कंधार ; प्रतिनीधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात रक्तसाठा कमी झाला असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.त्याला दि.१३ डिसेंबर रोजी कंधार तालुक्यातील माजी सैनिकांनी रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे घेवून प्रतिसाद दिला व देशाप्रती निष्ठा दाखवली.
कंधार शहरातील भवानी नगर येथे दिनांक 13 डिसेबंर रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराला शहरातील नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.अनेक रुग्णांची मोफत तपासणी करुन उपचार करण्यात आला.
या आरोग्य शिबीरास डॉ.प्रसाद देशमुख,डॉ.सौ.राखी मुन्नेश्वर ,यांची प्रमुख उपस्थित होती.शिबीराचे उदघाटन शहिद संभाजी कदम यांची वीरपत्नी पत्नी शितल कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
कंधार तालुक्यातील माजी सैनिक हे सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात.कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन असताना शहरातील माजी सैनिकांनी जिवाची पर्वा न करता 24 तास कामकाज करुन कंधार पोलिसांना साथ दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करा असे आवाहन केल्यानंतर कंधार तालुक्यातील माजी सैनिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचे अयोजन करुन रक्तदान केले.या शिबिराला अनेक राजकीय नेत्यांनी व सामाजीक संघटनेच्या पदधिकाऱ्या भेट देऊन रक्तदान केले.
यावेळी सैनिक जिल्हा बोर्डचे अधिकारी शेट्टे ,त्रिदल संघटना जिल्हा अध्यक्ष नांदेड बालाजी चुकलवाड,पोचीराम वाघमारे,अर्जुन कांबळे , बनसोडे ,आनंद नवघरे, केंद्रे ,पाशा शेख,मुंडे आदींची सहकुटूंब उपस्थिती होती.
***