रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत कंधार येथे पथनाट्यातून प्रबोधन ;हेल्मेटचा वापर करण्याचा दिला संदेश

कंधार ; डॉ.माधवराव कुद्रे

३२ वे रस्ता सुरक्षा अभियान
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड व फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बळीरामपुर, नांदेड निळ्या आकाशातील लाल वादळ कलापथकाच्या वतिने दि.2 फेब्रुवारी रोजी कंधार येथे पथनाट्य सादर करुन हेल्मेटचा वापर करावा ,दारु पिऊन वाहने चालवू नका असा सुरक्षा विषयक संदेश दिला.

सदरील कलापथकात
मुख्य गायक माधव नागोराव वाघमारे, मुख्य गायिका सविता गणेश गोदाम, कोरस बाबुराव नामेवाड, तबलावादक गंगाधर आरलवाड हळदेकर, साहेबराव वाघमारे, गायक अनिल दत्ता वाघमारे (कुंटूरकर), दत्ता पोटलेवाड, सपना गडमवाड, सारिका तपासकर व या संस्थेचे सचिव साईप्रसाद गंगाधर जळपतराव यांनी हा कलापथकातून प्रबोधन कार्यक्रम सादर करत आहेत.

दि.१७ जानेवारी २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये सदरील रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम संपन्न होत आहे. आर.टी.ओ.अॉफिस, नांदेड, सिडको, लोहा व आज कंधारमध्ये सदरील कार्यक्रम झाला असून नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *