्यात नसल्यामुळे आपणांस या पवित्र कार्याची माहिती नसावी??
४) आपली मुल शाळेत शिकली नसावीत म्हणून आपणांवर ही वेळ आली का?
५)आपल्यासारख्या अशिक्षित व्यक्तीस लोकमित्रचे संपादक म्हणून का नेमण्यात आल हा फारच मोठा गहन प्रश्न आहे अस वाटत?
६)या कोरोना काळात कोरोना वाॅरियर्स म्हणून राबणा-या शिक्षकांच्या कामाची आपण का करुन घेतली नाही?
७)या लाॅकडाऊन काळात शाळा बंद पण शिक्षण सुरु आहे याची आपणांस माहिती आहे का??
८)सर्व शिक्षकांनी विडा उचलला तर आम्ही आपणास कुठूनही उचलू शकतो हे आपणांस माहिती आहे का??
९)सध्या महाराष्ट्रात ख-या अर्थाने जनतेच राज्य आहे हे आपणांस माहित आहे का??
१०) आपणांकडे संपादकीय म्हणून लिहण्यासाठी काहीच विषय नसल्यामुळे आपण या विषयाची निवड केली का??
११)आपल्या या संपादकीयास आम्ही पवित्र कार्य करणारे शिक्षक दुर्लक्ष करतील अस वाटल का?
१२)नशीब आपल आपण या काळात जन्म घेतला ४०-५० वर्षापुर्वी हा लेख लिहिताना ज्या हातात कलम घेतला तो हात कलम केला गेला असता?
१३)आपल्यासारख्या संपादक असणारे निकृष्ट प्रतीच वर्तमानपत्र कुणी वाचत नसावच पण यापुढे कुणीही वाचणार नाही??
१४)महात्मा फुले,माता सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती नसणारी व्यक्ती उच्च पदावर कशी काय गेली??
१५)आपल्याला मानसिक आजार झाला आहे याची आपणांस कल्पना आहे का?
१६)सर आपल्या विकृत वृत्तीकडून काय अपेक्षा करणार??आपली कीव येतेय मला??

🏴
आपल्याला एवढी काळजी वाटते , आम्ही शिक्षक काही करत नाही घरी बसून खातो असे वाटत असेल तर तुम्ही शिक्षकी पेशा का नाही स्वीकारला , शिक्षकी पेशा म्हणजे फक्त मजा करा आणि फुकटचा पगार खा असे वाटत असेल तर आपण पत्रकार होण्याच्या लायकीचे नाहीत . देश घडविणाऱ्या गुरू बद्द्ल ही वाक्य अशोभनीय आहेत, सुट्ट्या काय फक्त शिक्षक वर्गाला नाहीत , सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, पासून ते शिपाई या पदांसाठी शिक्षकांपेक्षा जास्त सुट्ट्या आहेत.
तुम्हाला शिक्षकांबद्दल एवढी घृणा वाटत असेल तर उत्तम शिक्षक बनून आपण दाखवावे

🏴
तू खरचं हाडाचा पत्रकार आहेस की पैसे खाऊन लेख लिहिणारा आहेस??
प्रसिद्धीसाठी कसलीही भाषा….
Lockdown काळात आरोग्य आणि पोलीस कर्मचार्यांसोबत जीव धोक्यात घालून कामे करणारे शिक्षक च आहेत,
Lockdown मध्ये घरातून बाहेर पडण्याची हिम्मत तर होती का तुझ्यात..जीव मुठीत घेऊन बायकोसोबत चाळे करत घरात बसला होता की रे तू…
यापलीकडे काय बोलावे….

🏴
बाकी जाऊ द्या … पण मला हे नाही कळाले गुरुजींच्या अंडरवियर इम्पोर्टेड असतात हे आपणास कसे समजले….. आपण तर फारच हुशार पत्रकार आहात…. थेट गुरुजींच्या अंडरवेअर पर्यंत आपण शोध मोहीम राबवली……..त्यामुळे आपण शोध पत्रकारितेमध्ये सीरिया तुर्की इराक अजरबैजान सोमालिया यासारख्या ठिकाणी जाऊन उत्कृष्ट काम करू शकता इकडे आपल्याला जास्त वाव आहे….. एवढ्या छोट्याशा गोष्टींच्या नादी कुठे लागता

🏴
पत्रकार नावाला हा माणूस काळिमा आहे…….आपण ज्या शिक्षकांच्या मुळे पत्रकार झालो त्या शिक्षणाविषयी तरी तू कृतज्ञ असायला हवं होतंस वाचाळा….. आणि काही माहिती नसताना बरळन म्हणजे,”अनंत वाचाळ बरळती बरळ”…………..निश्चितच हा बालपणी गाढवाच दूध पिलेलं असावा….आईचं पिला असता तर असे संस्कार नसते झाले या गाढवावर…….

🏴


दैनिक लोकपत्र मध्ये छापून आलेल्या लेखामध्ये शिकक्षका बद्दल केलेल्या हवामान कारक अमानवीय अशोभनीय मानवतेला काळीमा फासणारी भाषा वापरून शिक्षकाची आगना करण्यात आली सदरील लेखकांनाही त्यांची लायकी काय आहे हे स्वतःहून सिद्ध केले आहे एवढेच नव्हे तर दैनिक लोकपत्र चे सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलेला आहे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक दैनिक लोकपत्र कधीच वाचणार नाही आणि आपल्या संपर्कातील लोकांना लोकपत्र वाचू नये अशाप्रकारे सांगेल माझी लोकपत्र समूहाच्या प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब संबंधित लेखकाला पत्र मधून बडतर्फ करून महाराष्ट्रातील तमाम शिक्षकाची सर्व मीडियाच्या माध्यमातून जाहीर माफी मागावी

🏴
लोकपत्र संपादक,
तुझी लेखणीतून निघालेली भाषा”मास्तरड्यानो”ही गुरूंनी दिलेल्या संस्कृतीची भाषा नाही.
तू लक्षात घे,प्रथम गुरू आई,नंतर गुरूजी ,आज ज्यांना मास्तरड्यानो म्हणतो आहेस ते त्यांनी तुझ्या बरोबरच आपल्या सर्व शिष्यांना आपल्या मुलाप्रमाणे शिक्षण दिले आहे, देत आहेत देतीलच. तेव्हा तू मातेचे पांग कसे परत करत आहेस ते जाणून घे.तू कुणाचा पुत्र होऊ शकत नाहीस.
आज जे लिहीतो आहेस, जे चरितार्थ चालला आहे तो यांमुळे तेव्हा आत्मपरीक्षण कर.तुला शाप देण्याची गरज नाही. तू त्याचे फळ चांगले चाखशील.
स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही.

🏴
या वृत्तपत्राच्या एकाही पोस्टवर 10 सुद्धा लाईक्स नाहीत.हा पेपर वाचत कोण..फक्त चर्चेत येण्यासाठी असा फुटकळ प्रयत्न केलेला दिसतोय..याला याच्या लायकी पेक्षा जास्त महत्त्व द्यायची गरज वाटत नाही. हा जर खरंच संपादक असता तर शाळा बंद असतानाही शिक्षकांनी ज्ञान दानाचे काम कसं सुरू ठेवलंय हे या भ्रमिष्टाला समजलं असतं.

🏴
अर्णव गोस्वामींची पिलावळ मराठी पत्रकारितेत पण आहे …हा लेख वाचून लक्षात आले…कोरोनात संपादक साहेब तुम्ही घरात लपून बसले असताना पोलीस विभाग,वैद्यकीय विभाग तसेच शिक्षण विभागातील कर्मचारी जोखीम घेऊन काम करत होते… प्रसिद्धीसाठी बातम्या द्यायच्यात तर भ्रष्टयाचाराच्या द्या…त दम असेल तर

🏴
तुझी नेमकी अडचण काय आहे…
त्यांच्या पायातल्या चपला खूपताय… की कपडे..
गाडी खुपतेय …की त्यांचे सुधारलेले राहणीमान…
तुझी इच्छा काय आहे नेमकी..
त्यांनी असच सायकलवर जावं शाळेत…?

पोलिसांच्या सोबत चेक पोस्ट वर केलेली ड्युटी तुला दिसली नाही कधी?
आरोग्य खात्यासोबत घरोघरी जाऊन केलेला सर्वे दिसला नाही डोळ्यांना..?
तांत्रिक ज्ञान आत्मसात करून वेगवेगळे विडिओ, apps, तयार करणारे गुरुजनांची धडपड दिसली नाही कधी …?
डोळे उघडे ठेवून बघायला शिक.

🏴
हा करंट्या संपादक आहे तरी कोण, याला लाज कशी वाटली नाही अशा अर्वाच्च भाषेमध्ये लिहायला, ज्या गुरूंनी याला लिहायला शिकवलं त्याच लेखणीतून ही अशी गुरुदक्षिणा देत आहेस, आमच्या किती शिक्षकांनी ड्युटी केली हे माहीत तरी आहे की तुला..
ह्या संपादकावर त्वरित गुन्हा दाखल करावा, व त्या वृत्तपत्रावर देखील बंदी आणावी..

🏴
सध्याच्या कोरोना काळात पोलीस, डॉक्टर यांच्यासोबत दिवसरात्र फक्त एकच माणूस सोबत तो म्हणजे शिक्षक.. त्यावेळेस तुमच्या डोळ्यांना हे नसेल दिसले, त्यावेळेस तुमच्या लेखणीला हे सुद्धा लिहायला नसेल जमले यावरूनच तुमची आणि तुमच्या पत्रकारितेची पातळी सर्वांना समजली..

🏴
तुझ्या ( तुमच्या) या अर्धवट माहितीवर लिहिलेल्या लेखाचा जाहीर निषेध करतो.

भाऊ तू एक दिवस कोरोना पेशंट असणाऱ्या ठिकाणी ड्युटी करून बघ , मग अनुभव लिही.आमचे शिक्षक हे काम कित्येक दिवस झालं हे करत आहेत.तुझ्या (तुमच्या ) सारख्या (चांगल्या) पत्रकाराला कसे दिसणार.

एका (चांगल्या) पत्रकाराला असले लिखाण शोभा देत नाही.

जाहीर निषेध

🏴

इथून पुढे लिहिताना विचार करून लिहा

[08/11, 1:55 PM] gangadhard2011: शाळा गृहभेटी ,
ऑनलाईन शिक्षण ,
offline कागदपत्रे ,
कोरोना सर्वेक्षण (कोणतेही किट नसताना ) पोलिसमित्र ड्युटी ,
कोविड सेंटर ,
क्वारंटीन सेन्टर ड्युटी ,
हजारभर ऑनलाईन च्या लिंक वरील माहिती रोज देने.
स्व खिशातून खर्च करून 5 ते 10 वाड्यात जाऊन मुलांना स्वाध्याय वाटप ,घरचा अभ्यास देने.
सुट्टीत जेंव्हा पत्रकार घरातून काम करत होते तेंव्हा समस्तरडे मुलांना 34 दिवसाचा व 60 दिवसाचा धान्य वाटप कार्यक्रम जीव धोक्यात घालून करत होते. हे शिक्षक अजिबात करत नाहीत पत्रकार करतात

🏴
या काळात शिक्षकांनी जास्त काम केले आहे. चेक पोस्ट, ग्रामकृतीदल, नियंत्रण कक्ष, ग्राम सर्वेक्षण इ. कित्येकदा नाईट ड्युटी करावी लागली आहे. कित्येक शिक्षक कोरोना ड्युटी करत मृत्युमुखी पडले आहेत. त्यातील काहींना तर पेन्शन देखील नाही. त्यांची कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडली आहेत.

या ड्युट्या करताना शाळा बंद असली तरी शिक्षण सुरू ठेवण्याचे काम शिक्षक करत आहेत. कित्येक शिक्षकांनी स्वतः मुलांचे फोन racharge करत अध्यापन करण्याचे काम केले आहे. आजही अनेक ठिकाणी रेंज नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी, मोबाईल नसणे अशा परिस्थितीत सुद्धा शिक्षक काम करतच आहेत.

ज्या शिक्षकांनी या संपादक महाशयाला शिकून शहाणं केलं, लिहायला-वाचायला शिकवलं. त्याला चड्डी नीट घालता येत नव्हती त्या काळात वागावं कसं बोलावं कसं हे सांगितलं. त्या शिक्षकांबद्दल एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन व्यक्त होणं निंदनीय आहे. मते असू शकतात ती मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे; परंतु ती मांडण्याची याची पद्धत100% चुकीचे आहे।
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गुहागरच्या वतीने याचा आम्ही तीव्र निषेध करतो!*

कोषाध्यक्ष-
महा. राज्य प्राथ शिक्षक संघ, गुहागर ।
➡️👎🏻👎🏻👊🏻👊🏻◻️◻️

🏴
ज्याला लिहायला वाचायला ज्या गुरुजींनी शिकवले त्यांच्याबाबत असे लेखन करताना लाज नाही वाटली का ? लेखातील भाषेवरून यांची लायकी समजते.अशा पेपरवर बहिष्कार टाकावा आणि यांना त्यांची जागा दाखविणे योग्य आहे.आम्ही कोरोना संकट कालावधीतही किती कामे केली हे पहायला याचे डोळे फुटले असणारं.अशा प्रवृत्तींचा जाहीर निषेध.👎🏻👎🏻👎🏻👎🏻

🏴
वर्तमानपत्रात वापरलेल्या असभ्य भाषेचा जाहीर निषेध ! स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. परिपूर्ण माहिती घेऊन लिखाण करत जा. असे बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन मांडू नका.
शिक्षकांचे विद्यार्थी व समाज यासाठी चे योगदान याचा सर्वंकष विचार करा व लेखन करा .
कावीळ झालेल्या माणसाला जसे पिवळं दिसतं तसं तुमची गत झालेली दिसते. दृष्टिकोन बदला. नसेल बदलत तर पोटदुखी च्या गोळ्या घ्या.

🏴
संपादक दैनिक लोकपत्र,
तुमचे दैनिक वाचतात तरी किती लोक? का फक्त प्रसिद्धीसाठी तुझ्या मनात येईल ते लिहतोस. एक लक्षात ठेव आम्ही तू म्हणतोस तसे जुन्या काळातील शिक्षक नाहीत. कोणीही उपटसुंभ वाट्टेल ते बोलेल आणि आम्ही ऐकून घेऊ. तुला शिक्षकांबद्दल एवढी चीड का आहे?
तुझी लेखातील भाषा तुझी काय लायकी आहे ते तू दाखवून दिलेस. सगळ्यांना सारखे समजू नका. (तू ज्याप्रकारे तुझ्या लेखात भाषा वापरलीस त्यामुळे मला पण आशा प्रकारे भाषा वापरावी लागली.)

🏴
तू खरेच एका पत्रकाचा संपादक आहेस का??? आणि जर संपादकच असे लेखन करत असेल तर त्यावरून त्या दैनिकाची लायकी कळते…..शितावरून भाताची …….आज संपादक झाला तर माज आलाय तुला……गुरुजींची अब्रू काढायला निघाला……पण हे लक्षात असू दे… या कोरोनाच्या काळात गुरुजींनी काय काय कामे केली हे कधी रस्त्यावर उतरून बघितलं का???पोलिसमित्र बनून दिवसरात्र काम केले…..स्क्रिनिंग सेंटर… क्वारंटाईन सेंटर वर ड्युटी केली….अगदी शासनाच्या कसल्याही प्रशिक्षण व सुविधा नसताना…..त्यावेळी कुठं गेली होती पत्रकारिता…..का एखादा लेख नाही लिहला गुरुजींच्या कामाचा……शिक्षक पगार घेतात कारण ते काम करतात……गेल्या वर्षीच्या दिवाळीत गावी घरच्या लोकांची भेट झाली तेव्हा पासून सलग 1 वर्ष कामावर हजर आहेत गुरुजी……वर्षभरानन्तर सुट्टी मिळते तर तुमच्या बुडाला का कळ लागते?????

🏴
दैनिक लोकपत्र
संपादक, तुम्हाला कोणती नशा चढलेली आहे . तुमची लायकी काय आहे शिक्षकी पेशाबद्दल बोलण्याची तुमच्या मानसिकता कशी आहे ते ओळखून येते….शिक्षकाला उन्हाळ्यात कोरोना चेकपोस्ट ड्युटीवर त्या वेळेस तुम्ही काय कोणाजवळ झोपले होते….

🏴
जाहीर निषेध.
अर्धा डोक्याची व संपूर्ण माहिती नसल्यालेल्या व समाजात वादविवाद घालण्यासाठी व प्रसिद्धी मिळविण्यासाठी आपला हा प्रपंच दिसतोय महाशय . पण परिस्थिती काय आहे काय लिहायला हवे याचे भान असायला हवे. शिक्षक काय करत आहेत हे आपल्या सारख्या बिनडोक माणसाकडून आम्हांला शिकण्याची आवश्यकता नाही .कारण समाजासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी सदैव प्रामाणिकपणे कार्य करत आहोत आणि करत राहणार.

पण वरील लेखामधील शब्द वापरावरुन असे लक्षात येते की तुझी लायकी कोणती आहे. असेच संस्कार तुझ्या स्वतःच्या मुलांवर करतोस का रे. पञकारीका सोडून दे तुझ्यासारख्या माणसाचे काम नाही ते.

🏴
यांना शिक्षकांची कामे माहित नसतिन.कोरोना काळात दुसरा विभाग आम्हा शिक्षण विभागाला कसा राबवून घेतले ते.
आमची कामगीरी आम्ही दिवसभर कामावर राहून प्रामाणिकपणे बजावली हे दिसणार नाही.
यांना आवडतात टेबलवर बसून फाईल अडकवणारे बाबू,त्यांना आबासाहेब आप्पासो दादा भाऊ आण्णा नाना
म्हणून वरून पैसे खाऊ घालतात असे लोकांची यांना फार कदर असते बरं.
आमचे विदयार्थांचे पालक आमचे मुल्यांकन करतील तु कोण भिकारडा आम्हाला शिकवणारा, आम्ही कखगघ शिकवले तेव्हा कुठे लिहता येतय तुला हे विसरलात भाऊ.

🏴
प्रसिद्धी लोलुप जीव असे वक्तवय करत राहतात आधी ग्राउंड लेव्हल वर किती आणि कोणती काम केली याचा विचार करा कोरोना ने मृत शिक्षक आणि कोरोना झाल्यावर उपचाराकरिता कोणी विचारलं सुद्धा नाही तेव्हा तुम्ही कुठे होते पोलीस नाक्यावर ड्युटी करताना एका शिक्षकांचा खून झाला तेव्हा पत्रकार महाशय पृथ्वीवर नसावेत बहुतेक

🏴
मित्रा पैसे देऊन पण संपादक होता येते हे तुझ्या बोलण्यावरून समजले
आणि नशेच्या आहारी जाऊन संपादकीय पान लिहायचे नसते.
अक्कल जागेवर ठेवून संपादक लेख लिहित असतो तेवढे तुला अक्कल नसेल हे दिसले तुझ्या वर्तणुकी तून
तुमच्या सारखे पत्रकार हे विनविपरित बुध्दीचे आहेत याचीच लाज वाटते.

🏴
कोण हा तीनदमडीचा संपादक, हे वर्तमान पत्र?
लाज वाटतेय का? अशी भाषा वापरायला?
शिक्षकांनी कोरोना काळात किती कामे केलीत आणि किती जणांचे प्राणही गेलेत,याची आधी माहिती काढ, सर्वांनी नाही केली असतील पण तयारी होती काम करायची, सरकारने जर आदेश दिलेच असते तर केलेच असते इतर अशैक्षणिक कामे करतात तसे. घरी बसून होते शिक्षक म्हणून त्यात त्यांचा काय दोष? आणि पगाराबद्दल एवढा पोटशूळ तुझ्या पार्श्वभागात का सरकारी नियमाप्रमाणे तो मिळतोय. सुट्यांबद्दल जे अकलेचे तारे तोडलेत ना,त्यात विद्यार्थ्यांचा विचार करून केलाय. आम्हा शिक्षकांनाही घरी बसायला आवडत नव्हते, आम्हाला विद्यार्थ्यांमध्येच रमायला आवडते परंतु परिस्थितिच अशी होती. यापुढे पत्रकारिता करतांना भाषा जपून वापरा नाहीतर तुझ्यासारख्या द्वाड विद्यार्थ्यांना कसे वठणीवर आणायचे हेही चांगले जमते मास्तरांना.

