श्री रमेश माधवराव देशमुख.
तालुका कृषी अधिकारी कंधार जि. नांदेड.
सन1983 पासून कृषी विभागात कार्यरत.
कृषी विभागात काम करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली.
विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण ,खरीप हंगामपूर्व गाव बैठक, उत्पादकता वाढीचे तंत्रज्ञान ,पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, मृद चाचणी व मृद पत्रिकांचा वापर करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ,बीजप्रक्रिया ,एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचे माध्यमातून कीड व रोगांचे व्यवस्थापन, मिनी कीट, शेतकरी मेळावे ,मूलस्थानी जलसंधारण ,विविध पीक पद्धतींचा अवलंब, शेतकरी गटांची निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर, सेंद्रिय शेती व जैविक खत बाबत जनजागृती, रुंद वरंबा-सरी पद्धतीने लागवडीस प्रोत्साहन, कृषिक्षेत्रात प्लास्टिकचा वापर, सिंचनासाठी ठिबक तुषार सिंचन बाबत जनजागृती, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन ,सामूहिक शेततळे, कांदाचाळ , वृक्षलागवड ,पीएम किसान, पिक विमा, कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रदर्शन , फळबाग, इत्यादी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली यासह जागतिक कडधान्य दिन, मृदा आरोग्य पत्रिका दिन, जागतिक महिला दिन कृषी दिन साजरे केले.मृद व जलसंधारणाची कामे , जलयुक्त शिवार अभियान, सामुहिक शेततळे, मागेल त्याला शेततळे शेततळे अस्तरीकरण इत्यादी कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली.
पिक विमा योजनेची जनजागृती करून शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढवला.
बीजप्रक्रिया,मृदचाचणी, आंतरपीक पद्धतीबाबत जनजागृती करून मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आंतरपिकाखाली आणलं.
गुलाबी बोंड अळीचे प्रभावी व्यवस्थापन करून दर्जेदार कापूस उत्पादनासह तालुक्याचा जिल्ह्यात सरासरी उत्पादनात सन 2019 या वर्षी प्रथम क्रमांकवर.
कृषी क्षेत्रातील अग्रगण्य दैनिकात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध झाल्या.
दैनिक अग्रोवन मध्ये यशोगाथा प्रसिद्धी झाली.
शेतकरी या कृषी विभागाच्या नोव्हेंबर 2019 च्या मासिकात यशोगाथा प्रसिद्ध झाली.
विविध प्रसारमाध्यमांचा वापर करून तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य या मासिकात कंधार तालुक्यातील यशोगाथा प्रसिद्ध झाली.
सामूहिक शेततळ्यांचा सिंचनासह मत्स्य पालनासाठी वापर करून शेतकऱ्यांना या व्यवसायातून जास्तीचे उत्पादन मिळवून दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने सह इतर कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेतून मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड करण्यात आली.
कोविड महामारीच्या संकटात भाजीपाला, फळे यांची शेतकरी ते ग्राहक पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले.कोवीड महामारीच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर खत व कृषी निविष्ठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात तिपटीने वाढ झाली.
शेडनेट मधील भाजीपाला बीजोत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले व मोठ्या प्रमाणावर भाजीपाला बिजोत्पादन सुरू केले सदरील बीजोत्पादनातून 10 गुंठे शेडनेट मधून 1, 50 ,000 ते 3,00,000 रुपये पर्यंत शेतकऱ्यांना खर्च वजा जाता निव्वळ नफा मिळत आहे.
कृषी विभागात काम करताना यापूर्वी
१) सन २००२-०३ या वर्षी महाराष्ट्र कृषी सेवा गट ब (कनिष्ठ) कृषी अधिकारी या संवर्गात अतिउत्कृष्ट काम केल्याबद्दल आगाऊ वेतनवाढ मंजूर झाली होती.
२) सन २००६-०७ या वर्षी तालुका कृषी अधिकारी या संवर्गातून मा.आयूक्त कृषी यांचे अतिउत्कृष्ट कामाबद्दल प्रशस्तीपत्र मिळाले.
३) सन २०१९-२० या वर्षी तालुका कृषी अधिकारी या संवर्गातून दुसर्यांदा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्रासाठी निवड झाली आहे.
विविध वरीष्ठ अधिकारी यांचेकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अनेक प्रशस्तीपत्रे.
२०१५ व २०१९ या वर्षी कृषी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल विठ्ठलराव विखे पाटील परिषदेकडून तर कृषी विस्तार व प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ह्यूमन सर्व्हिस फाऊंडेशन व मिडीया एक्झिबिटर्स प्रा.लि. यांच्याकडून कृषीथॉन सन्मान २०१९ पुरस्कार, पंचायत समिती कंधार कडून सर्वसाधारण सभेत उत्कृष्ट कामाबद्दल अभिनंदन ठराव
या प्रत्येक कालावधीत वरीष्ठ अधिकार्यांनी आमच्या कामाची दखल घेऊन जो सन्मान मिळवून दिला त्या सर्व अधिकार्यांचे , वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ ,कृषि विज्ञान केंद्र सगरोळी पोखर्णी व हा सन्मान मिळण्यासाठी बरोबरीने काम केलेल्या त्यांच्या सहकारी कर्मचार्यांचे अभिनंदन .