कंधार ; प्रतिनिधी
बिलोली शहरात दि.०९ डिसेंबर रोजी अंदाजे संध्याकाळी ६ ते ७ च्या सुमारास एका मातंग समाजाच्या गरीब/मुकबधीर दिव्यांग मुलीवर दोन ते तीन नराधमांनी अन्याय व बलात्कार करुन खुन केला. अशा सर्वाचा तपास करुन आरोपीना तात्काळ फाशी देण्यात यावी यासाठी दि. १४ डिसेंबर रोजी अण्णाभाऊ साठे पुतळा ते महाराणा प्रताप चौक दरम्यान रास्ता रोको करण्यात आला.व कंधार तहसिलवर आक्रोश मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
दि.१४ रोजी झालेल्या रास्ता रोकोचे रुपांतर आक्रोश मोर्चात झाले व हा प्रंचड जनसमुदायाचा आक्रोश मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले व मामा मित्रमंडळ व जाहीर पाठींबा दिलेल्या विविध संघटनेच्या पदाधिका-यांनी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना निवेदन देवून शासनास मातंग समाजाची भावना तात्काळ कळवावी व मातंग समाजातील मुकबधीर मुलीवर बिलोली येथे बालात्कार करुन पुरावा नस्ट करण्यासाठी तिचा निघृन खुन करणाऱ्या ख-या आरोपीचा शोध घेवुन तात्काळ फाशी देण्यात यावी आशी मागील निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदरील घटना अंत्यत निंदनीय आणि घृणास्पद असुन आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच सदर प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन समाजात अशी घटना पुन्हा
होणार नाही याची खबरदारी म्हणुन पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे यासाठी कंधार शहरात सदरील रास्ता रोको व आक्रोश मोर्चा काढला होता असे मारोती मामा मित्रमंडळाचे संस्थापक मारोती मामा गायकवाड यानी यावेळी प्रतिक्रिया देवुन बिलोली प्रकरणातील पिडीता मुलींच्या एकमेव कुटूंबातील सदस्य बहीणीस बिलोली नगरपालीकेत नौकरी देण्यात यावी असे आवाहन केले .
तर या आक्रोश मोर्चाला जाहीर पाठीबा देणारे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,कॉग्रेस चे प्रवक्ते सुरेश कल्हाळीकर,शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळूपाटील लुंगारे,वंचित बहूजन आघाडीचे कार्यक्रते ,एम.आय.एम चे विधानसभा अध्यक्ष हाब्बु भाई,मराठा सेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष उद्धवराव सूर्यवंशी,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकर पाटील घोरबांड,संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष संभाजी पाटील गायकवाड,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नितीन कोकाटे,राजमुद्रा ग्रुपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे,संयुक्त ग्रुपचे साईनाथ मळगे, सत्यशोधक समाज पक्ष सोपान कांबळे ,प्रहार चे तालुकाध्यक्ष नवनाथ वाखरडकर आदीनी मनोगत व्यक्त करुन या निंदणीय घटनेचा निषेध व्यक्त केला.
या आक्रोश मोर्चा व रास्ता रोकोसाठी पद्माकर बसवंते ,आशोक बसवंते,दिगांबर मामा काटकळंबेकर, बालाजी कांबळे ,निरंजन वाघमारे , मुन्ना बसवंते ,उद्धव वाघमारे ,किशोर बारुळकर,प्रकाश ननूरे, केशव बसवंते,कृष्णा बसवंते ,संतोष मरशिवनीकर ,नागेश मरशिवनीकर ,कैलास मंगनाळीकर ,गोविंद मंगनाळीकर,बबन जाधव,निकेत वाघमारे ,सुरज गायकवाड ,विष्णू मरशिवणीकर,संजय गऊळकर आदीसह मामा मित्रमंडळ व कंधार तालुक्यासह शहरातील मातंग समाज बांधव या आक्रोश मोर्चात सहभागी झाला होता.