माळाकोळी ; एकनाथ तिडके
लोहा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या माळाकोळी सह , माळेगाव आष्टर, ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून सदर निकालांमध्ये गावातील प्रस्थापित पुढाऱ्यांना हादरे बसले आहेत , गावातील तरुण कार्यकर्त्यांनी विजय मिळवत परिवर्तन घडवून आणले आहे. माळाकोळी परिसरात संमिश्र कौल मिळाले आहेत.
माळाकोळी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 – 21 मध्ये माळाकोळी येथील पंधरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत तरुण कार्यकर्त्यांनी प्रस्थापित पुढाऱ्यांना पराभूत करत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. वार्ड क्रमांक एक मध्ये सौ.गंगाबाई माधवराव तिडके, निखिल प्रेमचंद मस्के, आरती संगपाल कांबळे, वार्ड क्रमांक 2 मध्ये उषाबाई राजेंद्र सिंह गहेरवार ,अरुण सोनटक्के, वार्ड क्रमांक 3 मध्ये भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी परमेश्वर मुरकुटे, विमलबाई वैजनाथ केंद्रे, उषाबाई सोपान चाटे , वार्ड क्रमांक चार मध्ये केशव सिताराम तिडके वैष्णवी मोहन शूर , मनीषा माधव कांबळे, तर वार्ड क्रमांक पाच मधून शोभा मनोहर राठोड, चंद्रकांत केंद्रे, यांनी विजय मिळवला आहे.
प्रस्थापितांना हादरे, सरपंच पराभूत उपसरपंच विजयी
माळाकोळी ग्रामपंचायत निवडणूक 2020 मध्ये गावातील प्रस्थापित पुढाऱ्यांना हादरे बसले असून माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान सरपंच असलेले चंद्रमणी मस्के यांना अवघ्या तेवीस वर्षे वयाच्या निखिल मस्के यांनी पराभूत करत जायंट किलर ठरले आहेत, तर ज्येष्ठ व माजी सदस्य दीपक कागणे यांचा पराभव करत केशव तिडके यांनी लक्षवेधी विजय मिळवला आहे. उपसरपंच मनोहर राठोड यावेळी तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
माळेगाव येथेही परिवर्तन
लोहा तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या माळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन घडले असून विद्यमान सत्ताधारी पॅनल पराभूत झाले आहे. माजी सभापती कै. रुस्तम पाटील धुळगुंडे यांचे चिरंजीव हनुमंत धुळगुंडे व जि प सदस्य चंद्रसेन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल ने विजय मिळवला आहे तर विद्यमान सरपंच गोविंदराव राठोड यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. आष्टुर ग्रामपंचायत निवडणुकीत युवा कार्यकर्ते बाबासाहेब बाबर यांच्या नेतृत्वाखालील त्यांनी विजय मिळवत परिवर्तन घडवले आहे.मजरेसांगवी येथे माजी पंचायत समिती सदस्य प्रल्हाद पाटील फाजगे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल ने विजय मिळवला आहे, तर वागदरवाडी येथे माजी सरपंच नाथराव केंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवला आहे, चोंडी येथे माजी जि प सदस्य देविदास महाराज गीते यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. खेडकर वाडी येथे शिवकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने तर. गोंडगाव येथे विद्यमान जी. प. सदस्य चंद्रसेन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल ने , चोंडी येथे संतोष जाधव व नामदेव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पॅनल ने विजय मिळवला आहे.