किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांची मागणी
लोहा / प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा सरसगट मंजूर करावा अशी मागणी शिवसेना प्रणित किसान सेनेच्या वतीने किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद केले की, लोहा तालुक्यात सप्टेंबर 2020 या महिन्यात ढगफुटी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचे खरीप पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकरी बांधव गेल्या तीन ते चार वर्षापासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यांचा सामना करीत आहेत यंदा २०२० च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांने मोठ्या आशेने आपल्या शेतात मुग उडीद सोयाबीन ज्वारी कापूस आदी पिकांची लागवड केली होती पिके हातातोंडाशी आलेली असतानाच त्यावर अस्मानी संकटांनी घाला घालुन शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तेव्हा राज्य शासनाने यांची दखल घेऊन राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून १० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले.
यात खरीप पिकांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान तर फळबाग पिकांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान मंजूर केले. पंरतु पिक विमा कंपन्यानी अद्याप पर्यंत सर्व शेतकर्यांना सरसगट पिक विमा मंजूर केला नाही. केवळ १५ते २० टक्के शेतकऱ्यांनाच पिक विमा मंजूर केला आहे आणि बाकी ८० टक्के शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्यायच केला आहे तेव्हा पिक विमा कंपन्या नी सरसगट सर्वच शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करावा अशी मागणी शिवसेना प्रणित किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
https://www.facebook.com/groups/711303222632357/permalink/1096813294081346/