कमळेवाडी येथील घटना
मुखेड/ ता.प्रतिनिधी:
चेतना सादगीर वय वर्ष २७ या विवाहितेस सासरच्या मंडळींनी अनेक वेगवेगळ्या कारणांनी मानसिक त्रास देऊन छळले असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून सासरच्या या त्रासाला कंटाळून चेतना सादगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सद्य वास्तव्यास असलेल्या रबाळे पोलीस ठाणे नवी मुंबई येथे सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की,मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथील ईश्वर पांडुरंग सादगीर यांच्याशी दि.२४/४/२०१२ रोजी विवाह झाला.सुरुवातीचे दोन महिने चांगले गेले परंतु लग्नाअगोदार ईश्वर याना शंभर टक्के नोकरी लागणार असे बोलून त्यासाठी साडे तीन लाख रुपयांची रोख रक्कम घेतली होती .
त्यासंदर्भात ईश्वर याना विचारपूस केली असता पत्नी चेतना हिस पट्ट्याने मारहाण केली व लग्नात माहेरच्यांनी दिलेले पाच तोळे सोनेही बळकावले. दीर परमेश्वर यांच्या एम बी ए च्या शिक्षणासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली त्यास विरोध केल्यामुळे चेतना यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.१० जुलै २०१३ रोजी चेतना यांनी एका मुलीला जन्म दिला परंतु मुलीच्या जन्मामुळे सासरच्यांनी खूप त्रास दिला व लाथा बुक्यांनी मारहाण केली.२०१६ मध्ये मुंबई येथे वास्तव्यास गेले असता तेथेही दारू पिऊन ईश्वर यांनी चेतना यांच्यावर संशय घेऊन बेदम मारहाण केली.
२०१८ मध्ये चेतना कामासाठी बाहेर गेल्या असता पती ईश्वर व दीर परमेश्वर यांनी मुलगी आराध्या हिला कमळेवाडी येथे घेऊन गेले व तदनंतर चेतना यांच्याकडे मुलीच्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केली .या साततच्या त्रासाला कंटाळून चेतना यांनी रबाळे पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.त्यानुसार सासरकडिल पती ईश्वर सादगीर,सासरे पांडुरंग सादगीर,सासू राधाबाई सादगीर,दीर परमेश्वर सादगीर,नणंद सावित्री कोंडगिर,नांदावा मारुती कोंडगिर या सर्वांना अटक करून भा.द.सं.कलम ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास रबाळे पोलीस स्टेशन चे तपासी अधिकारी करत आहेत.