कंधार ; प्रतिनिधी
संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची दि.१२ जानेवारी रोजी जयंती संभाजी ब्रिगेड कंधार च्या वतीने साजरी करुन अभिवादन करण्यात आले.
स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या बळावर एक नाही दोन नाही तर तब्बल पाच पाच सुलतानशाह्याना सुरूंग लावून पाताळात गाडल्या. जिजाऊ मासाहेब यांनी आपल्या कणखर बाण्याने व करारी दराऱ्याने गुलामीच्या काटेरी शृंखला तहसनहस करत संपूर्ण भारताला गुलामगिरीतून मुक्तता मिळवून दिली.
राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांची जयंतीनिमित्त मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी केली असल्याची माहीती यावेळी संभाजी ब्रिगेड कंधार तालुकाध्यक्ष नितीन पाटील कोकाटे यांनी दिली.
कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष विकास पाटील लूंगारे, उपाध्यक्ष गंगाधर पांचाळ, संभाजी ब्रिगेड, कार्याध्यक्ष शैलेश पाटील लुंगारे,आदीची यावेळी उपस्थिती होती.