कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्रातील 12 लाख शिक्षकाबद्दल आपल्या संपादकीय मधून शिवराळ भाषा वापरून गरळ ओकणा-या सहसंपादक रविंद्र तहफीक यांच्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात यावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाच्या वतीने निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून दि.9 नोव्हेंबर रोजी तहसिलदार विजय चव्हाण यांना लेखी निवेदन देवून कार्यवाही करा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ कंधार च्या वतिने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळामध्ये कार्यरत
असणाऱ्या जवळपास 12 लाख शिक्षकांकडून शासन निर्णय व आदेशानुसार ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अध्यापनाचे कार्य करत आहेत. परंतू कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता पूर्वगृह व दुषित विचारातून वृत्तपत्रातून “मास्तरडयांनो जरा जास्त काम केले तर मरालं काय?” या मथळ्याखाली संपादकीय लेख छापून त्यात सरकारचे जावई आहात काय?
असे अश्लिल व शिवराळ भाषेत लेखन करून कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक यांनी संपूर्ण शिक्षक
कर्मचाऱ्याची बदनामी व अवमान केला आहे.
यामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षकांच्या भावना दुखावल्या असून
त्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाला आहे.
संपादक रविंद्र तहफीक यांच्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही करा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ कंधार शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
या निवेदनावर मुनेश शिरसीकर,बालाजी डफडे,उल्हास राठोड,हानमंत जोगपेटे,विकास राठोड,पिराजी केंद्रे ,रामदास गुट्टे,गजानन पांचाळ,रमेश राठोड आदीसह अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ कंधार शाखेच्या सदस्याच्या स्वाक्षरी आहेत.