कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यात 97 ग्रामपंचायत निवडणुका चालू आहेत. दिनांक 4 जानेवारी रोजी फॉर्म भरून उचलून घेण्याच्या शेवटच्या दिवशी 15 ग्रामपंचायती बिनविरोध निवड झाली असून 4 गावातील ग्रामपंचायतीचे नऊ प्रभाग बिनविरोध निघाले असल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणूकसाठी दिनांक 23 डिसेंबर पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्याप्रमाणे 30 डिसेंबर ही नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती तर 31 डिसेंबर अर्जाची छाननी करण्याचे होते यामध्ये 2375 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
97 ग्रामपंचायतीसाठी एकूण 841 सदस्य संख्या निवडणूक रिंगणामध्ये आहे .97 ग्रामपंचायतींपैकी आता 15 ग्रामपंचायत दिनांक 4 जानेवारी रोजी बिनविरोध निघाले आहेत.
त्यामध्ये 1)भोजूचीवाडी,2) दैठणा,3) नवघरवाडी,4) मजरेधर्मापुरी,5) हसूळ,6)देवईचीवाडी,7) हिप्परगा,8) गोगदरी,9) तेलुर ,10)तेलंगवाडी,11) वंजारवाडी,12) संगमवाडी,13) नावंद्याचीवाडी,14 )भेंडेवाडी,15) चौकी महाकाया अशा एकूण पंधरा ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत.
तर चार गावांमध्ये नऊ प्रभाग बिनविरोध निघाले आहेत त्यामध्ये कल्हाळी प्रभाग क्रमांक 3, वाखरड प्रभाग क्रमांक 2 ,शेकापुर प्रभाग क्रमांक 3 ,मरशिवनी प्रभाग क्रमांक 1 असे एकूण नऊ प्रभाग 4 ग्रामपंचायतीमधील बिनविरोध निघाले आहेत. अशी माहिती निवडणूक नायब तहसीलदार नयना कुलकर्णी, नायब तहसीलदार विजय चव्हाण,नायब तहसिलदार एस.व्ही.ताडेवाड आदीनी दिली आहे.
उत्तम जोशी ,बारकुजी मोरे मन्मथ थोटे, अथर सरवरी ,मिर्झा नईम बेग ,मंगनाळे,प्रतिक जोंधळे,ज्ञानेश्वर राखे यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
नुकतेच आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कंधार लोहा मतदार संघातील बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायतीनां सुमारे 10 लाख रुपये निधी आणि बहादरपुरा सर्कल मध्ये शिवसेना नेते मुक्तेश्वरराव धोंडगे 10 लाख निधी बिनविरोध ग्रामपंचायतीना देण्याचे जाहीर केले होते.त्यामुळे वरील पंधरा ग्रामपंचायतीना लाभ होणार आहे.