नांदेड ; प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पहिल्यांदाच आॅनलाईन आणि आॅफलाईन पध्दतीने परिक्षा घेण्यात आल्या.विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारितेतील पदवी परिक्षेचा नुकताच निकाल लागला असुन नांदेड येथील श्री.गुरु गोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयातुन रुपाली शंकरराव वागरे ह्या विद्यर्थिनीने घवघवीत यश संपादन करुन महाविद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहूमान पटकावला आहे.
रुपाली वागरे/वैद्य ह्या साहित्यीक,लेखिका,स्तंभलेखीका तथा कवियीत्री म्हणून प्रसिध्द आहेत तसेच साहित्यक्षेत्रातील अनेक पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य.विकास कदम,प्रा.आमोल धुळे,प्रा.संजय नरवाडे,प्रा.विपिन कदम,प्रा.गुणवंत सरोदे,सौ.शारदा कुलकर्णी,नागसेन तुलसे तसेच वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.घुंगरवार यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या यशाचे सर्व श्रेय त्यांनी आई-वडिल सौ.शिवकांता शंकरराव वागरे आणि पती सुंदरराज केरबा वैद्य यांना दिले आहे.