मोबाईल हे व्यसनच

खरचं मोबाईल ही एक गरज राहिली नसून ते एक प्रकारचे व्यसन झालं आहे.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल हा मुलांच्या हातात चिकटलेला असतो,पूर्वी पुस्तक,वर्तमानपत्र,गोष्टीची पुस्तक आवर्जून वाचली जायाची.घराघरात आजी-आजोबाचे वर्चस्व असायचे,ते मुलांना बोधपर गोष्टी सांगायचे.त्यातून मुलांचे मनोरंजन तर होतच होते पण त्यातून अचूक ज्ञान देखिल मिळायचे पण,विभक्त कुटुंबामुळे मूले एकलकोंडी होऊन सरळ सरळ मोबाईलच्या आहारी जात आहेत,संवाद साधण्यासाठी घरात कुणीच नसल्यामूळे त्यांच्यासाठी मोबाईल म्हणजे सर्वस्व झाले आहे.

सध्याच्या स्थितीमध्ये लहानबालक ते तरुणांच्या हातात मोबाईल आणि कानात हेडफोन असल्याचे चित्र पाहायला मिळते.त्यामूळे या लोकांना आपल्या आसपास काय चालले आहे याचे भान राहात नाही.मोबाईल मूळे आपण लांबच्या व्यक्तिशी संवाद साधू शकतो पण,जवळच्या माणसापासून लांब जात आहोत.ही खुपच गंभीर बाब आहे.आजची तरुणाई तर मोबाईलच्या नादापाई ठार वेडी झालेली आहे.अक्षरक्षा ती उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे.

त्यांना हे कळत नाहीये की मोबाईल ही एक क्रांती आहे,याचा उपयोग संवाद साधण्यासाठी केला जातो.पण,सध्याच्या पीढीला याचे व्यसन जडले आहे.तरुणाईच्या जीवनाचा मोबाईल एक अविभाज्य भाग बनला आहे.
आज आपण घराघरात पाहातो की,लहान मूल रडायला लागले की,त्याच्या हातात सरळ मोबाईल ठेवला जातो,पण हे कोणी लक्षात घेत नाही की,या मूळे आपण मुलांना मोबाईच्या आहारी घालत आहोत.तासन तास मूल मोबाईल मध्ये गुंतलेले असतात,ती त्यावर काय पाहात आहे ह्याकडे देखिल पालकांचे लक्ष नसते,यातूनच ते यातूनच ते वाईट मार्गाला लागतात.एखाद्या वेळेस त्यांना मोबाईल देण्याचे टाळले तर ते आक्रमक होतात.

घरातील वस्तूंची तोडफोड करतात.काही मुलांनी तर मोबाईल गेमच्या नादापायी आत्महत्या केली आहे,ही खुप चिंताजनक बाब आहे.
मोबाईलमूळे मुलांच एक वेगळ विश्व निर्माण झालं आहे.यामूळे त्यांना एकांत तर मीळाला पण त्याचबरोबर एकटेपणा पण मीळाला.मानसिक ताणाबरोबर असुरक्षिततेची भावना मनात घर करु लागली आहे.सुसंवाद हरवत जाऊन त्या जागी अबोला निर्माण झाला.त्यामूळे मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हक्काच कुणीच उरल नाही.खर तर मोबाईलचे खुप चांगले फायदे आहेत.पण,त्याचा गरजेपेक्षा जास्त उपयोग होत आहे.मुलांना अक्षरक्षा मोबाईलचे व्यसन जडले आहे.

यातून वाईट परिणाम दिसून येत आहेत.मोबाईलचे व्यसन खरच सोडवायचे असेल तर प्रथम आपल्या कुंटूंबाला भरपूर वेळ द्या.चांगली पुस्तक वाचा.
मोबाईल ही चैनीची वस्तू नाही,एक मूलभूत गरज झाली आहे.या मोबाईलच्या अतिवापरामूळे एक पीढी उध्वस्त होतेय…यावर चिंतन करणे आत्यआवश्यक आहे.

मोबाईलचा वापर ही एक अशी जादूची छडी आहे की जिला आपण आपल्या आवाक्यात ठेवू तोपर्यंत फायदाच फायदा आहे.पण,जर का आपण त्याच्या आवाक्यात गेलो तर फक्त तोटाच तोटा आहे हे मात्र नक्की.त्यामुळे मोबाईलच्या वापरावर वेळीच बंधन घाला.आणि आपले मानसिक आरोग्य जपा.मोबाईलच्या अति वापरामूळे उध्वस्थ होणा-या पीढीला वाचवा.

rupali wagre vaidh
rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *