दलित पत्रकारितेचे आधारस्तंभ ;भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

.अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी वृत्तपत्रसृष्टीचा इतिहास पाहिला तर तेव्हाची पत्रकारीता ही केवळ सामाजिक प्रश्नावर प्रहार करण्यासाठी उपयोगात आणली जायाची.सामाजिक आशय यातून प्रामूख्याने मांडला जायाचा.त्याकाळी माध्यम क्रांतीचा विकास झालेला नव्हता तेव्हा महात्मा ज्योतीराव फूलेंनी वृत्तपत्राचा आधार घेत समाजात नवक्रांतीची ज्योत पेटवली.पददलितांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी देखील वृत्तपत्र माध्यमाचा पूरेपूर उपयोग करत रुढी,परंपरा यावर प्रहार केले.


भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून आपण भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आँबेडकर यांना ओळखतो. अष्टपैलूव्यक्तीमत्वाबरोबर ते धर्मशास्त्राचे अभ्यासक,अर्थशास्त्राचे अभ्यासक,कामगार नेते.राजकीयपक्षाचे संस्थापक द्रष्टे विचारवंत होते.त्यांनी केलेली पत्रकारिता आपल्याला आजही प्रेरक ठरेल अशीच आहे.परंतू आपल्या वृत्तपत्रसृष्टीने बाबासाहेबांची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही.कदाचित पारंपारिक मानसिकतेमूळे जाणीवपूर्वक कानाडोळा केलेला असावा.डाॅ.बाबासाहेबांची पत्रकारिता ही समाजोध्दारक,राष्ट्रोध्दोराचे मूलभूत अधिष्ठान लाभलेली होती.बाबासाहेबांची पत्रकारीता जेवढी आक्रमक होती तेवढीच संयमी होती.त्यांच्या प्रत्येक लेखातून त्यांच्या प्रचंड विध्दत्तेचे दर्शन घडते.त्यांच्या प्रत्येक आग्रलेखात प्रचंड कोटीचे तत्वज्ञान होते.पत्रकारितेसाठीची आवश्यक असणारी अत्युच्च दर्जाची पात्रता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होती.हे मात्र मान्य करावेच लागेल.


डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजात जागृती निर्माणकरण्यासाठी अनेक वृत्तपत्र-पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले.दलित पत्रकारितेचे आधारस्तंभ म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिले जाते.दलित पाक्षिकाचे प्रथम संपादक,संस्थापक आणि प्रकाशक देखिल आहेत,त्यांनी मूकनायक,जनता,समता,प्रबुध्दभारत,बहिष्कृत भारत ई.वृत्तपत्र आणि पाक्षिक यांचे प्रकाशन केले.इंग्रजी भाषेचे प्रकांड विद्वान असतांना केवळ सामान्यजनतेची बोली भाषा लक्षात घेऊन”मराठी”भाषेमध्ये वृत्तपत्र काढली.सामाजिक,आर्थिक,व राजकीय परिवर्तन करण्याचे कार्य बाबासाहेबांची लेखणी करत होती. यातून दलित जनेमध्ये लोकजागृती करण्याचे कार्य प्रभावीपणे पार पडत होते.

३१जानेवारी १९२०रोजी “मूकनायक”या पाक्षिकाचा जन्म झाला.हे पत्रक काढण्यासाठी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आर्थिक पाठबळ पुरवले.”मूकनायक”सूरु झाले तेव्हा टिळकांच्या’केसरी’मध्ये याची जाहिरात छापण्यास डाॅ.बाबासाहेबांनी सांगितले तेव्हा टिळकांनी यास स्पष्ट नकार दर्शविला.’मूकनायक सुरु झाले तेव्हा त्याची किंमत दीड आणा होती.तर वार्षिक वर्गणी अडीच रुपये होती.’मूकनायक’या वृत्तपत्रात बाबासाहेबांनी १४लेख लिहिले.त्यांच्या भाषेत आंतरिक सौदर्याबरोबर उपेक्षित वर्गाचा कळवळा देखिल होता.त्यांच्या आग्रलेखाची शिर्षकेदेखिल समर्पक होती.वाचताक्षणी त्याचा प्रभाव वाचकांवर व्हायचा.बाबासाहेबांच्या पत्रकारितेला १९२०मध्ये प्रारंभ झाला.डाॅ.बाबासाहेब यांनी आपल्या वृत्तपत्रातून प्रमूख चळवळी यथार्थपणे चालविल्या.त्यापूर्वि २३आॅक्टोंबर १८८८साली गोपाळ बाबा वलंगकर यांनी”विचार विध्वंस”नावाची पुस्तिका लिहिली होती.दलित समाजातील ते पहिले पत्रकार होते.


