अभियान 20 डिसेंबर 2020
अत्याचार म्हंटल की, महाराष्ट्रातस, देशात विशिष्ट जात समुह आपल्या डोळ्यासमोर येतो.हजारो वर्ष शतकानूशतके हा अत्याचार नियमीतपणे चालू आहे.वर्ण व्यवस्था,जातव्यवस्था या अत्याचाराच्या मुळाशी कायम राहत आलेली आहे. दलित,महिला,आदिवासी हा वर्ग या अत्याचारात बळी जाणारा प्रमुख घटक असतो.तसे या समुहावर होणारे अत्याचाराचे प्रकार आणि स्वरूप वेगवेगळे असतात.
बलात्कार,खून,सामूहिक हत्याकांड,जातीय बहिष्कार,मंदीरात प्रवेश केल्यामुळे अमानूष मारहाण व बहिष्कार तर कुठे राजकीय विरोधाचा सुड उगविण्यासाठी खून करुन पुरावा नष्ट केला जातो.
अशा जातीय अत्याचारातून लहान मुले मुली देखील सुटत नाहीत. हे विदर्भात एक लहान बालक मंदीरावर गेल्याचा राग सहन न झाल्याने त्याला नग्न करून तापलेल्या फरसीवर बसवल्या गेले परिणामी त्याचा पार्शवभाग पूर्णपणे जळाला ईतका क्रुरपणा केवळ जातीय मानसिकतेतूनच केला जातो.
बिलोली येथील मुकबधीर मुलीचा खून.
बिलोली शहरातील 27 वर्षाची मुलगी आई वडील मरण पावलेले मोठी विधवा बहीन माहेरी राहून तीचा साभाळ करते. एक भाऊ आपल्या उपजिविकेसाठी बाहेरगावी काम करतो.रोजगार नाही,शिक्षण नाही,आजूबाजूला राहणारा समूह असाच रोजंदारीवर जगणारा.मागास वस्ती म्हंटल की अनेक प्रकारच्या समस्या त्यात व्यसन.व्यसनाला पोषक असे सामाजिक स्वासथ्य बिघडवणारे दारु दुकान ही महाराष्ट्र सरकारने मागास,मुस्लीम,कष्टकरी, कामगार वस्तीला दिलेली देणच म्हणावी लागेल.
प्रश्न अनेक आहेत,अशा अत्याचाराच्या घटनेच्या पार्शवभूमीवर अनेक प्रश्न ठळक होतात.याकडे आपण कसे पाहतो त्यावर बरेच काही अवलंबून असते.उदा.लोकशाहीमध्ये सघंटीत समुहावर सध्यस्थितीत शारिरीक अत्याचार कमी झालेले दिसून येते,जे असंघटीत आहेत,आक्रमक नाहीत,कायदा सुव्यवस्थेचा भंग करू शकत नाहीत.अशा निरुपद्रवी समुहाला मोठ्याप्रमाणात सहजपणे लक्ष्य केल्या जात असल्याचे अलिकडे चित्र स्पष्ठ दिसून येत आहे.
याबाबतीत जेवढे असंघटीत समाजाचे गुलाम नेतृत्व जबाबदार आहे तेवढे ईतर घटक नाहीत हे वास्तव आहे.
केवळ भेटी आणि आर्थिक मदत हा उपाय नाही.
अशा अत्याचाराच्या घटना घडल्या की समाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक संवग प्रसिद्धीसाठी पिडीत कुटूंबाला भेटी देऊन थोडीफार आर्थिक मद केल्याचे चित्र सोशल मिडीयाद्वारे अलिकडे मोठ्या प्रमाणात दिसत आहे.फोटोशेसन हा भाग महत्वाचा झाला आहे.
सहा महिण्यापुर्वीची अत्याचाराची ताजी घटना लोकप्रतिनिधी,सामाजिक संघटना,नेते यांच्या विस्मरणात कशी काय जाते..?
एखाद्या घटनेत तोंडावर बोट ठेवलेले नेते दुसर्या घटनेत आकांडतांडव कसे करु शकतात..?
कोणती मजबूरी असते.? आपले राजकीय हितसंबंध धोक्यात येवू नयेत,आपले सरकार आहे,त्यात आपला नेता आरोपी आहे कींवा नेत्याच्या संस्थेतला अत्याचार आहे,मला सहभागी होता येत नाही.मला निवडणूकीत त्यांनी मदत केली आहे,अशा अनेक अडचणी त सापडलेले लोकप्रतिनिधी/ नेते मंडळी हे नौटंकी करण्यापलीकडे पलीकडे काहीच करू शकत नाहीत.बलात्कार झाला की 50000 हजार खून झाला की 1 लाख मदत द्यायची, सभाग्रहात तोंडच उघडायचे नाही..? अशा घटनांमध्ये आरोपी असलेल्या
गुन्हेगाराला कायदेशिर जब्बर शिक्षा झाली तर त्याचा विकृत मानसिकता असलेल्या मुजोरांना आळा बसेल..नाही तर अशा घटनांची पुनर्वृती होतच राहील.
…नव्हे थांबवले पाहीजे.
होणारे अत्याचार थांबवता येतात..त्यांना मुळापासून प्रतिबंध करता येतो. जो समुह सरकारवर आपला अंकुश ठेवू शकतो त्यांच्यावर अत्याचारच होत नाहीत,झालाच तर आरोपींना शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे असलेल्या शक्तीचा ते पुर्णपणे वापर करत असतात. दिल्ली येथील निर्भया केस मधील आरोपिंना फाशीची शिक्षा झाली.हैद्राबाद येथील डाॅ रेड्डी यांच्या आरोपींचे समुहाच्या दबावगटाचा परिणाम म्हणून अधिकार नसताना पोलीसांनी बेकायदेशिर एन्कांउटर केले.
ज्या समाजावर कायम असे अमानवी अत्याचार होतात अशा समुहानी लोकशाहीने जे घटनात्मक अधिकार बहाल केले आहेत अशा अधिकारांचा प्रभावी पणे आपल्या संरक्षणाचे परिणामकारक हत्यार म्हणून वापर केला पाहीजे.
मोर्चा,निदर्शने,धरणे,रास्तारोको हे केलेच पाहीजे यात दूमत नाही.मात्र हे उपक्रम तात्कालीक उपाय आहेत.त्यावरचा कायम स्वरूपी उपचार म्हणजे तुमचे मत कोणाला देता.तुमचे मत मुजोरांना ,जातीयवादी व्यवहार करणारांना,दुष्ट प्रवृतीला,तुमच्या विरोधात धोरणे तयार करणार्यांना ,तुमचे शिक्षण बंद करणार्यांना,तुमच्यावर कायम अत्याचार करणार्यांचे संरक्षण करणार्यांना,तुमच्या विकासाचा मार्ग ज्यांनी रोकून धरला आहे अशां लोकांना/पक्षांना मत देत असाल तर तुमच्या समुहावर कायम निरंतर अत्याचार होत राहतील.पक्ष बदलेल,सरकार बदलेल,मुख्यमंत्री बदलेल,मंत्री, आमदार बदलतील,अधिकारी बदलतील मात्र अत्याचार चालूच राहतील.अत्याचार बंद करण्याचा व बंद असलेला विकासाचा मार्ग चालू करण्याचा मार्ग आणि उपाय निवडूया.
कायमस्वरुपी_उपाय..!!
त्यांना मत देऊ नका.जे तुमच्या बाजूने खंबीरपणे उभे टाकत नाहीत ,केवळ मते घेण्यापुरते मदतीचे नाटक करतात…तुम्हाला केवळ आश्वासने देतात
जे तुमच्या एखाद्या गुलामाला पद देऊन तुमचा नेता म्हणून तुमच्यावर लादतात.त्यांना मते देऊ नका जे तुम्हाला भावनीक मुद्याभोवती फिरवतात,जे तुम्हाला पुतळे स्मारके देण्याचे वातावरण तयार करतात.
