कंधार :-प्रतिनिधी
राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा (NMMS २०२१-२१) चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठीचे आवेदन पत्र भरण्यासाठी ०९ नोव्हेंबर २०२० पासून ऑनलाईन परिक्षा परिषदेच्या www.mscepune.in व nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर ०८ डिसेंबर २०२० पर्यंत नियमित शुल्कासह तसेच ०९ ते १६ डिसेंबर २०२० विलंब शुल्क १७ ते २३ डिसेंबर -२०२० पर्यंत शाळा संस्थेच्या जबाबदारीवर अतिविलंब शुल्कासह भरण्यासाठी उपलब्ध राहील. तरी तालुक्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांनी याची नोंद घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ करण्याचे आवाहन श्री रवींद्र सोनटक्के गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कंधार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा (NMMS २०२१-२१) चे आयोजन करण्यात आलेले असून महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आवेदन पत्र भरण्यासंबधीच्या सूचना परिक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.