कोणत्याही चळवळीत वृत्तपत्राचे योगदान कीती महत्वपूर्ण असते याची जाणीव बाबासाहेबांना होती.म्हणून ३एप्रील १९२७रोजी ”बहिष्कृत भारत” या पाक्षिकाची निर्मिती केली.यातील “आजकालचे प्रश्न”या नावाचे सदर अतिशय वाचणीय आणि माहितीपुर्ण होते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला त्याचा सारांश वृत्तपत्रामधून उमटला होता.वृत्तपत्राचे माध्यम त्याकाळी फारच प्रभावी ठरले.तसेच त्यांनी मनुस्मृतीचे दहन करुन जातीव्यस्थेला विरोध केला.तसेच बाल विवाहाला विरोध, ब्राम्हणाचे स्वरुप,मातंग समाजाचे प्रश्न,तसेच सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद,रोटी व्यहार व बेटी व्यहार अशा अनेक प्रश्नावर आपले परखड विचार बाबासाहेबांनी वृत्तपत्रातून मांडले त्याचा बराच परिणाम दलित जनतेवर झाला.त्याकाळी अस्पृश्यता मोठ्याप्रमाणात पाळली जायची.

अस्पृश्यता निवारण्यासाठीचा सल्ला काही वृत्तपत्रे देत होती पण प्रत्यक्ष या कार्याला “बहिष्कृत भारत”या वृत्तपत्राने पूर्णपणे वाहून घेतले होते.डाॅ.बाबासाहेबांची पत्रकारिता ही त्यावेळच्या पत्रकारापेक्षा अतिशय प्रतिकूल परिस्थिशी सामना करणारी होती.त्यांच्या लेखातील प्रत्येक शब्द तोलून मापून लिहिलेला असायचा.भारतातील अस्पृश्यांच्या अधिकारांचा कैवार घेण्यासाठी आबेडकरांनी वृत्तपत्राचा आधार घेतला.”मूकनायक” ते “प्रबुध्द भारत”हा डाॅ.बाबासाहेब यांच्या पत्रकारितेचा प्रवास आहे.
सध्याच्या पत्रकारिता विश्वाला डाॅ.बाबासाहेब यांची पत्रकारिता अभ्यासण्याची नितांत आवश्यक्ता आहे.त्यांनी कधीच वृत्तपत्र चालविण्याचा व्यवसाय केला नाही.खरे तर बाबासाहेबांच्या मूकनायकची आज ख-या आर्थाने गरज आहे.तसेच डाॅ.आंबेडकरांनी आपल्या सार्वजनिक जीवनात सूरु केलेल्या वृत्तपत्र-पाक्षिकांचा उपयोग त्यांनी चळवळीचे हत्यार म्हणून केला.

आजही डाॅ.आंबेडकर यांच्यातील पत्रकार हा पैलू काहीसा दूर्लक्षितच आहे.त्यासाठी पत्रकार बाबासाहेब आंबेडकर हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ठ करुन त्यांच्या या विषयावर प्रकाश पाडण्याची अत्यंत आवश्यकता आहे.समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये “आंबेडकरी”पत्रकार निर्माण होण्याची अत्यंत आवश्यक्ता आहे.आपल्या समस्यावर आवाज उठवण्याची ही योग्य जागा आहे असे डाॅ.बाबासाहेबांना वाटत.यातूनच त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली.


सध्या स्थितीमध्ये प्रसारमाध्यमांचे बाजारीकरण झाले आहे.माध्यमे आपल्या ध्येयापासून भरकटलेली आहेत.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्रकारितेतील योग्य मार्ग कोणता या विषयी योग्य मार्गदर्शन करुन पत्रकारितेचा अर्थस सजून सांगतात.आजहि त्यांचे विचार आपल्यासाठी प्रेरक आहेत.महामानव पत्रकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना “पत्रकार “दिना निम्मित मानाचा मुजरा…!

rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *