शेतमजुरांसाठी कृषि विषयक कौशल्य प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा प्रेरणादायी प्रतिसाद.

शेतमजुरांसाठी कृषि विषयक कौशल्य प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा प्रेरणादायी प्रतिसाद.


लोहा ; विनोद महाबळे

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतमजुरांसाठी कृषि विषयक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम दि.०४ ऑगस्ट रोजी लोहा तालुक्यातील मौजे पारडी येथे घेण्यात आला.या प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी शेतमजूरांसाठी कीटकनाशकांची सुरक्षित फवारणी, हाताळणी व वापर या विषयांवर प्रशिक्षण घेण्यात आले. 
कार्यक्रमास उपस्थित शेतमजूरांना मान्यवरांनी फवारणी संबंधित विस्तृत मागदर्शन केले. रवीकुमार सुखदेव उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी रासायनिक कीटकनाशके किडीच्या प्रकारानुसार व पिकानुसार किटकनाशकांचे द्रावण तयार करण्याची योग्य पध्दत बदल प्रात्यक्षिक करून दाखविले. अरूण घुमनवाड तालुका कृषि अधिकारी यांनी पिकांसाठी किडींची ओळख व किटकनाशकांचा सुयोग्य वापर या बाबत माहिती दिली.किटकनाशक फवारणी गरज व पद्धत, पिकांच्या वाढीनुसार फवारणीची वेळ.पिकांसाठी किटकनाशकांचे लेबल क्लेम किटकनाशकांची वर्गवारी , तसेच किटकनाशकांचा नेमका व सुरक्षित वापर करण्याची पद्धत तसेच रिकामे डबे , बाटल्या व पाकिटे यांची सुरक्षित विल्हेवाट लावणे व पाणयाचे स्त्रोत सुरक्षित ठेवणे याकरिता घ्यावयाची काळजी.सुरक्षित साधनांचा वापर करून योग्य फवारणी यंत्राचा वापर, नोझल्सचे व आवश्यकतेनुसार निवड .फवारणी यंत्राची निवड , पाण्याचे प्रमाण नोझलचे प्रामाणिकरण , फवारणी यंत्राची निगा व देखभाल दुरुस्ती ई.विषयावर व्याख्यान व कार्यानुभव विषयी तज्ञ प्रशिक्षकांनी मागदर्शन केले.या कार्यक्रमांचे नियोजन सोहेल सय्यद सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले.यावेळी मंडळ कृषि अधिकारी  संदानद पोटपेलवार , टेकाळे साहेब ,कृ.प.वाकळे ,साकोळकर, कृषि सहाय्यक व शेतकरी बांधव व महिला प्रशिक्षणास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *