दोन गुत्तेदारांच्या वादात रखडलेला महामार्ग देतोय अपघातांना निमंत्रण ही होती बातमी;जीवाला धोका होता अशी ग्रामस्थांची प्रतिक्रिया.
फुलवळ ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील फुलवळ येथून एक राष्ट्रीय महामार्ग तर एक राज्य महामार्ग जात असल्याने गावावरून दोन महामार्ग जतायेय याचा जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षाही तोच रस्ता रखडल्यामुळे होत असलेल्या अडचणीमुळे त्रासदायक ठरत असून दोन गुत्तेदारांच्या वादात अडगळीत पडलेला महामार्ग जनुकांही अपघातांनाच आमंत्रण देतोय की काय अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने गावकऱ्यासह प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले अशी जनहितार्थ बातमी सकाळ ने काल प्रकाशित करताच संबंधित गुत्तेदारांचे धाबे दणाणले आणि आज प्रत्यक्षात सदर रस्ता दुरुस्ती च्या कामाला सुरुवात झाली हे केवळ आणि केवळ सकाळमुळेच झाले अन्यथा कित्येक जिवाना याचा धोका पत्करावा लागला असता अशी प्रतिक्रिया जनमानसातून ऐकायला मिळते.
येथून लोहा ते फुलवळ मार्गे मुखेड हा राज्य महामार्ग जात आहे तर नांदेड ते फुलवळ मार्गे जांब हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. सदरील दोन्ही महामार्ग रस्त्याचे काम करणारे गुत्तेदार हे वेगवेगळे आहेत. राष्ट्रीय महामार्ग हा सिमेंट रस्ता आहे तर राज्य महामार्ग हा डांबरीकरण रस्ता होत आहे पण अर्धवट काम झालेल्या ठिकाण ची अपघात सदृश्य परिस्थिती पाहून सकाळ ने वेळीच आपला दणका दिला त्यामुळे सदरील गुत्तेदारांना हे अडगळीचे काम तात्काळ करणे भाग पडले.
विशेष बाब म्हणजे फुलवळ बसस्टँड शेजारी मुखेड व जांब या दोन्ही रस्त्याला जोडणाऱ्या चौकाच्या ठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अपघातस्थिती निर्माण झाली आहे. हे मुख्य ठिकाण म्हणजे नेमके कोणत्या रस्त्याच्या गुत्तेदाराकडे येतो हा प्रश्नच निकाली निघत नसल्यामुळे सदर दोन गुत्तेदारांच्या वादात या रस्त्याचे आजपर्यंत काम रखडले होते आणि त्यामुळे वाहन चालवताना वाहनधारकांना कसोटीला तोंड देत तर प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.
त्यामुळे येथे छोटेमोठे अपघात तर नेहमीच होत आहेत परंतु जीवघेणी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कधी काय होईल आणि किती जीव गमवावे लागतील की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संबंधित अधिकारी व गुत्तेदार हे याकडे गंभीरपणे कधी पाहतील का ? असा सवाल बोरगावे यांनी माध्यमातून मांडला होता.
तसेच रस्त्याचे व पुलाचे अर्धवट काम करून संबंधित गुत्तेदार नेमके कुठे गायब झाले की काय ? आणि सदर रस्त्यावर काम पाहणारे संबंधित अधिकारी काय झोपा काढताहेत की काय ? असाही प्रश्न सकाळ ने बातमीच्या रूपातून प्रकाशित करत येथे निर्माण झालेल्या अपघातग्रस्त परिस्थिती ला नेमकं जबाबदार कोण ? असाही सवाल उपस्थित करून शासन , प्रशासन व लोकप्रतिनिधीनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुत्तेदारांना वेळीच काम पूर्ण करण्यासाठी भाग पाडले तरच होणारे अनर्थ टाळावेत अन्यथा उदभवणाऱ्या परिस्थिती जबाबदार कोण घेणार ? असा प्रश्न उपस्थित करताच आज भल्या सकाळी संबंधित गुत्तेदारांना जाग आली आणि तात्काळ प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली.
त्यामुळे जनमाणसातून , प्रवाशातून आणि वाहनधारकांतुन समाधान व्यक्त करत नेहमीच सकाळ ने जनहित जोपासत लोभवना ओळखून सकारात्मक बातम्या प्रकाशित करत अन्यायाला वाचा फोडून वेळीच न्याय मिळवून दिला अशा भावना बोलून दाखवत आभारही व्यक्त केले.