नांदेड : प्रतिनिधी
! सर्वसामान्यांची जगण्यासाठी प्रचंड धडपड सुरू आहे. बेरोजगारी पराकोटीची वाढली आहे. अर्थ व्यवस्था पुरपणे कोलमडली असताना पुन्हा सामान्य माणसाला देशोधडीला लावणारी महागाई गगनाला भिडलेली आहे.
असे असतानाही केंद्र सरकार महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याने केंद्रातील भाजपा सरकारला जाग करण्यासाठी आणि महागाईचा निषेध करण्यासाठी आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने.बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे यांनी दिली.
देशात महागाईने कहर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपा सरकार या महागाईला कारणीभूत आहे. देशात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले असल्याने असंख्य लोकांचा रोजगार बुडाला. लाखो हात बेरोजगार झाले अशा परिस्थितीत लोकांना धीर देण्याऐवजी मोदी सरकारच्या अनियंत्रित कारभारामुळे महागाई प्रचंड वाढली आहे.
पेट्रोल, डिझेल चे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेती व्यवसायही मोडकळीस आला आहे. देशाला देशोधडीला लावण्याचे काम करणाऱ्या मोदी सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी , झोपेच्या सोंगातून बाहेर काढण्यासाठी शेवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. यानुषणागणे नांदेड शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व खा. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर हे करणार असून मोर्चास जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोंधरकर, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, महानगर प्रमुख अशोक उमरेकर, शहर प्रमुख सचिन किसवे, तुलाजेश यादव, युवा सेना प्रमुख माधव पावडे, महेश खेडकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख.निकिता चव्हाण, तालुका प्रमुख जयवंत कदम, उध्दव शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बैलगाडी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, आनंद तिडके बो ढा रकार, उमेश मुंडे ,महानगर प्रमुख अशोक उमरेकर, शहर प्रमुख सचिन किसवे, तुलाजेश यादव, युवा सेना प्रमुख माधव पावडे, महेश खेडकर, कोकाटे ,तालुका प्रमुख जयवंत कदम, उध्दव शिंदे आदींनी केले आहे.