🏴

लोकशाही चा आधार स्तंभ म्हणून पत्रकारिता केली पाहिजे संपादक म्हणून तुला कोणी अधिकार दिला शिक्षकांना नावे ठेवायचा.तू तुझी लायकी ओळखली का? तुला कोणीतरी शिक्षण दिलं म्हणून तर तू संपादक पदापर्यंत पोहचला आहेस ना? कोरोनाच्या काळात शिक्षकांनी काय काम केले त्याची माहिती घे आधी मग लिखाण कर.पण तुझी लायकीच नाही व बौद्धिक पातळी पण नाही.तू साधा पत्रकार होण्याच्या लायकीचा नाही.मालकांनी कसे संपादक केले तुला? त्या गोस्वामी पेक्षा जास्त हाल होतील लक्षात ठेव यापुढे मास्तराच्या नादाला लागू नको. – मी पण गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता करत आहे.पत्रकारितेचा अभ्यास कर मग लिखाण कर.

🏴
असे लेख लिहू नये.
प्रत्यक्षात सत्यता काय आहे ते पहा,माझा शिक्षक बंधू त्याला आजार आसून चेकपोस्ट वर 3 शिफ्ट मध्ये ड्युटी करत होता.त्यात काहींचा मृत्यू पण झाला.आरे चांगले लेख लिहा.जाहिर निषेध⚫

🏴
मित्रा तुझे डोके ठिकाणावर आहे का? काय लिहीतोस त्याचे तुला भान आहे का? तुला माहितीये का… माझ्या बांधवांनी शासनाच्या प्रत्येक निर्णयाला साथ दिली आहे..या कोरोनो च्या युध्दात शासनाने सांगितल्या तेथे कामगिरी बजावली आहे हे तुला माहीत आहे…म्हणून तुझ्या या लेखाचा मी जाहीर निषेध करतो..

🏴

अरे गांजा कमी ओढत जा नशा चांगली नसती रे … बेअक्कल गाढवा घरी तूला तूझी बायको ऐकत नाही त्यात शिक्षकांचा काय दोष ? ते बिचारे त्यांचे काम चोख करतात तू नको अकलेचे तारे तोडू. तूझ्यात दम असेल तर फोन नंबर दे comments मध्ये … प्रसिद्धीसाठी अन्न खाऊन काम कर उगाच काहीतरी खाऊ नको…..

🏴
मी केवळ शिक्षक म्हणून सल्ला देऊ इच्छितो की खरंच आरशा समोर उभं राहून स्वतःच्या आत्म्याला विचारा की आपण शिक्षकांबद्दल जे लिहीले हे आपल्याला शिकवलेल्या गुरुनां दिलीली गुरुदक्षीणा आहे का … की केवळ लक्षवेधी लेखन म्हणून लिहिले.. आपण निवडलेली लेखन शैली अनेकांपर्यंत पोहोचो आणि आणि आपली बौद्धीक औकात लोकांना कळू दे…. थोडा जरी संस्कार,किमान आई वडीलांचा शिल्लक असेल तर उद्या माफी मागितलेली असेल :

🏴
कित्येक शिक्षक कोरोना ड्युटी करत मृत्युमुखी पडले आहेत.

शाळा बंद असली तरी कोरोनाच्या प्रतिकूल काळात शिक्षण सुरू ठेवण्याचे काम शिक्षक करत आहेत.
कित्येक शिक्षकांनी स्वतः मुलांचे फोन racharge करत अध्यापन करण्याचे काम केले आहे.

वेगवेगळी online प्रशिक्षणे
वेगवेगळ्या online स्पर्धा
कुटुंबाचे सर्व्हे
Onine शिष्यवृत्ती वर्ग
ऑनलाईन अहवाल व माहिती देणे.

वरील सर्व आणि अजून बरीच कामे करायला परग्रहावरील लोक आले होते का ??

🏴
कोरोना काळात पोलीस मित्र, आरोग्य मित्र, ग्राम कृतीदल, सर्वेक्षण करायला कोणते पत्रकार आले होते? चूक असेल तर मांडण्याचा संवैधानिक अधिकार आहे पण गैरसमज पसरवण्यासाठी जी भाषा वापरली यावरून तु नशा करून लिहिले असे वाटते. पूर्ण उन्हाळी सुट्टी या कोरोना काळात कोरोना ड्युट्या करत घालवली. कोणतेही प्रशिक्षण व सुविधा नसताना चौकात नाक्यावर, स्क्रीनिंग सेंटरवर काम करत होतो व करत आहोत तेव्हा डोळ्यावर झापडं पडली होती काय? या काळात नाक्यावर सांगली मध्ये एका शिक्षकाला ट्रकखाली चिरडून मारण्यात आले त्याच्या कुटुंबाला पेन्शन नाही आणि शासकिय मदत पण नाही. तेंव्हा कुठे झोपला होतात. कोरोना काळात सगळ्याच शासकीय कर्मचार्यांचा पगार चालू होता फक्त शिक्षकांचा नाही.

🏴
शिक्षकांबद्दल आपण केलेले वक्तव्य म्हणजे आपण पत्रकारिता कशी करीत असाल याचेच उदाहरण आहे. पत्रकार लोकशाहीचा एक खाब आहे आणि समाजाचा आरसा सुध्दा आहे.आपल्यासारखे पत्रकार म्हणजे पत्रकारितेला कलंक आहे. आपल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.

