कंधार ; प्रतिनिधी
लोहा गंगाखेड लोहा प्रवासा दरम्यान एका प्रवासी महिलेची पर्स बसमध्ये पडली होती.कंधार आगाराचे वाहक व्ही. बी. अभंगे यांना ती पर्स सापडली. त्यामध्ये पैसे, आधार कार्ड,
आणि दागिणे होते. अभंगे यांनी प्रवाशाला संपर्क साधून खात्री केल्यानंतर ती पर्स प्रवासी महिलेच्या पतिकडे सुपूर्द केली. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली.
कंधार आगाराची बस (क्र. एम. एच. -२० बी. एल. १२३६ ) लोहा – गंगाखेड – लोहा या नियतावर वाहक व्ही. बी. अभंगे हे कर्तव्यावर होते. प्रवासी महिला प्रियंका राहूल मस्के ( रा. माळाकोळी ) हया महिलेने तिच्या पती सोबत गंगाखेड – लोहा प्रवास पूर्ण केला होता. दुस-या फेरीला बुकिंग करत असताना वाहक अभंगे यांना ती पर्स बसच्या सीटच्या खाली पडलेली आढळून आली, तो पर्यत बस सुभाषनगर येथे आली होती.
अभंगे यांनी ती पर्स उचलून खात्री केली. पर्समध्ये ६५० रुपये रोख रक्कम, आधार कार्ड, आणि एक दागिणा होता.पर्समधील पत्यानुसार त्यांनी सदरील महिलेच्या पतीस राहूल मस्के यांस संपर्क साधला व त्यांनी दुस-या दिवशी दिनांक १० नोव्हेंबर सकाळी अकरा वाजता प्रवासी महिलेच्या पतीला बोलावून ती पर्स त्यांचीच असल्याची खात्री केली व आगारातील आगार व्यवस्थापक श्री. एच. एम. ठाकूर साहेब यांच्या हस्ते प्रवासी महिलेच्या पतीला ती पर्स सुपूर्द केली.
तेव्हां आगारातील आगार लेखाकार श्री. डी. के. केंद्रे सर, श्रीमंगले सर, बी. के. गुंडाळे, डी. ए.आदमाने, मठपती सर, बी. एम. पेठकर आदी कर्मचारी उपस्थित होते. वाहक श्री. व्ही. बी. अभंगे यांनी केलेल्या कामाची दखल घेवून त्यांचा कंधार आगार प्रमुखांनी
गौरव केला.