गुलाबी थंडीत सप्तरंगीने फुलविला विद्रोहाचा अंगार ; रमाई जयंतीनिमित्त शहरात रंगले विद्रोही कविसंमेलन
नांदेड ; प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यभरातील अथक प्रयत्नांनी आज माझ्यासारखा पालातला माणूस महालात आला. ही किमया केवळ भारतीय संविधानामुळेच साधली गेली आहे. भारतीय संविधानाबद्दल प्रत्येक भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अशा भावना येथील विद्रोही कवी भटक्यांचे फटकेकार गोविंद बामणे यांनी व्यक्त केल्या.
मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळ व महाराष्ट्रातील नामवंत विद्रोही कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी युवा विद्रोही कवी भटक्यांचे फटकेकार गोविंद बामणे हे होते. उद्घाटक म्हणून कवी डॉ. सय्यद अकबर लाला, स्वागताध्यक्ष गंगाधर ढवळे, अतिथी कवी म्हणून अनुरत्न वाघमारे, कवी मारोती कदम, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील, प्रा. माधव जाधव, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा नरवाडे आदींची उपस्थिती होती. राज्यभरातून सहभागी झालेल्या विद्रोही कविंनी गुलाबी थंडीत जणू विद्रोही कवितांचा काव्य अंगार फुलविला.
महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने शहरातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात महाराष्ट्र भूषण, नांदेड भूषण, जीवनगौरव तसेच कोरोना सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यापूर्वी परिषदेकडून सप्तरंगी साहित्य मंडळ व राज्यातील विद्रोही कविंना पाचारण करण्यात आले होते. महात्मा कबीर आणि माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कविसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यात उद्घाटक सय्यद अकबर लाला आणि अध्यक्ष गोविंद बामणे यांच्यासह प्रतिभा थेटे, ज्ञानेश्वरी गुळेवाड, स्वाती मुंगल, मीनाक्षी कांबळे, उषाताई ठाकूर, बालिका बरगळ, राजेश गायकवाड, आ.ग. ढवळे, सूनिल नरवाडे, नाना वाठोरे, विठ्ठलकाका जोंधळे, शरदचंद्र हयातनगरकर, नागोराव डोंगरे, राम गायकवाड, गंगाधर ढवळे, नागोराव डोंगरे, अनुरत्न वाघमारे, रणजीत कांबळे, जाफर शेख, भगवान वाघमारे, संदीप गोणारकर, श्याम नौबते, अशोक भुरे, अॅड. संजय भारदे आदी कवी कवयित्रींनी सहभाग नोंदवला.
कविसंमेलनाचे प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन अनुरत्न वाघमारे यांनी केले तर आभार नागोराव डोंगरे यांनी मानले. कविता सादरीकरणानंतर लगेच स्वागत समितीच्या वतीने सर्व सहभागी कवींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कुलदीप पाटील, डॉ. आनंद भालेराव, विशालराज वाघमारे, हरीभाऊ भवरे, डी. एन. कांबळे, आ. ग. ढवळे,जी. एस. ढवळे, एन. व्ही. डोंगरे, बी. जी. वाघमारे, भीमराव घुले, दत्ता गंडलवार आदींनी परिश्रम घेतले. कविसंमेलनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.