🏴
काहीही सारासार विचार न करता पूर्वग्रह दुषित ठेऊन समस्त शिक्षकांविषयी गरळ ओकणाऱ्या प्रवृत्तीचा जाहिर निषेध..
काहीतरी मनाला येईल ते लिहायच आणि बोलायच अन प्रसिद्धी मिळवायची..
आपल्याला देखील शिक्षकांनीच घडवले असेल ना मग शिक्षकांविषयी इतकी कृतघ्नता का या महामारी च्या संकटात देखील शैक्षणिक कामा सोबतच आरोग्य यंत्रणा पोलिस यंत्रणा यांच्या मदतीला उभा राहणारा शिक्षक आपल्याला दिसला नाही. आपल्याला फक्त त्यांचा पगार दिसतोय आणि सर्वच शिक्षक बिनकामाचे आणि अप्रामाणिक आहेत असं बोलणं आणि समस्त शिक्षक वर्गात विषयी अविश्वास दाखवून त्यांची निंदा करणे हे अतिशय लाजिरवाणं आहे आपल्या मनात शिक्षकांविषयी असलेल्या या निंदनीय विचारांचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे

🏴
शालेय काम व शिक्षण बंदच असते तर सुट्टी वाढवण्याची गरजच भासली नसती . तुम्हाला काय माहित शिक्षकांनी किती कामे केली आहेत. हेच कॉलेजच्या प्राध्यापकांच्या बाबतीत तुम्हाला दिसत नाही का ?
तुम्हाला तुमच्या मास्तरांनी नीट संस्कार केलेले नाहीत .
भाषा चांगली वापरा.

🏴

ऑफिसमध्ये बसून कोणीही काहीही लिहू शकतो साहेब तुम्ही जेव्हा घरात बसला होता त्यावेळी आम्ही कोरोना शी झुंज देत लोकांना जागृत आणि सेवा देत होतो त्यावेळी काही नाही लिहले तुम्ही, आणि तुमची भाषा…… उत्तम प्रकारचे संस्कार दिसतायेत तुमचे.

🏴

तुझ्या लेखनशैली वरूनच तुझी लायकी कळते .तुला कोरोना वार्डात ,टोल नाका ,चेक पोस्ट ,रोजचे सर्व्हे ,रेशन दुकान ,दारूचे दुकान रांग लावणे,येथे रोजची ड्युटी लावायला हवी होती,फुकट पगार नव्हते घेत शिक्षक,आणि इतकीच असूया आहे ना तुला कोणी अडवले नव्हते शिक्षक होण्यापासून ,तू जे लिहले आहे यावरून समजते तू चुकून संपादक वा पत्रकार झाला आहे.हीच भाषा तू चांगली वापरू शकला असता मीही ती वापरू शकतो ओण माझी पातळी मी सोडणार नाही माझ्यावर तसे संस्कार आहे.समोरासमोर शिक्षकांच्या कामावर वैचारिक चर्चा झाली तर किती वेळ तुम्हाला तग धरता येईल याचा विचार करा आणि येथून पुढे आपले वर्तमान पत्र कुणी तरी वाचेल असे लिहा मी तर हे नाव पहिल्यांदाच वाचले आहे.आपण जे लिहले आहे त्या भाषेचा खेड तालुक्यातील आणि तमाम महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो.

🏴
विकृत मनोवृत्तीचा जाहीर निषेध!!!
मास्तर काय काय करतात ते कधी उघड्या डोळ्यांनी पाहिलेस काय????एकदा ये वेळ काढून,काय काय करतो ते सगळं दाखवतो.ज्याची लायकी नाही त्याला समजणार तरी कसं???23 मार्च पासून वेगवेगळ्या ठिकाणी विना प्रशिक्षण ,विना संरक्षण ड्युटी केल्या तेव्हा कुठे गेली होती पत्रकारिता???कित्येक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली,मृत्यू पण झाले,तेव्हा दिसले नाही का??की तेव्हा बुद्धी गहाण ठेवली होती की हात कुठे ……?तेव्हा केलेली कामे दिसली नाहीत का?आताच दुखायला लागलं??स्वातंत्र्य आहे म्हणजे वाटेल ते बरळनं बरं नव्हे रे..

🏴
बौद्धिक दिवाळखोरीचा उत्कृष्ट नमुना तुझ्या रूपाने पाहायला मिळाला. त्याबद्दल कोणत्या भाषेत आभार मानू तेच कळत नाही कारण इतक्या नीच पातळीचे संपादक असू शकतात यावर विश्वास बसत नाही.
राहता राहिला प्रश्न कामाचा तर मित्रा तुझ्या घरचं जर कोणी शिक्षक असतं तर तुला कळलं असतं की शिक्षक काय काय कामे करतो.
Lockdown मध्ये जेंव्हा ढुंगण वर करून झोपला होतास ना घरात तेव्हा पोलिसांसोबत, आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून सगळे शिक्षक काम करत होते.
पगार दिसला तुला शिक्षकांचा त्यामागची मेहनत दिसत नाही का ? जरा ग्रामीण भागात जाऊन बघ कसे दिवस काढावे लागतात ते. आणि तू ऑफिसमध्ये बुड टेकवून मोठ्यामोठ्या गप्पा नको मारू.
लेख लिहिणाऱ्या बुद्धिभ्रष्ट संपादक महोदय आम्ही काम करतो म्हणून पगार घेतो आणि तो आम्हाला सरकारकडून मिळतो . कोणाच्या सासुरवाडीतून नाही मिळत.
यापुढे लेख लिहिताना विचार करून लिही नाहीतर आम्ही पण सुंदर लिहू शकतो याचे भान ठेव.

🏴
शिकविण्याशिवाय कित्येक कामं शिक्षक प्रामाणिकपणे करतो.
बरेच शिक्षक साप्ताहिक सुट्टी सुद्धा घेत नाहीत. राज्यात अनेक सुट्टीविना शाळा चालतात.

आणि हे समाजाच्या समोर आणण्यापेक्षा असंस्कृत माणसं शिक्षकांच्या पगारी डोळ्यात खूपत असल्यानं असं बरळत राहतात.

जाहीर निषेध

🏴
जाहीर निषेध
पोलीस, डॉक्टर, नर्स, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासोबत पूर कोरोना काळात शिक्षकांनी उत्तम काम केले आहे, करत आहेत हे दिसले नाही का?? डोळ्यावर झापडं बांधली की शुद्ध हरपली आहे।
नशा जास्त च झाली वाटत???

उचलली जीभ लावली टाळ्याला।

🏴
सत्यता लक्षात न घेता शिक्षकांबद्दल अस चुकीचं लिहिणाऱ्याला चौकात नग्न करून मारला पाहिजे, शिक्षक किती आणि कोणते कोणते काम करतात या नालायक गाढवाला काय माहीत, विना वेतन व विना पेन्शन शिक्षक स्वतःचा जीव देऊन ,जीव धोक्यात घालून कोरीनाचे काम करीत आहे याची जाणीव या नालायक माणसाला नाही . शिक्षकांविषयी असे मत असणाऱ्या माणसाचा जाहीर निषेध, या नालायक माणसाच्या भागात राहणाऱ्या सर्व शिक्षकांनी याच्या घरावर मोर्चा नेऊन , त्याला घरा बाहेर काढून गाढवावर बसवून नग्न धिंड काढा त्याची.

