कंधारहे राष्ट्रकुटकाळापासून ते आज तागायत विचार क्रांतीचं ठिकाण सामाजिक, राजकारणी आणि धाम्मिक कार्यात कार्यरत असलेले शहर म्हणून संपूर्ण जिल्हयातमध्ये त्याची ओळख आहे .म्हणतात ना विचारांनी विचार पेटला विचारांनी क्रांती घडविली ,क्रांतीने जीवन बदलले दगड धोंडे मारुन त्या निर्दयी निष्ठूर क्रांती करण्यापेक्षा पुस्तक,
पेन वहीची वैचारिक विद्वतेची क्रांती करावी जीवनात बदल घडून आणावा.दान पारमीता करुन मन शुध्द करावे.
माणसाच्या जीवनाची जडणघडण हे त्याच्यावर होणाऱ्या संस्कारातून होते असते ,माणूस काही गुण काही सवयी आपल्या वाडवडिलांकडून घेऊन येतो परंतु त्याच्यावर परिस्थितीचे परिणाम होतो, परिस्थिती माणसाला शिकविते माणसाचे जीवन ही एक लढाई आहे ,रंगभूमी आहे ,कर्तुत्वाचे पीठ आहे. परंतु प्रत्यक्षात जीवन कसे आहे ,याचे उत्तर आपल्याला व्यक्तिगणिक वेगवेगळे ऐकायला मिळते .काहीजण स्वतःसाठी जगतात काहीजण निंदा व(कुठाळक्या) प्रसिद्धीसाठी जगतात ,काहीजण विचार क्रांतीसाठी जगतात तर ,काहीजण दूसर्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी जगतात .या सर्वांमध्ये दुसर्यांसाठी व निरपेक्ष दान पारमितेसाठीच जगतात , त्यात फार मोठा आनंद मिळतो. कितीतरी गोष्टी माणसाला जगण्यासाठी प्रेरणा देतात.
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 06/डिसेंबर 2020 या दिनी आपली मातृ संस्था “भारतीय बौद्ध महासभा”शाखा कंधार माध्यमातून 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ,त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्याच्या साठी कंधार येथील सर्व सामाजिक राजकारणी आणि धार्मिक कार्यात कार्यरत असलेले, सर्व व्यक्ती या ठिकाणी आली होते .या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारांमध्ये त्यांना आदरांजली वाहत असताना कंधार ची असलेले भूमिपुत्र, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी,सामाजिक धम्मिक चळवळीसाठी सढळ हाताने दान करून सम्यक कार्यास प्रोत्साहित करणारे दाते असलेले आद.आयु. इंजिनियर प्रदीप माणिकराव ढवळे (ओमान) यांनी डॉ बाबासाहेब यांच्या जागतिक कार्याचे विवेचन करून डॉबाबासाहेब आंबेडकरांजागतिक कार्यप्रणालीवर त्यांच्या कार्याविषयी प्रकाश टाकला .
आणि या माध्यमातून त्यांनी सर्व उपस्थित कंधार वासियांना त्यांनी आवहान केलं. कंधार येथे असलेल्या बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र स्मृर्तीशेष
सूर्यपुत्र,भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या स्मारक
अस्थी वरील एक एक पर्यटन स्थळ निर्माण करण्याची संकल्पना भारतीय बौध्द महासभेने घेतलेली जबाबदारी पूर्ण करण्याच्या हेतूने ,त्या कार्याला पुढे नेण्याचं काम त्यांच्या बोलण्यात आलं, त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं ,मी त्या कार्याला आणि समाजातील गोरगरीब लोकांच्या साठी समोरील भागात दुकाने काढून त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांनी आपल्या कमाईतील 51 हजार रुपये त्यांनी देण्याचे त्याठिकाणी घोषित केले,
त्यानंतर आमच्या भीमनगर कंधार ची स्मृतीशेष गोविंदरावजी होंडाळकर (ग्रामसेवक) यांची मुलगी आयु.प्रियाताई विजय भोसले ,(रत्नागिरी) यांनी ही आपल्या कमाईतील 25हजारा दान देण्याचे घोषित करून दान पारमिता पुर्ण करण्याचा संकल्प घेतला .आणि उपस्थित सर्वांना या कार्यासाठी त्यांनी प्रोत्साहित करण्याचे काम केलेला आहे….l
भाग दुसरा…।
12 डिसेंबर 2020 रोजी सूर्यपुत्र,स्मृर्तीशेष भैय्यासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर ,यांच्या 108 व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले, व आपली मातृ संस्था” भारतीय बौद्ध महासभा कंधार”यांच्यावतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मारक कंधार. याठिकाणी शॉपिंग सेंटर च्या पायाभरणी चे उद्घाटन करण्यात आले .आणि “भदंत विनय बोधी प्रिय” नांदेड यांचे धम्मदेशना झाली. त्यांनी “बौद्ध धम्मात दानाचे महत्त्व” विषयी पटवून देत उपस्थितांच्या अंतर्मनात दान देण्याची भावना निर्माण करणारी धम्मदेशना दिली. या कार्यास मूल्य दान करणारी पहिली पावती.
1)#आयुप्रदीपमाणिकरावढवळे (51,000) (ओमान इंजि.)
2) #आयुप्रियाविजयभोसले यांच्याकडून विजय भोसले(रत्नागिरी इंजि.) यांचे 25 हजार
3)#आयुनिळकंठकिशनरावकांबळे (10,000) 4)#आयुदगडुभाऊसोनकांबळे माजी न.पा. अध्यक्ष 5,000) 5)#आयुरविलक्ष्मीमनभालेराव
(एक एक हयवा रेती व गीट्टी)
6)#आयुविजयसटवाजी_वाघमारे (2000)
यांच्याकडून मूल्यदान मिळाले. समाजातील सर्वानीच या कार्यास दान देण्याचा संकल्प केलेला आहे. या समयी कंधार येथील समाजातील पत्रकार व सामाजिक, धम्मिक ,राजकारणी चळवळीतील सर्व मान्यवर ,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्या दक्षिण नांदेडचे अध्यक्ष आयु.पि.एम.वाघमारे जि.संरक्षणं सचिव आयु. हरी कसबे व समता सैनिकचे मेजर ता.उपा.मेजर संतोष दुंडे व संपुर्ण त्यांचे सदस्य व ता.अध्यक्ष विलास ल.कांबळे ता.सरचिट. एन.एन.कांबळे ता.कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे, संघटक सुदाम मोडके संस्कार सचिव नाना गायकवाड शहराध्यक्ष निलेश गायकवाड
कार्यकरणी उपस्थित होती.
बौध्दाचार्य,निलेश अशोकराव गायकवाड यांच्या लेखनीतून
कंधार 9730314435
क्रमशः