पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी आ. शामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांचा मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर

कंधार: प्रतिनिधी:


औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना महा विकास आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे व त्यांच्या सुविद्यपत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी लोहा ,कंधार मतदार संघातील पदवीधर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी वर भर दिला असून लोहा, कंधार तालुका पिंजून काढल्याचे दिसत असून पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना विक्रमी मताधिक्य लोहा, कंधार मतदार संघातून मिळवून देऊन त्यांना मोठ्या फरकाने विजयी करणार असल्याचा विश्वास लोहा, कंधार मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस, शिवसेना महा विकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी मोर्चेबांधणी केली असून लोहा ,कंधार तालुक्यातील पदवीधर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी चाय पे चर्चा वर आम्ही काम करत असून लोहा व कंधार तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील पदवीधर मतदारा सोबत आम्ही प्रत्यक्ष भेटीगाठी करून मतदारांना विश्वास देण्याचे काम करत असल्याचेही यावेळी आ. श्याम सुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांनी सांगितले, सतीश चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात मराठवाड्यातील शिक्षक, पदवीधर, शेतकरी ,कष्टकरी, दीनदलितांच्या प्रश्नाविषयी वेळोवेळी आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम केले असून लोहा, कंधार मतदार संघातील पदवीधर मतदार सतीश चव्हाण यांच्या कामाची पावती म्हणून क्रमांक 1 चे बटन दाबून सतीश चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास लोहा ,कंधार मतदारसंघाचे आ. शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी बोलताना सांगितले,

उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी लोहा ,कंधार तालुक्यातील माझा प्रत्येक कार्यकर्ता ग्राऊंडला प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे ही आ. शामसुंदर शिंदे ,आशाताई शिंदे यांनी सांगितले .आ. शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्यासमवेत जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील ,कंधार कृ. उ. बा. समितीचे सभापती ज्ञानेश्वर पा.चौडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे,श्याम अण्णा पवार,रोहित पा. शिंदे,उपसभापती अरुण पा. कदम,माधव घोरबांड,पंकज पा. आंडगेकर,अशोक पा. कळकेकर,शेरू भाई,अनिकेत जोमेगावकर ,शाम सावळे, सुधाकर सातपुते,नागेश खांबेगावकर,बंटी गादेकर,अशोक सोनकांबळे आदीसह कार्यकर्ते सतीश चव्हाण यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी मतदारसंघात परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *