मुंबई दि (प्रतिनिधी) आंबेडकरी विचाराच्या चळवळीला स्वतःला वाहून घेणारे लढवय्ये सर्वसामान्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस व रिप सेनेला सोडून हरिभाऊ कांबळे शेकडो समर्थकांसह रिपाई डेमोक्रॅटिक मध्ये प्रवेश घेऊन नव्या जोमाने कामाला लागले आहेत.
स्वाभिमानी व्यक्तिमत्व असलेले हरिभाऊ कांबळे राष्ट्रवादीला सोडचिठी देऊन रिपाई डेमॉक्रॅटिक माजी आमदार टी. एम. कांबळे यांच्या पक्षात प्रवेश घेऊन आता ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपदी विराजमान होऊन महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत.
पक्षाध्यक्षा नंदाताई कांबळे यांच्या आदेशांने पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या हस्ते नुकतीच हरिभाऊ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आंबेडकर चळवळ मजबूत व्हावी यासाठी कसोशीने प्रयत्न केले, कामगार क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून बहुजन कामगार उत्कर्ष महासंघ या युनियन ची स्थापना करून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
बी.एस.पी, रिप्लब्लिकन सेना आदी पक्षाच्या माध्यमातून शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांची ज्योत पेटवून अनेक उमेदवार महानगरपालिका व विधांनसभेला उभे केले.
बहुमूल्य अनुभवाचा ठेवा घेऊन आलेले हरिभाउ रिपाईच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत आमूलाग्र बदल घडवतील असा आशावाद महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची ताकत प्रदेशात वाढत असून आंबेडकरी विचाराच्या पक्षामध्ये पहिली पसंती कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वातील डेमोक्रॅटिक रिपाईला मिळत आहे.
आंबेडकरी चळवळ पुढे नेऊन दांभिक प्रवृत्तींना ठेवून काढण्याचे काम स्वाभिमानाने रिपाई डेमोक्रॅटिक च्या माध्यमातून करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हरिभाऊं कांबळेनी प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष कॅ. श्रावण गायकवाड, उपाध्यक्ष व प्रवक्ते वसंत कांबळे, विजय चव्हाण, राजेश पिल्ले, इम्रान मंसुरी, सचिन भूटकर यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस सम्यक सदिच्छा व्यक्त केल्या.