खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसा निमित्य असंख्य चाहत्यांनी केले रक्तदान
नांदेड-
येथून जवळ असलेल्यी साईबाबा मंदिर परिसर,वाडीपाटी येथे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या असंख्य चाहत्यानी स्वंयस्फुर्तपणे रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भा.ज.पा.नांदेड (द)चे अध्यक्ष सुनिल मोरे सोनखेडकर यांनी या शिबीराचे आयोजन करून शंभर चाहत्यांना संधी निर्माण करून दिली.यावेळी शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून अभिष्टचिंतन सोहळ्यात केलेल्या रक्तदान सोहळ्याचे उद्घाटन भा.ज.पा.प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव मुकदम तर लोहा पं.स.चे सभापती शंकरराव शिंदे ढाकणिकर,जेष्ठ कार्यकर्ते डाँ.पंजाबराव देशमुख,राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडित पवळे,यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी उद्घाटकीय भाषणात माणिकराव मुकदम यांनी खा.चिखलीकर गोरगरीबांचे कैवारी आहेत.सर्वाच्या मदतीला धाऊन येणारा नेता जनसामान्या ह्रदयात असल्याचे सांगून केंद्रातल्या भा.ज.पा.च्या सरकारनी स्वांतत्र्या पासून भिजत पडलेला जम्मू-कास्मिर चा प्रश्न,मुस्लिम महिलांचा प्रश्न,राम मंदिर उभारणी,पाकिस्तान-चिन वर जरब बसवण्यासहअनेक विधायक प्रश्न सोडविल्याचे सांगून जनतेनी भा.ज.पा.च्या पाठिशी राहण्याचे आवाहन केले. प्रास्थाविकात संयोजक सुनिल मोरे यांनी कोरोनाच्या संकट काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून हुजुर साहिब व जीवन आधार रक्त पेठ्याच्या माध्यमातूनआपल्या नेत्याच्या वाढदिवसा निमित्य रक्तदानाचा विधायक उपक्रम घेतल्याचे सांगून कार्यकर्त्याला भक्कम आधार देणारा व विकासाची द्रष्टी असलेला नेता असल्याचे सांगितले.चिखलीकरांचा वाढदिवसा निमित्य दरवर्षीच जिल्हाभर,भजन,कीर्तन सोहळा,अन्नदान,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,गरीब निराधार कपडे,व्रक्षारोपण,शेकऱ्यांना व श्रकऱ्यांना विविध प्रकारच्या मदती करण्यात येतात.आपल्या आवडत्या नेत्याचा वाढदिवस दरवर्षीच मोठा आनंदोत्सवच साजरा केला जातो. पण यंदा या संकट काळात रक्तदान,माँक्सचे व सायनिटायझरचे वाटप व व्रक्षारोपन करण्यात आले.यावेळी डेरल्याचे उपसरपंच नारायन पाटील कळकेकर,राजेश पावडे,गोविंद महाराज,माधव डाके,नरबा जाधव,नाना मोर,हरी पाटील,माधव सावंत,भेंडेगावचे रावसाहेब पाटील,प्रा.भास्कर हंबर्डे,कैलास कदम,बामनीचे जाधव काका, नंदकिशोर शिंदे,यशवंत क्षीरसागर कल्हाळकर, परिसरातील सरपंच,चेअरमन,प्रतिष्टीत नागरीक मोठ्या संखेनी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सुरेख सुत्र संचालन भा.ज.पा.नांदेड(द.)चे उपाध्यक्ष प्रा.खुशाल जाधव बामनीकर यांनी तर आभार पांडुरंग कदम माऊली यांनी मानले.