राममंदिर भुमीपुजनाचे कंधार मध्ये अतिशबाजी करुन जल्लोष.
कंधार-
श्री राम जन्मभुमी अयोध्या येथे दिनांक 5 अगष्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिराचे भुमीपुजन संपन्न झाले त्याचाच आनंद उत्सव कंधार शहरातील श्री राम मंदिरात आरती व अतिशबाजी करुन मोठ्या जल्लोषात साजरा केला.
आयोध्येतील राम मंदीराच्या भुमीपुजन सोहळ्याचे उत्सुकता सर्व देशवासियांना लागली होती या राममंदिराचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.5 अगष्ट रोजी संपन्न झाले याचा आनंद उत्सव कंधार येथे राम भक्तांनी मोठ्या उत्साहात श्री राम पुजन व अतिशबाजी करुन केला शहरातील राम मंदिर गांधी चौक,छ.शिवाजी चौक,महाराना प्रताप चौक,या मार्गावर अतिशबाजी केली त्याच बरोबर शहरातील सर्व मंदिरावर विद्यूत रोषणाई करुन मंदिरा समोरही अतिशबाजी करण्यात आली यावेळी कारसेवकांचा सन्मान करण्यात आला यावेळी बाबुरावजी गंजेवार,भगवान महाराज व्यास,अरविंद महाराज रामदासि,विलास मुखेडकर,गोविंद लुंगारे,अँड.मारुती पंडरे,पांडुरंग मामडे,अँड.गंगाप्रसाद यन्नावार,सतिष नळगे,अँड.सागर डोंगरजकर,निलेश गौर,प्रविन बनसोडे, शेखर वडजकर,,क्रुष्णा बनसोडे, पंडित डगे,शुभम संगनवार,संदीप व्यास,गणेश ठाकुर,शुभम संगनवार,संतोष तोंडली,वैभल बासटवार,रूषी रत्नपारखे,सचिन जैन,रवि संगेवार,गणेश मोरे,गणेश बनसोडे ,करण गौर,रमण आवळे,अनिल श्रीमंगले,अभिजीत इंदूरकर,अजय जाधव,जगन निकम,बालाजी निकम,विक्रम गौर,कृष्णा श्रीमंगले,सुमीत गोरे,दत्ता अरगुलवाड,शिवा निलेवड, शंकर डांगे,दीपक नागलवड आदींची उपस्थिती होती.