कंधार ; महंमद सिंकदर
हिंदवी बाणा लाईव्ह च्या वर्धापण दिनाचे औचित्य साधुन कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण कंधारच्या वतिने दरवर्षी पत्रकाराचा सन्मान करुन पाच पत्रकाराना मान्यवराच्या हस्ते पुरस्कार प्रदान केल्या जातो. 1जानेवारी रोजी देण्यात येणारा पुरस्कार या वर्षी ग्राम पंचायत निवडणुका चालु असल्यामुळे हा सन्मान व पुरस्कार सोहळा समोर ढकलण्यात आला आहे.
दिनांक 1जानेवारी 2021 रोजी मिर्जा जमीर बेग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीत हिंदवी बाणा लाईव्ह व कै दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाणच्या वतिने देण्यात येणारे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे.
*पंढरीनाथ बोकारे( दै.गोदातीर नांदेड जिल्हा प्रतिनिधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शोध पत्रकारिता पुरस्कार ),
*अनिल कसबे (दै. देशोन्नती आवृत्ती प्रमुख नांदेड यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार)
- चंद्रशेखर वेंकटराव पाटील (दैनिक तरुण भारत मुखेड यांना कै. माधवराव आंबुलगेकर पत्रकारिता पुरस्कार)
*बा.पु. गायकर (दै.सकाळ लोहा तालुका बातमीदार यांना बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता पुरस्कार)
*अॅड दिगंबर गायकवाड (दैनिक देशोन्नती कंधार यांना कै. रवींद्र रसाळ पत्रकारिता पुरस्कार)
यांना हे पुरस्कार जाहिर झाले आहेत.तसेच लोहा कंधार येथिल पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
सध्या जगभरात कोरोना महामारी या संसर्गजन्य व्हायरसने थैमान घातले आहे.केंद्र शासनाने संपुर्ण देशभरात लॉकडॉऊन लावले होते.अशा भयानक रोगाशी महाराष्ट्रातील पोलीस ,डॉक्टर,पत्रकार व स्वच्छता कर्मचारी यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता खुप मोठे कार्य केले आहे.
डॉक्टरांना या व्हायरस चा खुप मोठा धोका असताना ही आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार केले आहेत.महाराष्ट्रात रुग्णावर उपचार करत असताना अनेक डॉक्टरांना या व्हायरचा संसर्ग झाला.त्यात अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला.अशा परिस्थितीतही डॉक्टर डगमगले नाहीत.रुग्णावर उपचार करत राहीले.
यात पोलिस प्रशासनाचे खुप मोठे योगदान आहे.महाराष्ट्रातील जनतेला कोरोना पासुन वाचवण्यासाठी ते 24 तास रस्त्यावर होते.यात अनेक पोलीसांनाही संसर्ग झाला व अनेकांना जिव गमवावा लागला.
जगभरात महामारी पसरली असताना स्वच्छता विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी जनतेची खुप काळजी घेतली. यातील अनेकांना या व्हायरसचा सामना करावा लागला.
या सर्व बाबीचा विचार केला तर यांचाही सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने 1 जानेवारी 2020 रोजी हिंदवी बाणा लाईव्ह या आमच्या न्युज चँनलचा तिसरा वर्धापण दिन निमित्त कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाणच्या वतिने
- जिल्हा चिकित्सक निळकंठ भोसीकर ,
*उपजिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर,
*नायब तहसिलदार विजय चव्हाण,
*लोहा तहसिलदार विठ्ठल परळीकर,
*लोहा पोलीस निरिक्षक भागवत जायभाये,
*कंधार तत्कालीन वैद्यकिय आधिकारी अरविंद फिसके
यांचा ही सन्मान करण्यात येणार आहे तर
सामाजिक क्षेत्रात उकृष्ठ काम करणाऱ्या एका व्यक्तिला पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो.
यावर्षी स्वच्छतेच्या क्षेत्रात सहशिक्षक राजिव तिडके यांनी उत्तम काम केले असल्यामुळे हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.
पुरस्कार वितरण सोहळव्यासाठी विविध मान्यवराची उपस्थिती राहणार आहे.ग्राम पंचायत निवडणुकी नंतर वितरण सोहळा होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.