लोहा ; विलास सावळे
शहराच्या अगदी जवळ असलेल्या लोहा – गंगाखेड रोड वरील सुनेगाव येथील भारत पेट्रोलियमच्या अंतर्गत असलेल्या सोमेश पेट्रोल पंपावर आज दिनांक १८ डिसेंबर रोजी शेतकरी मेळावा संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनेगावचे पोलीस पाटील रोहीदास पाटील जाधव होते तर प्रमुख उपस्थिती भारत पेट्रोलियम चे अधिकारी विठ्ठलराव फुळवले, फेनो बॅंकेचे अधिकारी संदिपकुमार लुंगारे, सोमेश पेट्रोल पंपाचे मालक तथा माजी जि.प. सभापती स़ंजय पाटील कराळे , प्रगतशिल शेतकरी राम पाटील पवार सायाळकर, शिवराज नांदेडकर, माजी पं.स. सदस्य प्रल्हाद पाटील फाजगे, राष्ट्रवादीचे युवा नेते राम पाटील पवार लोहा ,गजानन पाटील कराळे, वर्षेकेतू पाटील कराळे ,अंकूर सिडसचे मोर,बीएएसएफ चे निखिल स्वामी , प्रभाकर वरपडे ,बायरचे व्यंकटेश वडजे, धरती सिडसचे गायकवाड, अग्रोसनचे किडे,फिचर अॅग्रोचे माधव पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी विविध शेतकी स्टालचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना सोमेश पेट्रोल पंपाचे मालक तथा माजी जि.प. सभापती संजय पाटील कराळे म्हणाले की, आज पेट्रोल पंपाला जवळपास पाच वर्षं पूर्ण झाले ग्राहाकांना चांगल्या प्रकारची सेवा देत आहोत एटीएम कार्ड, फिनोची सेवा आदी येथे उपलब्ध आहे मागच्या वर्षी सोमेश पेट्रोल पंपाच्या वतीने होंडा मोटार सायकली स्कीम काढली तीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला पुढच्या वर्षी येथे मोठा शेतकरी मेळावा घेऊत कृषी तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे असे संजय पाटील कराळे म्हणाले.
तसेच यावेळी फिनो बॅंकेचे अधिकारी संदीप लुंगारे म्हणाले की, फिनो बॅंकेच्या वतीने या सोमेश पेट्रोल पंपावर गोल्ड लोन, एटीएम सेवा, आधार कार्ड द्वारे पैसे काढणे या सर्व सुविधा येथे मिळतील तसेच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही येथे आहेत येथे तुम्हाला पाॅलीशी काढून मिळेल तसेच आधार कार्ड द्वारे कुठल्याही बॅंकेचे पैसे काढता येतील असे संदीप लुंगारे म्हणाले.
तसेच यावेळी प्रगतशील शेतकरी राम पाटील पवार सायाळकर , बीएएसएफ इंडीया लिमिटेड चे फिल्ड आॅफीसर शंकर नवाणे यांचीही भाषणे झाली.
यावेळी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात या भागातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.डी. जाधव यांनी केले तर आभार वर्षेकेतू पाटील कराळे यांनी मानलें