🏴
सप्टेंबर महिन्यापर्यंत कोविड 19 च्या ड्युट्या शिक्षकांना होत्या. आपला जीव धोक्यात घालून आम्ही काम करत होतो. आहोत. ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे. रोज कागदांचा भडीमार असतो. उपक्रम सुरूच आहेत. विध्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाता कामा नये यासाठी शिक्षक जीवाचे रान करून प्रयत्न करता आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या मनाचे खच्चीकरण करण्याचे काम आपल्याकडून सुरु आहे. त्वरित आपण समस्त शिक्षकांची जाहीर माफी मागा. मी आपला निषेध करतो. जय शिक्षक भारती.

🏴
मास्तरड्यानो असा उल्लेख करणाऱ्या लोकपत्राच्या संपादक महाशयाचा जाहीर निषेध..!
24×7 काम करणाऱ्या शिक्षकांना हे कदापी सहन होणार नाही…..!
शिक्षक काम करतात की नाही हे विद्यार्थ्यांच्या पालकांना माहित आहे…!
खेड्या पाड्यात कोरोना काळात किती कामे लागली….!
स्वतःचा जीव धोक्यात घालून ड्युटी केली अनेक शिक्षक प्राणाला मुकले…!
अद्ययनाशिवाय सतराशे साठ कामे शिक्षकांच्या माथी मारले जातात तेव्हा या संपादक लोकांची
बुद्धी गहाण असते काय.
जाहीर निषेध..!
आजपासून लोकपत्र बंद.!
या पेपरचा इतका निषेध नोंदवा की याने पेपर छापणे बंद केले पाहिजे.!👍

निषेधाचा सूर तीव्र तर होताच परंतु अनेक शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. दै लोकपत्र औरंगाबाद येथील वर्तमानपत्राचे संपादक रविंद्र तहकीक याने समस्त शिक्षक वर्गाची अत्यंत खालच्या भाषेत लिखाण करुन बदनामी केलेली आहे… म्हणून या संपादकावर गुन्हा दाखल करण्यात यावा . यासाठी संगमनेर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने मा. पोलीस निरीक्षक यांना सोमवार दि. ९ नोव्हेंबर २०२०‌ रोजी निवेदन देण्यात आले‌

शिक्षकांना मास्तरड्या असे संबोधून शिक्षकांची अवहेलना करणारा,आपली विवेकबूध्दी गहाण ठेउन लेख लिहीणाऱ्या लोकपत्रचे कार्यकारी संपादक महाशय रवींद्र तहकीक यांची औरंगाबादच्या शिक्षक कार्यकर्त्यांनी लोकपत्र कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन कानउघाडणी करून खडे बोल सुनावले उद्याच्या पेपरला जाहीर माफी मागावी अन्यथा याचे वाईट परिणाम होतील असे ठणकावून सांगितले त्यामुळे उद्याच्या अंकात नक्कीच माफीनामा येईल. पांढरे केस व पांढरी दाढी असलेले बिनडोक रविंद्र तहकीक महाशय आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षकसंघाने या घटनेचा जाहीर निषेध केला आहे..

शिक्षकांविषयी गलिच्छ भाषा वापरणारे, शिक्षकांचे लाडके आमदार आदरणीय आमदार कपिल पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरणारे लोकपत्र मासिकाचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक ज्यांनी पत्रकारितेचा चुकीचा वापर करून महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बांधवांचे अपमान केला त्याबद्दल शिक्षक भारती पाचोरा जि जळगांव येथील शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी संपादकाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध केला.

काय होता तो अग्रलेख?

मास्तरड्यानो जरा जास्त काम केलेत तर मराल काय ?
——————————————————-
शाळेत पन्नास टक्के उपस्थितीला विरोध केल्यानंतर महाराष्ट्रातल्या मास्तरड्यानी आता सरकारने देऊ केलेल्या पाच दिवसांच्या दिवाळी सुटयांनाही विरोध केला आहे.सरकारने यांना १२ ते १६ नोव्हेंबर अशा पाच दिवसांच्या सुट्या देऊ केल्यात.यांना सालाबाद प्रमाणे संपूर्ण २१ दिवसांच्या सुट्या हव्या आहेत.कशासाठी ? नाही म्हणजे का म्हणून ? गेले सात-आठ महिने घरात आयते बसून खादाडताय ते कमी पडले काय ? नोकरी आणि पगार म्हणजे काय बापाची मत्ता आहे की पेंड.सरकार तुम्हाला शाळेतच जायला सांगतेय ना.ऑनलाईन शिकवायला सांगतेय.उपस्थिती पन्नास टक्के अनिवार्य आहे,म्हणजे पन्नास टक्के सुट्याच नाहीत का ? तुम्हाला पगार सगळा पाहिजे.त्यात कपात नको.वरतून महागाई भत्ते वगैरेही पाहिजेत.त्यातही कपात नको.मग शाळेत किमान पन्नास टक्के दिवस उपस्थित रहा,कामकाज करा (शिकवण्याचे) म्हटले तर तुमच्या पार्श्वभागात का दुखते ? ऑनलाईन शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही.हा प्रयोग पूर्णतः फसला हे तर आपल्याला विदित आहेच.नसेल तर आम्ही सांगतो.शालेय शिक्षण विभागाने कोरोना लॉक डाऊन काळात राज्यातील २ कोटी मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ दिला गेला असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात फक्त ३० लाखांच्या आसपास म्हणजे केवळ १५.५२ टक्के विद्यार्थीच ऑनलाईन शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकले ही धक्कादायक वस्तुस्थिती आहे.ऑनलाईन व्हाट्स अप,ऑफलाईन गृहभेटी,प्रश्नोत्तरे आणि स्वाध्याय पुस्तिकांच्या माध्यमातून किती उद्दिष्ट पूर्ण झाले.किती शिक्षक या प्रक्रियेत प्रामाणिकपणे सहभागी झाले ? मुलांना त्याचा काय लाभ झाला ? याची उत्तरे कोण देणार ? सगळीच जबाबदारी सरकारची,मग तुम्ही काय करणार ? आहात कशासाठी ? सुदैव समजा की तुम्ही चाळीस वर्षापूर्वीचे गरीब बिचारे मास्तर नाही आहात.गाव खेड्यात रहावे लागणारे,मैलो न मैल सायकलवरून किंवा पायपीट करीत तुटपुंज्या पगारावर कर्तव्य बजावणारे,सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसणारे,पायात करोनाच्या स्लीपर आणि अंगात जाड्याभरड्या नागमणी कपडयांच्या दोन जोडावर दिवस काढणारे.पण ज्ञानदानाचे कर्तव्य निष्ठापूर्वक बजावणारे मास्तर.ते दिवाळी-उन्हाळीच काय,रविवार आणि सणवारांच्याही सुट्या घेत नसायचे.तुम्हाला दाबून पगार आहे.कामाच्या ठिकाणी राहायची सक्ती नाही.तुम्ही दुचाकी (अपवादात्मक) चारचाकी (बहुतेक सर्व ) वाहनातून फिरता.दोन तीन हजाराची खेटरं पुजता.पाच-पाच हजारांचे कपडे,इंपोर्टेड बनियान-अंडरपॅन्टी,खायला काळ.आणखी काय काय गुणवर्णन करावे आपले.सांगावे ते कमीच आहेत.असे असताना आपणाला शिक्षकपणाची लाज वाटावी हे भयंकरच नाही का ? बरे सरकार तुम्हाला बराशी खोदायला,खडी फोडायला तर नाही सांगत.शाळेत हजर रहा.कोरोनामुळे मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढा.या वर्षीची दिवाळी जरा साधेपणाने साजरी करा.चंगळ जरा कमी करा.पाचच दिवसांची सुटी घ्या.किमान पन्नास टक्के कामकाज करा म्हणून सांगतेय.तर त्याला तुमचा असहकार.काय प्रॉब्लेम काय आहे.तुमचा सुटीचा हक्क.आरे जरा तुमचेच विद्यार्थी असणाऱ्या मुलांच्या आईबापांकडे पहा.त्यात शेतकरी आहेत,मजूर आहेत,कामगार आहेत.त्यांचे हाल पहा.त्यांना कुठे आहेत सुट्या.नाहीत ना.मग तुम्ही काय सरकारचे जावई आहात की हत्तीच्या कानातून उतरले आहात.सगळं जग काम हवे म्हणून तळमळतंय आणि तुम्हाला सुट्या हव्यात होय रे ‘कपी’पुत्रांनो ! तो कपिल पाटील टोप्या फेकतो आणि तुम्ही त्या डोक्यात घालून नाचताय.मनाची नाही निदान जरा जनाची तरी बाळगा.जरा जास्त काम केलेत तर मराल काय ?

