नऊ आँगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी
नांदेड – गंगाधर ढवळे
जिल्ह्यातील हदगाव, माहूर, किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. तसेच राज्यासह देशभरात भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% म्हणजेच १० कोटी इतकी संख्या आहे. ९ आॅगस्ट रोजी देशभरात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी पुढे आली आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने ९ आॅगस्ट १९८२ रोजी जगातील आदिवासींच्या संदर्भात एक सदस्य देशांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत ९ आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात यावा असे जाहीर करण्यात आले. तेंव्हा पासून संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्य असलेल्या देशांमध्ये हा दिवस साजरा केल्या जातो. जिल्ह्यातील आदिवासी समाजाकडून ९ आॅगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. आदिवासी विकास एकता परिषदेने ही मागणी गेल्या तीन वर्षांपासून लावून धरली आहे.
तसेच आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनीही ३ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात आदिवासी जमातीकडून मोठ्या उत्साहाने ९ आॅगस्ट हा दिवस दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. राजस्थान सरकारने या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी ना. पडवी यांनी केली आहे.Attachments area