कंधार तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीवर महीला राज ; आरक्षणामुळे अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगले

कंधार ; दिगांबर वाघमारे

कंधार तहसील कार्यालय च्या वतीने पाच फेब्रुवारी रोजी पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कंधार तालुक्यातील 116 ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आले .त्यामध्ये 58 ग्रामपंचायतीवर महिलांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे तर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न या आरक्षणामुळे भंगले असल्याचे चित्र कंधार तालुक्यात आहे.


आरक्षण अनुसूचित जातीSC

सावरगाव (नि) वरवंट, सावळेश्वर, घुबड वाडी, हटक्याळ, मजरे धर्मापुरी, बाचोटी, तेलुर, दिग्रस बु.,चिखली, हासुळ, इमाम वाडी,

अनुसूचित जाती महिलाSC

कळका, चिंचोली पक. बहादरपुरा, खंडगाव ह. पेठवडज ,बामणी पक. बारुळ, मोहिजा, दैठणा ,पांगरा, जंगमवाडी,

अनुसूचित जमातीST

शिरुर,

अनुसूचित जमाती महिलाST

मंगलसांगवी,बोळका

ओबीसी OBC

अंबुलगा, कल्हाळी, देवईचीवाडी, नंदनवन,नवघरवाडी, नवरंगपुरा,भेंडेवाडी, रुई,वंजारवाडी, शिरसी बु., हाडोळी ब्र.,शेलाळी,लाठ खु.,रहाटी ,गुंटूर, नंदनशिवनी.

ओबीसी महिला

कंधारेवाडी, गोगदरी, चिखलभोसी, मंगनाळी, राऊतखेडा, शेकापुर, नावंद्याचीवाडी,धानोरा कौठा,मरशिवणी, उमरज, पानभोसी, पाताळगंगा,गुंडा, गोणार आणि मानसपुरी.


सर्वसाधारण Open

आलेगाव, औराळ, कारतळा ,कोटबाजार, गंगनबीड, गांधीनगर, गुट्टेवाडी, घोडज, जाकापूर, दाताळा ,दिग्रस खुर्द ,नागलगाव, पोखर्णी, बाबुळगाव, बोरी बुद्रुक ,मसलगा ,मादाळी ,मुंडेवाडी, लाडका ,वाखरड, शिरसी खु., शिराढोण, हनुमंतवाडी, हळदा, हिप्परगा शहा, नारनाळी, तळ्याचीवाडी, घागरदरा, खुड्याचीवाडी.

सर्वसाधारण महीला Open

संगुचीवाडी ,संगमवाडी, भूकमारी ,बाळंत वाडी, गऊळ, कौठा ,हरबळ पक.,कुरुळा, रामनाईक तांडा,उमरगा खो., चौकी धर्मापुरी, महालिंगी, बोरी खुर्द, दहिकळंबा, लालवाडी, काटकळंबा, फुलवळ, तेलंगवाडी, उस्माननगर, भोजुचीवाडी, पानशेवडी, वहाद,गुलाब वाडी,सोमठाणा,बिजेवाडी, भंडार कुमठ्याचीवाडी, चौकी महाकाया, येलूर, मानसिंगवाडी, भुत्याचीवाडी आदी गावांचा समावेश आहे.

सुटलेल्या आरक्षणामुळे मात्र कही खुशी कही गम असे चित्र तालुक्यात दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *