संवेदनशीलता जपणारे 1996-1997 च्या 80 मित्रांचे झाले 15 वर्षानंतर मनोमिलन
कंधार ; दिगांबर वाघमारे
नांदेड जिल्हातील हदगाव तालुक्यातील श्रीदत्त अध्यापक विद्यालयाची सन 1996-1997 ची 80 छात्र अध्यापकांची बॅच उत्तीर्ण झाली आणि शिक्षक होवून विदर्भ पश्चिम महाराष्ट्र पुणे नाशिक मराठवाडा या भागात ज्ञानदान करू लागले . पण मोबाईल क्रांतीमूळे तब्बल पंधरा वर्षानंतर सर्वजन पुन्हा संपर्कात आले . वर्षभरापूर्वी सर्व अध्यापकांनी श्रीदत्त अध्यापक विद्यालय सहस्त्र कुंड धबधबा माहूर अशी एक ट्रिप केली . त्याचवेळी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने गमावलेला दिलदार मित्र स्व .देविदास पुप्पुलवाड ची आई लक्ष्मी मावशीअतिशय खडतर परिस्थितीत जिवन व्यतीत करतेय म्हणून मदतनिधी उभारावा असे ठरले .
त्याच अनुशंघाने सर्वांनी एक मोठा आर्थिक निधी उभारला . स्व . देविदासची आई नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात तळेगावला एकटी राहते याचा शोध घेतला . नांदेडच्या आसपास राहणारे त्यावेळचे मित्र बालाजी कदम ‘ कैलास गरुडकर कामाजी डांगे प्रभाकर मिरजगावे व अजित पाटील सर हे सर्व शिक्षक नांदेडहून उमरी तालुक्यातील तळेगावला पोहचले .
देविदास च्या घरी जावून लक्ष्मी मावशींना रोख रक्कम 46000 व स्वेटर आणि काही तातडीचे जिवनावश्यक साहीत्य दिले . गमावलेला मुलाचे मित्र पाहून सत्तरी गाठलेल्या लक्ष्मी मावशींनी हंबरडा फोडला.आणि तितक्याच मायेनं त्यांचा थरथरता हात मित्रांच्या पाठीवरून फिरला.शेजारी असणारे कुटूंबीय या सुखदुःखांचा सोहळा पाइन गहिवरले.तर काही मित्रांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.
कोणत्याही क्षणी गरज पडेल तेव्हा संपर्क व्हावा म्हणून नंबर लिहून दिले.देविदास ची जागा भरून कधीहीकाढता येणार नाही.पण पुत्रासमान अनेक मुले आहेत असा विश्वास मिळवून दिला.नांदेडच्या श्रीदत्त अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक वर्ग तेथील छात्र अध्यापक उच्च पदस्थ अधिकारी म्हणून नावाजलेले आहेतच.पण तेथे तयार झालेले शिक्षक ही मानवीय संवेदनशीलता जपणारे आहेत हे अधोरेखीत झाले .
यापुढेही जिथे कमी तिथे आम्ही हा आशावाद ठरलेला आहेच . म्हणून सर्वच स्तरातून या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे .