माळाकोळी ; एकनाथ तिडके
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोहा तालुका सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष बाबासाहेब बाबर यांनी आपल्या अश्टुर ग्रामपंचायत वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून त्यांच्या गटाचे सौ. रेखा दत्ता ससाने या सरपंच तर बाबासाहेब बाबर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी श्री धर्मेकर यांनी काम पाहिले तर सहाय्यक म्हणून ग्राम विकास अधिकारी सी के दावणगावे उपस्थित होते.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले बाबासाहेब बाबर यांनी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच राजकीय चळवळीत आपले योगदान दिले आहे, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 -21 मध्ये अकरा सदस्य ग्रामपंचायत असलेल्या अश्टुर ग्रामपंचायत निवडणुकीत बाबासाहेब बाबर यांच्या पॅनलचे आठ सदस्य विजयी झाले होते. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या सरपंच निवडीत रेखा ससाने यांनी सरपंच पदासाठी तर बाबासाहेब बाबर यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला त्यांच्याविरोधात अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.यावेळी सदस्य चंद्रकला बद्दल पुरी , कौसाबाई मोतीराम बाबर शिवाजी नागोराव गुद्धे, सोनाली तुकाराम बंडे, मारुती खेमाजी पवार, अंजना संतोष खेडकर, योगेश दिलीप बाबर, बापूराव भास्कर ससाने, आदी उपस्थित होते.
मूलभूत सुविधांसह पायाभूत विकासावर देणार लक्ष
पाणी ,रस्ते ,वीज ,नालेसफाई या मूलभूत सुविधांसह गावातील शिल्लक असलेल्या पायाभूत विकासाकडे लक्ष देणार असल्याचे यावेळी बोलताना बाबासाहेब बाबर म्हणाले ,”विकासापासून वंचित राहिलेल्या अष्टुर गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कटिबद्ध असून महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध योजना गावात प्रभावीपणे राबवून गावचा विकास साधणार असल्याचे ते म्हणाले.
संघर्षानंतर यश
उच्च विद्याविभूषित असलेले बाबासाहेब बाबर यांनी मागील पंधरा ते वीस वर्षापासून गावाच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेत विविध ग्राम विकास चळवळीत सहभाग घेतला. मागील पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पराभवानंतरही खचून न जाता गावात पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून तसेच इतर सामाजिक व विकासात्मक चळवळीत कायम सहभाग घेतल्यामुळे या वेळी मात्र मोठा विजय त्यांना मिळवता आला.