तहकीक यांच्या मुलीनेही पाच सप्टेंबर रोजी नकारघंटा हलविली. तो लेख तिनेच लिहिला की यांनीचे तिच्या नावाने छापला तेच जाणो. लेख असा होता.

आज पाच सप्टेंबर.शिक्षक दिन.खरे तर आज आपल्यापैकी प्रत्येकाने गुरुजनांच्या समोर नतमस्तक होण्याचा.ऋणाईत होण्याचा दिवस आहे.आज अनेकजण प्रत्यक्ष भेटून,फोनवरून किंवा सोशल मीडियावरून शिक्षकांना शुभेच्छा वगैरे देतील.काहींचे सत्कार होतील.काहींना पुरस्कार मिळतील,इत्यादी वगैरे.कोरोनामुळे शाळा बंद आहेत,नाहीतर बिचाऱ्या मुलांनी आपल्या गुरुब्रह्मांची फुले वगैरे अर्पून करुणाही भाकली असती.खरे तर आज शिक्षकांबद्दल कटुबोल बोलायला नकोत.काही नासके कांदे आहेत म्हणून सगळीच चाळ सडलीय असेही नाही.पण छातीवर हात ठेऊन खरेच सांगा आज ज्यांच्या समोर मनपूर्वक नतमस्तक व्हावे असे किती मास्तर आपल्या भोवताली आहेत ? आजी,माजी,खासगी,सरकारी,निवृत्त,परावृत्त (व्हीआरएस घेतलेले) असे सर्व शिक्षक-प्राध्यापक आणि त्यांचे आजी-माजी शिष्यगणांनी आपल्या छातीवर हात ठेऊन,आत्म्याला स्मरून या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे, ‘ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे मास्तर कुठे आहेत ?’ कोणी म्हणेल ही नकार घंटा आहे.शिक्षकांबाबतच्या जुन्या पुराण्या कालबाह्य आदर्शाच्या फुटफट्या आजच्या आधुनिक काळातल्या शिक्षकांना का लावता ? आजकाल कोण आदर्शवादी उरलाय,आम्ही ज्या व्यवस्थेत,ज्या परिस्थितीत,ज्या वातावरणात काम करतो,ती उतरंड आदर्श आहे का ?,आम्ही ज्या समाजात काम करतो तो आदर्शवादी राहिलाय का ?,बाकी सोडा,आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो ते आदर्श आहेत का ? आम्हाला विद्यार्थ्यांबद्दल आस्था आहे वा नाही याचा उहापोह करताना विद्यार्थ्यांना-पालकांना आमच्याबद्दल आदर-आत्मीयता शिल्लक उरलीय का ? याचाही अदमास घ्या असा प्रतिवाद शिक्षक करू शकतात.पण मग एक प्रश्न उरतोच,या सगळ्यांना ‘वळण’ लावण्याचे काम कोणाचे आहे ? पूर्वी शाळेतले शिक्षक समाज शिक्षक म्हणूनही काम करायचे.स्वतःच्या आचार-विचार,वर्तन-व्यवहार आणि कार्य-कृतींतून ते आपला सभोताल निर्दोष करत असत.परिस्थितीला दोष देत बसत नसत.परिस्थितीच म्हणाल तर आजच्या पेक्षा तेंव्हा अधिक वाईट आणि बिकट होती.मोगलाई,ब्रिटिशांची गुलामगिरी आणि निजामी राजवटीत नाडलेला,पिडलेला,भरडलेला समाज.शिक्षणाबद्दलची अनास्था,दारिद्र्य,सेवा सुविधांचा अभाव,शिक्षकांना पगार किती असायचे ? सातशे रुपये पगार घेऊन,एक शिक्षकी शाळेत,उन्हा-पावसात दहा कोसांची पायपीट करून इमानदारीने हेलपाटे करणारे मास्तर पाहिलेत तुम्ही ? ‘मागता येत नाही भीक तर मास्तरकी शिक’ असे तेंव्हा म्हटले जायचे.मास्तरांना कोणी बायका द्यायचे नाहीत.तरी ते शिक्षक नतमस्तक व्हावे असे आदर्शवत असायचे.आज काय परिस्थिती आहे ? धंदेवाईक खासगी शाळेतल्या मास्तराबद्दल मला बोलायचे नाही,ते बिचारे वेठबिगाराप्रमाणे पाच -दहा हजारावर कोट-टाय वगैरे घालून शिक्षणाच्या पेढीवर हमाली करतात.पण सरकारी आणि अनुदानित शाळा-महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापकांचे काय ? वर्षातले जेमतेम दोनशे दिवस काम करुनही त्यांचे पगार लाख-सव्वा लाखांच्या आसपास आहेत.काहींचे त्याहून अधिक.असे असूनही त्यांना सार्वजनिकरित्या शिक्षक म्हणून सांगण्याची शरम का वाटावी ? असे एक उदाहरण आम्ही प्रत्यक्ष पहिले म्हणून आम्हाला त्याचे अधिक वैष्यम्य वाटले.शिक्षक आता जिथे नोकरीला असतात त्या गावात राहत नाहीत.अपवाद वगळता सगळेच चार चाकी वाहनांनी ड्युटी बजावतात.शिक्षणाच्या क्षेत्रातही मोक्याच्या जागी बदल्या मिळवण्यासाठी लाखोंच्या डील होतात.महिला शिक्षक वगळता ९९ टक्के शिक्षक व्यसनी आहेत.शाळा सुटली की रस्त्यावरच्या ढाब्यांवर पुन्हा ‘शाळा’ भरते.माजी विद्यार्थी सोडा शाळेतले विद्यार्थी सुद्धा शिक्षकांच्या जवळकीचे ,ओळखीचे नसतात.पालकांशी संपर्क नसतो.शाळेत जाताना कोणता शिक्षक अभ्यास करून जातो ? शाळेत असताना व्हाट्स अप,ट्यूटर,इंस्टाग्राम,फेसबुक,युट्युब यामधून किती जणांना मुलांकडे पाहायला,त्यांना शिकवायला वेळ मिळतो ? नुसतेच शिक्षणाचे धोरण नवे करून काय होणार ? नव्या पिढीला ‘ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हावे’ असे शिक्षक कधी मिळणार ?

