सावित्रीबाई फुले यांचे कार्य भारतीय स्त्रियांसाठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक -सौवर्षाताई भोसीकर

कंधार दि 3 जानेवारी (प्रतिनिधी)

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून महिलांना शिक्षणाची दालने खुली करून दिली म्हणूनच या समाजात स्त्री सन्मानाने जीवन जगत आहे त्यांचे हे आदर्श व प्रेरणादायी कार्य भारतीय महिला साठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकरर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रियदर्शनी मुलींचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कृष्णाभाऊ भोसीकर,श्रीमती प्रतिभा खैरे,सौ. मनीषा कुरुडे, शिक्षक व शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार सौ. वर्षाताई यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील मुलींचा सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना सौ.वर्षाताई भोसीकर म्हणाल्या ज्या काळात स्त्रीयांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते त्यांना शिक्षणाचे हक्क नव्हते समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते त्याकाळात स्वतःच्या अंगावर शेण माती दगड झेलून स्त्रियांच्या शिक्षणासाठी शाळा उघडली व त्या पहिल्या महिला शिक्षका झाल्या त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आहोरात्र प्रयत्न करून स्त्रियांना शिक्षणाची दालने खुली करून दिली त्यामुळे समाजात स्त्रियांना मानाचे स्थान मिळाले आहे पुरुषाच्या बरोबरीने स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत स्त्रियांना त्यांचे सर्व हक्क मिळाली हे सर्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामुळे घडले या त्यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा भविष्यामध्ये मुलींनी चालवावा म्हणूनच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य व त्यांचे योगदान भारतीय स्त्रियांसाठी सदैव प्रयत्न व दिशादर्शक आहे या प्रसंगी सौ. वर्षाताई यांनी सर्व पालकानी आपल्या मुलींना उच्च शिक्षण देण्याचे आह्वान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा खैर्रे यांनी कले व सूत्रसंचालन सौ. मनीषा कुरुडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *