हळदी-कुंकवाचा खर्च वृध्दाश्रम व अनाथाश्रमाला; ब्राह्मण महिला कंधार शाखेच्या वतीने सावित्रीबाई फुले अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी

सिध्दिविनायक मंदिर नगरेश्वर गल्ली येथे झालेल्या आखिल भारतीय ब्राह्मण महिला शाखा कंधारच्या वतिने नुतन तालुकाध्यक्षा वर्षाताई कुलकर्णी-कुरूळेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

बैठकीच्या सुरवातीला महिला शिक्षणासाठी आग्रही असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.बैठकीत दरवर्षी होणारा संक्रांतीचा हळदीकुंकवाच्या कार्यक्रमास कोरोनामुळे बगल देत सदर रक्कमेत वृध्दाश्रम किंवा अनाथाश्रमात आवश्यक त्या जिवनाआवश्यक वस्तू देण्याचे सर्वानुमते ठरले.

याचबरोबर समाजातील गरीब व गरजू होतकरू महिला स्वावलंबी व्हाव्यात म्हणून लघुघरगुती उद्योग सुरू करण्यासाठी योग्य ती शासकीय स्तरावर कारवाई करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

यावेळी उपस्थित महिलांना अॅड. सुमंगल औरादकर,वर्षाताई कुलकर्णी-कुरूळेकर,लाठकर ताईनी मार्गदर्शन व सावित्रीबाई फुले यांचे जिवनचरित्र सांगितले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखेच्या उपाध्यक्ष अॅड.स्नेहा वडवळकर-देशपांडे यांनी तर आभार प्रभावती लाडकेकर यांनी मानले.

या कार्यक्रमास सहसचिव वंदना गुंटूरकर,ऐश्वर्या महाराज,अलका गोलेगांवकर,हेमलता व्यास,अनिता महाराज,लाठकरताई,मंगल पांगरेकर,भाग्यश्री जोशी,उषा शास्त्री, अनुराधा जोशी,माधूरी जोशी,पुष्पा धानोरकर,दुर्गा व्यास,पारुबाई जोशी, तारा व्यास,प्रमिला व्यास,रेखा व्यास, विद्या व्यास,दुर्गा परमानंद व्यास,शामाबाई दंडवते
यांच्या सह अनेक महिलांची उपस्थिती होती.

यावेळी नुतन अध्यक्षा वर्षाताई कुरूळेकर यांच्या तर्फे अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.विशेष म्हणजे ह्या बैठकीसाठी सुरेखा वडवळकर व सचिव रेखा व्यास यांनी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *