अवघा रंग एक झाला

“Man proposes,
But God disposes. “


या अशाच काहीश्या अवस्थेतून

आम्ही चाललो होतो. कारण आम्ही बांधलेले घर अगदी शेवटच्या टप्प्यात आले होते अन मग आम्हाला ओढ लागली होती ती गृह शांतीची. तो सोहळा मला (कारण अजून माझ्यात ‘मी ‘पणा भरलेला होता ना !)अगदी थाटामाटात करायचा होता. माझे बरेचसे नियोजनही झाले होते. (मला माझ्या ऐहिक सुखाचे प्रदर्शन करायचे होते ना. )आणि मग काय माझ्यासारख्या स्वसुखाच्या मस्तीत असणाऱ्या ‘कुप-मंड्कला ‘हे Lock -down ‘म्हणजे अय्या ! आमच्याकडे कुठे आलाय हा corona का बिरोना उगाच शासनचा काही तरी अट्टहास. पण शेवटी काय म्हणतात तसें शासनाला मनोमन शिव्या शाप घालून झाले आणि “आलिया भोगासी -म्हणून Lock -down चे करावे स्वागत म्हणत परिस्थितीचा स्वीकार केला. (फारच नाईलाज केला बाई या corona ने अगदी माझी गृह शांती तरी होऊ द्यायची ना !)


Lock -down असल्यामुळे सगळी मंडळी घरीच मग काय मुलाचे चोचले पूरविने, नवऱ्याच्या मागण्या राखने यात अगदी दिवस कमी पडत होता. मग काय रोज काही तरी चमचमीत करायचे आणि लगेच (तोंडाला पाणी सुटले तरी संयमाचा बांध न तोडता )What’s App Status वर टाकायचे असेच चालू होते चार आठ दिवस खाऊन -पिऊन समाधानाने चालू होते.आणि इकडे मात्र corona रुग्नाची संख्या झपाट्याने वाढत चालली होती. आता मात्र माझ्यातल्या ‘मी ‘ची कारण Social media वरचे चित्र फार विदारक होते.

मग मात्र माझ्या नावापुढच्या सगळ्या पदव्या गळून गेल्यासारख्या वाटल्या. खरंच किती स्वार्थीपणाने मी जगत होते ना आत्ता पर्यंत कधी Couple Challenge, कधी Friends Challenge यातच स्वतः ला धन्य मानत होते. पणदुसऱ्या बाजूला स्वतः च्या जीवाची कसली हि पर्वा न करता दवाखान्यात राबनाऱ्या त्या सर्वांचे चेहरे देवाप्रमाणे भासत होते. आम्ही घरात बंद पण रोज सकाळी न चुकता सफाई कामगार त्यांच्या कामावर हजर, दिवस -रात्र आम्हाला आमच्याच भल्यासाठी घरात बसविनारे पोलीस कर्मचारी हे सर्व म्हणजे खरोखरच आपल्यासाठी देवच तर आहेत, याची जाणीव झाली आणि मग मात्र माझे संस्कारी मन (कदाचित संस्कारी )आतून पोखरून निघाले माझ्या मुलाचे Hygiene जपणारी मी जेव्हा पाहते की, वस्तीतील मुले त्यांच्या आईने घरी तयार केलेली ‘मास्क ‘बांधून, त्या तुटक्या दारातून ढासालेलेभिंतीती त स्वतः ला Lock down करून घेत होती.

तर कुठे कोणी दोन वेळच्या जेवणाच्या विवंचनेते होते खाजगी नोकरीतील लोकांना पगार मिळेल की नाही ही चिंता होती.
वरचे वर विदारक होत जाणारी परिस्थिती पाहून माझ्यातल्या मला खूप खोलातून आवाज आला, “अग तू अशी बावरु नकोस, तुला तिकडे कोणाला जाऊन द्यायची गरज नाहीये, तुझ्याकडच्या कामवालीला तू पगारी रजा दे. तुझ्याच जवळ राहणाऱ्या एका कुटुंबाला अन्न -धान्यची गरज आहे त्यांना तू मदत कर. “हा आवाज ऐकल्यावर मात्र आज पर्यंत मी, माझा नवरा, माझी मुले एवढाच विचार करणाऱ्या मला जणू काही कानशीलात जोरदार चपराक मारल्या सारखे झाले.

मग खऱ्या अर्थाने तुकोबाचा अभंग आठवला –
“बुडती हे जन


न देखे डोळा


येतो कळवला म्हणूनिया. “


मग काय खरंच मी अगदी प्रत्येकाचा विचार करून वागायला शिकले. जेव्हा माझ्या मदतीने माझी कामवाली मला एकही शब्द न बोलता केवळ तिच्या त्या डोळ्यातील आसवाणीच मी व ती एकमेकिंशी बोललो. जेव्हा माझ्या यजमानानी त्या व्यक्तीला व तिच्या कुटुंबाला किराणा वस्तू देऊ केल्या तेव्हा देखील तीच परिस्थिती पुढे आली.
खरोखरच या Kovid -19ने माझ्या तरी जीवनात माझ्या पुढील आयुष्यासाठी फारच सुंदर आणि मौलीक संदेश दिलाय. आता पर्यंत आपण फक्त चंगल वादि व एहिक सुखाच्या कुठेही न थांबनाऱ्या हव्यासामागे पळत होतो पण आज परिस्थितीनेच आपल्याला दाखवून दिले की निसर्ग किती बलवाण आहे व आपण मानव किती कस्पटासम?


असाच अजून एक अनुभव सांगण्यासारखा आहे -हनुमान जन्मदिनी अर्थात चैत्री पौर्णिमेला आम्ही ओली परडी भरतो. त्या दिवशी 12:00वा. परडी धरनाऱ्या मावशी अगदी शासनाचे सर्व नियम पालात आल्या. या वर्षी मात्र आम्ही ओली व कोरडी या प्रमाणे परडी तर भरलीच पण माझ्या यजमानानी देखील त्या मावशीला घरातील प्रत्येक व्यक्ती करवित्यांना त्यांच्या काही गरजा पूर्ण करता येतील इतपत दक्षिणा देऊ केली.


आपल्याशरीराला खऱ्या अर्थाने पौष्टिक, सुदृढ, संतुलित बनवणारा पण प्रत्यक्षात मात्र नेहमी दुर्लक्षित राहिलेला असा ‘बळीराजा ‘.या परिस्थितीतीत मात्र फारच आपलासावाटत होता कारण स्वच्छतेचि पुरेपूर काळजी घेऊन तो घरोघर भाजी देत होता अशीच एक आजी दारावर थाप मारून गेली मी तिच्याकडून भाजी, फुलेघेतली तर यजमानानी, “अग आजीला चहा -पाणी दे ना असे म्हटले “तेव्हा ती माय -माऊली म्हणाली, “नको रं माय फकत भाजी घे न्हाई तर वाटोळं होऊन फेकायला लागतीय. “तिचे ते शब्द ऐकून आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहत राहिलो. मग मात्र रोज ती आमच्या वाड्यात यायला लागली व फुले तर ती राहू दे माय म्हणून असेच देऊन जायची.


या सर्व गोष्टी मुळे साने गुरुजीची कविता आठवते –
“खरा तो एकचि धर्म
जगाला प्रेम अर्पावे. “
ही कविता आज खऱ्या अर्थाने उमगतं होती.
शासनाने घालून दिलेले सर्व नियम अगदी काटेकोरपणे पाळत, Lock down चा कंटाळा न करत शासनाचेच आभार मानत होतो. कोविड -19या तिसऱ्या जैविक महायुद्धाने, “जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा. “याचा खरा प्रत्यय आणून दिला.
सफाई कामगार, पोलीस, वीज -वितरण कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर, बँक कर्मचारी, किराणा दुकानदार, औषधी दुकानदार, शेतकरी या सर्वांचे व तसेच आपल्या सक्षम आणि दूरदृष्टी शासनाचे आम्ही सर्व आजन्म ऋणी असणारच यात शंकाच नाही. विकसित देशांनाही हवालदिल करून सोडणाऱ्या या आजाराला भारतासारख्या विकसनशील देशाने मात्र भरपूर प्रमाणात रोखले आहे. यातच आपल्या शासनकर्त्यांचे सक्षम नेतृत्व दिसून येते. कारण गोरगरिबांना 2-2 महिन्यांचा रेशन दिला जात आहे. तसेच गरजूंच्या खात्यातही शासन पैसे जमा करत आहे. अन शासनाच्या तिजोरी वरचा भार पाहून शासनाला आर्थिक मदत करणारे अनेक कर्णपुत्र याच भरत भूमीत पहायला मिळत आहेत. अनेक दाते आज शासनाच्या बाजूने उभे राहिलेले आहेत.


या कोविड – 19 ने एक मात्र दाखवून दिले-” अवघा रंग एक झाला. ” अन खरेच Macbeth या प्रसिद्ध नाटकातील संवाद अगदी मनात येऊन जातो-
“Fair is foul
Foul is fair. “

सौं. भाग्यश्री लालवंडी कर-जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *