कंधार ;महंमद सिंकदर
हिंदवी बाणा लाईव्ह च्या वर्धापण दिनाचे अवचित्य साधुन कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण कंधारच्या वतिने दरवर्षी पत्रकाराचा सन्मान करुन पाच पत्रकाराना मान्यवराच्या हस्ते पुरस्कार प्रदान केल्या जातो. 1जानेवारी रोजी देण्यात येणारा पुरस्कार या वर्षी ग्राम पंचायत निवडणुका चालु असल्यामुळे हा सन्मान व पुरस्कार सोहळा समोर ढकलण्यात आला होता 1जानेवारी रोजी हे पुलास्कार जाहीर करण्यात आले होते हे पुरस्कार दिनांक 30 जानेवारी 2021रोजी मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात येणार आहेत. वर्धापण दिनाचे अवचित्य साधुन कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण कंधारच्या वतिने दरवर्षी पत्रकाराचा सन्मान करुन पाच पत्रकाराना मान्यवराच्या हस्ते पुरस्कार प्रदान केल्या जातो. 1जानेवारी रोजी देण्यात येणारा पुरस्कार या वर्षी ग्राम पंचायत निवडणुका चालु असल्यामुळे हा सन्मान व पुरस्कार सोहळा समोर ढकलण्यात आला होता 1जानेवारी रोजी हे पुलास्कार जाहीर करण्यात आले होते हे पुरस्कार दिनांक 30 जानेवारी 2021रोजी मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात येणार आहेत.
यावर्षीचे पुरस्कार पंढरीनाथ बोकारे दै.गोदातीर नांदेड जिल्हा प्रतिनिधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शोध पत्रकारिता पुरस्कार ,अनिल कसबे दै. देशोन्नती आवृत्ती प्रमुख नांदेड यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ,
बा.पु. गायकर दै.सकाळ लोहा तालुका प्रतिनीधी यांना कै.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता पुरस्कार,अॅड दिगंबर गायकवाड दैनिक देशोन्नती कंधार तालुका प्रतिनीधी यांना कै. रवींद्र रसाळ पत्रकारिता पुरस्कार तर चंद्रशेखर व्यंकटेशराव पाटील दैनिक तरुण भारत तालुका प्रतिनीधी मुखेड यांना कै. माधवराव आंबुलगेकर पत्रकारिता पुरस्कार, यांना जाहिर करण्यात आला होता हे पुरस्कार 30 जानेवारी रोजी कंधार येथे देण्यात येणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उदघाटक म्हणून गुरुवर्य एकनाथ नामदेव महाराज,अध्यक्ष म्हणून शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डि.पी.सावंत,आमदार डाॕ.तुषार राठोड,आमदार रावसाहेब अनंतापुरकर,आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार शामसुंदर शिंदे,आमदार रत्नाकर गुट्टे, माजी सनदी अधिकारी अनिल मोरे,लोहा नगराध्यक्षा गजानन सुर्यवंशी,माजी नगध्यक्ष अरविंद नळगे ,काॕ.प्रदिप नागापुरकर,रुपेश पाडमुख हे उपस्थित राहणार आहेत.
सध्या जगभरात कोरोना महामारी या संसर्गजन्य व्हायरसने थैमान घातले आहे.केंद्र शासनाने संपुर्ण देशभरात लॉकडॉऊन लावले होते.अशा भयानक रोगासी महाराष्ट्रातील पोलीस ,डॉक्टर,पत्रकार व स्वच्छता कर्मचारी यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता खुप मोठे कार्य केले आहे. आशा कर्मचारी व अधिकारी यांचाही मान्यवराच्यास्ते सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये जिल्हा चिकित्सक निळकंठ भोसिकर ,उपजिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर,नायब तहसिलदार विजय चव्हाण,लोहा तहसिलदार विठ्ठल परळीकर,लोहा पोलीस निरिक्षक भागवत जायभाये, कंधार तत्कालीन वैद्यकिय आधिकारी अरविंद फिसके स्वच्छता निरिक्षक जिंतेद्र ठेवरे यांचा ही सन्मान करण्यात तर स्वच्छतेच्या क्षेत्रात सहशिक्षक राजिव तिडके यांनी उत्तम काम केले आसल्यामुळे हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 30जानेवारी रोजी कंधार येथिल संत नामदेव मंगल कार्यालय ये 4वाजता होणार असल्याची माहिती दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाणच्या वतिने देण्यात आली आहे.