कंधार :- ता.प्र.
कोरोना काळात नगरीकांना आलेल्या वाढदिव वीज बिल व वीज बिल माफी करण्यात यावे या साठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंधार शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन करून टाळे ठोक आंदोलन करण्यात आले.
दि ५ फेब्रुवारी रोजी कंधार येथील महावितरण कार्यालयात भाजपाच्या वतीने हल्ला बोल आंदोलन करण्यात आले ,राज्यातील महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणारे महावितरणाचे कर्मचारी यांच्या अनागोंदी कारभारा वर रोष व्यक्त करत राज्य सरकार व महावितरण विरोधात निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आले या वेळी किसानमोर्चा चे जिल्हाअध्यक्ष बाबुरावजी केंद्रे,महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा चित्ररेखा गोरे ,भाजप कंधार तालुका अध्यक्ष भगवान राठोड,शहर अध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, महिला आघाडी तालुका अध्यक्षा जयमंगला औरादकर,भाजपा युवमोर्च्या जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष साईनाथ कोळगिरे ,ता सरचिटणीस किशनराव डफडे,न.पा. सदस्य ,शहर उपाध्याय सुनील कांबळे,शहर सरचिटणीस मधुकर डांगे,शहर उपाध्यक्ष महेश मोरे,शहर सरचिटणीस चेतन केंद्रे, ता सरचिटणीस विनोद तोरणे, उपाध्यक्ष उमेशराव शिंदे,बालाजी तोटवाड,सदाशिव नाईकवाडे,भगवान राशिवंत,किशनराव गित्ते,बालाजी तोरणे,श्रीराम जाधव, ,सौ.सुनंदा वंजे,स्मिता बडवने,रामाबाई व्यवहरे,दत्ता डांगे,गोविंदराव मोरे,विश्वंभर बसवंते,नवनाथ आईतवाड,उमेश भुरेवार, आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते