गाझीपूर बाॅर्डरवरुन….

केंद्राचे कृषी कायदे आणि त्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे. देशात लोकशाहीचा विचार रुजला आहे. त्यामुळे लोकशाहीच्या विरोधात वर्तन करणाऱ्या कोणत्याही पक्षाला देशातील जनतेनं सोडलेलं नाही. त्यांना धडा शिकवला आहे, असं शरद पवार म्हणाले. सध्या देशात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पवार यांचं हे विधान अतिशय सूचक मानलं जात आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी इतिहासातील महत्त्वाचे दाखले दिले. आणीबाणीच्या कालखंडात लोकशाहीच्या बाजूनं उभ्या राहिलेल्या हजारो लोकांना अटक झाली. त्या कालावधीत जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली चळवळ उभी राहिली. पुढील निवडणुकीत पंतप्रधान इंदिरा गांधींचा पराभव झाला. त्यांना सत्ता सोडावी लागली. इंदिरा गांधींसारख्या मातब्बर नेतृत्त्वालादेखील जनतेनं धडा शिकवला, असं पवार म्हणाले.

देशातील जनतेच्या मनात लोकशाहीबद्दल श्रद्धा आहे. त्यामुळे लोकशाहीला नख लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनताच बाजूला करते. लोकशाहीला धोका पोहोचवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आलं. लोकशाहीसाठी असे प्रयोग देशात होण्याची गरज असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं.

दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. विदेशातील काही लोकांनीही ट्वीट करुन या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. तर, देशातील विविध राजकीय पक्षाचे नेतेही सीमारेषेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची, शेतकरी नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. आता, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी गाझीपूर सीमेवर भेट दिली. मात्र, पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे, आपण नक्की भारतातच राहतो का? असा प्रश्न त्यांनी विचारलाय होता. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

“आपल्या तीर्थरुपांना जे कायदे करायचे मनात होते पण जमले नाही. ते कायदे मोदी सरकारनं करून दाखवले. तरीही विरोधासाठी विरोध करायचा असेल तर गाझीपूर सीमेवर आंदोलनकर्त्याना भेटण्यासाठी जरूर जा. परंतु तिथे त्यांना १० एकरात १०० कोटीची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या,” असं म्हणत भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंवर टीका केली.

गाझीपूर सीमेवर विरोधकांचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक पक्षांचे नेते आणि खासदार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश होता. काँग्रेस शिवाय जवळपास १० विरोधी पक्षाचे १५ पेक्षा अधिक नेते पोहचले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना शेतकऱ्यांची भेट घेऊ दिली नाही. त्यानंतर, सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटरवरुन प्रश्न विचारला होता.

गाझीपूर सीमेवर दिल्ली येथे गेली ७० दिवस आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आम्ही काही खासदार गेलो होतो. परंतु आम्हाला त्यांना भेटू दिले नाही. गाझीपूर सीमेचे दृश्य पाहून आपण नक्की भारतातच राहतो का असा प्रश्न पडला. आपल्या संस्कृतीत ‘अन्नदाता सुखी भव’ असा उल्लेख आहे.पण केंद्र सरकार अन्नदात्या शेतकऱ्यांना अशी अमानुष वागणूक देत आहे, हे निषेधार्ह आहे, असं ट्वीट सुप्रिया सुळेंनी केलं होतं.

राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. विदेशातील सेलिब्रिटींनीही ट्विट करुन या आंदोलनसंदर्भात चर्चा केली आहे. तर, देशातील विविध राजकीय पक्षाचे नेतेही सीमारेषेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची, शेतकरी नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमारेषेवर जाऊ शेतकरी नेते राकेश टीकेत यांची भेट घेतली होती. आता, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी गाझिपूर सीमेवर भेट दिली. मात्र, पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे, आपण नक्की भारतातच राहतो का? असा प्रश्न त्यांनी विचारलाय.

दिल्लीच्या गाझिपूर सीमारेषेवर विरोधकांचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक पक्षांचे नेते आणि खासदार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस शिवाय जवळपास 10 विरोधी पक्षाचे 15 पेक्षा जास्त नेते पोहचले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना शेतकऱ्यांची भेट घेऊ दिली नाही. त्यानंतर, सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटरवरुन आणि मीडियाशी संवाद साधताना प्रश्न विचारला आहे.

गाझीपूर बॉर्डर, दिल्ली येथे गेली ७० दिवस आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आम्ही काही खासदार गेलो होतो.परंतु आम्हाला त्यांना भेटू दिले नाही.गाझीपूर बॉर्डरचे दृश्य पाहून आपण नक्की भारतातच राहतो का असा प्रश्न पडला. आपल्या संस्कृतीत ‘अन्नदाता सुखी भव’ असा उल्लेख आहे.पण केंद्र सरकार अन्नदात्या शेतकऱ्यांना अशी अमानुष वागणूक देत आहे,हे निषेधार्ह आहे, असे ट्विट सुप्रिया सुळेंनी केले आहे.

आंदोलकांना कोणी, केव्हा, कसं भेटावं हे ज्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण, सुप्रिया सुळे गाझिपूरला जात असतील तर, अगोदर त्यांनी बारामतीतील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करावं, असे आशिष शेलार यांनी म्हटलंय. ‘बारामतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मींग का करताय, याचं उत्तर अगोदर सुप्रिया सुळेंनी द्यावं. बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग अगोदर बंद करावं, मग आंदोलक शेतकऱ्यांना गाझीपूरला भेटायला जावा, असा टोलाच शेलार यांनी खासदार सुळेंना लगावलाय. शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प, शर्जील उस्मानी, शेतकऱ्यांच आंदोलन आणि विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

2 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात विनायक राऊत,अनिल देसाई, अरविंद सावंत,राजन विचारे, प्रताप जाधव, कृपाल तुमाने आदींचा समावेश होता. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर इथं पोहोचले आहे.

राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. विदेशातील सेलिब्रिटींनीही ट्विट करुन या आंदोलनसंदर्भात चर्चा केली आहे. तर, देशातील विविध राजकीय पक्षाचे नेतेही सीमारेषेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची, शेतकरी नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमारेषेवर जाऊ शेतकरी नेते राकेश टीकेत यांची भेट घेतली होती. आता, गाझिपूर सीमेवर जाऊन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. या भेटीवरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.

आंदोलकांना कोणी, केव्हा, कसं भेटावं हे ज्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण, सुप्रिया सुळे गाझिपूरला जात असतील तर, अगोदर त्यांनी बारामतीतील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करावं, असे आशिष शेलार यांनी म्हटलंय. ‘बारामतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मींग का करताय, याचं उत्तर अगोदर सुप्रिया सुळेंनी द्यावं. बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग अगोदर बंद करावं, मग आंदोलक शेतकऱ्यांना गाझीपूरला भेटायला जावा, असा टोलाच शेलार यांनी खासदार सुळेंना लगावलाय. शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प, शर्जील उस्मानी, शेतकऱ्यांच आंदोलन आणि विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

गाझिपूर सीमेवर विरोधकांचं शिष्टमंडळ गाझिपूर सीमेवर नुकतच पोहोचलं आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचाही समावेश आहे. सुप्रिया सुळे साधणार आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांवर ही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना नेत्यांनंतर आता विरोधकांच्या शिष्टमंडळाने शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस शिवाय जवळपास 10 विरोधी पक्षाचे 15 पेक्षा जास्त नेते पोहचले आहेत.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
०३.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *