कंधार ; प्रतिनिधी
“योग” ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली महान देणगी आहे. योग म्हणजे जोडणे किंवा सांधणे याचा अर्थ होतो.आत्म्याला परमात्म्याशी जोडणे होय. त्यातुनच आपले जीवन आरोग्यमय व निरामय होते. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान बरोबरच योगाचे धडे दिले पाहिजेत असे प्रतिपादन कंधार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांनी केले.
बीट उस्माननगर च्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिराढोण येथे केंद्रप्रमुख सौ सुनिता राजकुमार हुडवेकर यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या सोहळ्यासाठी कंधार पंचायत समितीचे विद्यमान सभापती सौ. लक्ष्मीबाई व्यंकटराव पाटील घोरबांड ह्या होत्या,तर पाहुणे म्हणून माधवरावजी पांडागळे, माजी सभापती पंचायत समिती, कंधार राजेश्वर पांडे (शिक्षण विस्ताराधिकारी ) वसंत मेटकर (शिक्षण विस्तार अधिकारी) रमाकांत देवणे( अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती,शिराढोण),भगवानराव पाटील ,साईनाथ पा.कपाळे,राजकुमार हुडवेकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात सुरुवातीला दीपप्रज्वलन करून ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे जयवंतराव काळे यांनी प्रस्ताविक केले त्यानंतर निरोपमूर्ती सौ.सुनीता हुडवेकर यांना सहकुटुंब भेटवस्तू देऊन त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमात बोलतांना आपले मनोगत व्यक्त करताना माजी कॉग्रेस तालुकाध्यक्ष माधवराव पाटील पांडागळे यांनी आपल्या मनोगतात आपल्या शैक्षणिक भागाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी नेहमीच तत्पर राहिले पाहिजे असे प्रतिपादन केले.
त्यानंतर गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांनी निरामय जीवनासाठी योगाचं महत्त्व विशद करून सर्व शिक्षकांनी ज्ञानदाना करतांना योगाचेही धडे विद्यार्थ्यांना द्यावेत असे प्रतिपादन केले. वसंत मेटकर (शिक्षण विस्तार अधिकारी उस्माननगर) यांनी आपल्या काव्यात्मक भावना व्यक्तकरत केंद्रप्रमुख हुडवेकर यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
नंतर सत्कारमूर्ती सौ,.सुनिता हुडवेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे साहित्यिक शिक्षक बाबाराव विश्वकर्मा यांनी सुंदर सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय मुख्याध्यापक श्री,जोशी सर,व जयवंत काळे (कें मुख्याध्यापक) आनंदराव पांडागळे, देवणे सर (मु.अ) उत्तरवार सर, कारामुंगे सर, बिज्जेवार सर, शिवाजी देवणे सर, सौ.तारा मठपती, सौ.बोरलेपवार सौ.बिजमवार ,सौ.पडूळे,सौ.पचलिंग आदींनी सहकार्य केले सोनकांबळे सर यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.