जे तुमचे अधिकार आहेत त्याविषयी ब्र काढत नाहीत.
तुमचे मत तुमच्या मुक्तीसाठी लढणार्यांच्या पाठीशी लागणारी शक्ती म्हणून उभी करा भलेही तुमचा आमदार खासदार निवडून येणार नाही,तुमचा एखादा आमदार मंत्री झाला नाही तरी, काही फरक पडत नाही, सरकार कोणाचेही असो, कितीही प्रतिगामी असो,त्याला तुम्ही अंकुश लावू शकता.यासाठी तुम्ही तुमचे मत आर्थिक आमिषाला बळी पडून दुश्मनांची झोळी भरली की तुमच्या मुली बाळींचा बळी घेतला जातो. हत्तेनंतर काढलेल्या मोर्चा आंदोलनाने गेलेला जिव परत येत नाही,एवढे नक्की तुमचे मत तुम्हाला दिल्याने तुमच्या वाटेलाच कोणी येत नाही.कारण तुमच्या संरक्षणाचे मत हे हत्यार आहे ते हत्यार तुम्ही दुश्मनांना दान केले नाही. ते तुम्ही जवळ बाळगले आहे.लोकशाही मध्ये तेच तुमचे संरक्षण करेल.
गुलाम, पोटार्थी दलालांनो समाजाला लढाईचे सुत्र सांगा.
समाजाच्या परिवर्तनाची लढाई स्वसमुहाच्या साधनांवर,सहभागावर,उर्जेवर,त्यागावर,समर्पण आणि बलीदानावर लढायची असते ,ईतरांच्या अर्थात मालकांच्या साधनावर लढली जाणारी लढाई ती लढाईच नसते.समाजाला अधिक परावलंबी,अधिक गुलाम करण्यासाठी एक रचलेले षडयंत्र असते.त्याला चळवळीचे आवरण चढवतात.महापुरुषांचे फोटो,विचार चिकटवले जातात.महापुरषांचा मिळालाच एखादा रक्ताचा घटक तर समाजाला गुलाम करणे अधिक सुलभ, सोपे आणि सहजपणे आपल्या जाळ्यात ओढणे साध्य होते.त्याला स्वप्न दाखवली जातात…तोही त्या स्वप्नात रंगतो,दंग असतो.मालकाचा आदेश पाळत असतो…समाजाला सोबत येण्याचे आवाहन करतो…लढण्याचा आव आणतो…पद…पेहराव..
गाडी..बडेजाव…संपत्ती…लाॅज… दारु…
…लाचार,निष्क्रीय अनूयायी देखील रक्तवारस याचे भोळ्या समुहाला भावनिक पातळीवर महत्व सांगून ‘तो’ आता मंत्री होणार आहे,आपला फायदा होणार आहे….ईत्यादी.
रस्त्यावर यौग्यदिशेन लढणार्यांना कमजोर केल्या जाते. त्याला बदनाम केल जात. त्याला हेखेखोर घोषीत केल जात.कशासाठी समाजहितासाठी छे..हे तर समाजाला निवडणूकीत पक्षाला विकणारे एजंट ,दलाल…बदल्यात काय तर एखादे पद.
चळवळीचा खात्मा करा…पोटभरा हा कार्यक्रम ज्यांचा आहे.ते कधीच समाजाला प्रशिक्षीत करत नाहीत.सुत्र सांगत नाहीत..सुत्र,शास्त्राचा वापर करून लढणे तर दुरच..
दुर्बल,दुबळे यांचे मित्र नसतात..अज्ञानामुळे त्यांना शत्रू समजत नसतात.
चला त्यांना जाग करू या…!!
युवकांनो पुढे या…!!!