-संस्कृती तहकिक

ही असली गलिच्छ, अनुदार,घाणेरडी भाषा एखाद्या वर्तमानपत्राच्या संपादकाची कशी काय असू शकते?खरंच ह्याला शिकवून संपादकपदावर बसवणाऱ्या आम्हा शिक्षकांचाच हा पराभव आहे. शिक्षकांना माकडाची उपमा देणारा हा मराठी वृत्तपत्र सृष्टीच्या इतिहासातील पहिलाच संपादक असावा. शिक्षकांची लाज काढण्याचा अधिकार या संपादक महाशयांना कुणी दिला?मालक कमलकिशोर कदम आपणास जेवढा पगार देतात तेवढ्याच औकातीत आपण लिहायचं ना! आजवर वाचलेला सर्वात गलिच्छ,अनुदार, खालच्या भाषेतील हा अग्रलेख आहे. ह्याचा निषेध करावा तेवढा थोडाच.आमदार,खासदारांविषयी या भाषेत लिहून दाखवा आणि मग पुढे कसं हक्कभंग प्रस्तावाला सामोरं जावून तुरूंगाची हवा खायला लागेल ते बघावं. शिक्षक पापभिरू,निरूपद्रवी, आहे म्हणून काहीही बरळावं?उचलली लेखणी अन् …
या गलिच्छ संपादकीयाचा तीव्र निषेध..!! अशाही काही हजारो प्रतिक्रिया या अग्रलेखावर आलेल्या आहेत.

अखिल भारतीय क्रांती सेनेने तहकीक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना माफी मागायला लावली. त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो आता सगळीकडे व्हायरल होतो आहे. यावरून शिक्षकांतील खदखदता असंतोष कमी झाला असे मात्र मुळीच नाही. कारण तीव्र लाॅकडाऊनच्या काळात शिक्षक कोव्हिड कर्तव्यावर होते. तीव्र लाॅकडाऊन असतांना शाळेत जाऊन शालेय पोषण आहार वाटप केला. पुस्तकांचे वाटप केले. स्वस्त धान्य दुकान, गाव सर्वेक्षण, चेकपोस्ट आदींसह आॅनलाईन शिक्षणातही सहभाग नोंदविला. टिलीमिली कार्यक्रम, दीक्षा अॅप, झूम मिटींग, गुगल मिटींग या माध्यमातून जसे शक्य असेल तसे शिकवले. मुलांच्या अडचणी सोडविल्या. ज्या विद्यार्थ्यांना ही सुविधा नव्हती त्यांना घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले. अभ्यासाला प्रवृत्त केले. शिक्षक मित्रांची संकल्पना राबवली. तेव्हा या शिक्षक मित्रांना हव्या त्या आवश्यक त्या सुविधा पुरविल्या. जेव्हा पासून शाळा बंद झाल्या तेव्हापासून दररोज काही ना काही माहिती द्यावी लागते. आॅनलाईन कामाची तर जंत्रीच असते. प्रत्येकच बाब आॅनलाईन करावी लागते. शालेय स्वच्छतेच्या नावाखाली शिक्षकांना वर्गखोलीच्या कोपऱ्यातील जाळ्या जमट्या काढण्यापासून संडास स्वच्छपणे धुण्याचेही काम करावे लागते. जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांना ना सेवक असतो ना कारकून. सगळी कामे शिक्षकांनाच करावी लागतात. विशेष म्हणजे लाॅकडाऊनच्या काळातही ते त्यांना करावे लागले आहे.

एवढे असूनही तहसीलच्या आदेशांना शिक्षक नाही म्हणत नाहीत. निवडणूक, मतदार यादी, विविध सर्व्हेक्षण, जनगणना आदी कामालाही शिक्षकांनाच जुंपले जाते, काळ कोणताही असला तरी! आणि गुणवत्तेचीही अपेक्षा केली जाते. मग तुम्ही शिक्षकांना ऐतखाऊ असे का म्हणता? शिक्षकांच्या आंडरपँटीपर्यंत जाता? पार्श्वभागात दुखते असे म्हणता? ही भाषा कशासाठी? तमाम शिक्षकांना कोरोनाकाळात वेतन दिले तर ते तुमच्या घरचे दिले का? शिक्षकांच्या कुटुंबाची शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. तो गावपातळीवरचेही राजकारण करतो. त्याच्या मनात आले तर सत्तांतराची किमयाही तो करु शकतो. अधिकाऱ्यांची मर्जी राखणारे अनेक शिक्षक आहेत परंतु अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणारेही शिक्षकच आहेत. शिक्षक हा मोठ्या संख्येने असलेलि संवर्ग आहे. तो प्रामाणिकपणे काम करीत असतो. तो विद्यार्थ्यांना आपले दैवत मानतो. शिक्षणाच्या केंद्रस्थानी शिक्षक नसून तो विद्यार्थी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आजचा काळ मुकी बिचारी हाका कुणीही, हा राहिला नाही. शिक्षक आता हायटेक झाला आहे. तो चांगल्या वाईट सर्वच क्षेत्रांत निपुण आणि पार आहे. आता औरंगाबाद पदवीधर मतदार संघात आचारसंहिता आहे. लाॅकडाऊनचे नियमही लागू आहेत.
हा संवर्ग पेटला तर पळता भुई थोडी होईल, त्यासाठी शिक्षकांचा नाद करायचा नाय!

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
९.११.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *